Dec 7, 2018

०७ डिसेंबर २०१८ चालू घडामोडी

कृषी निर्यात धोरणाला मंत्रीमंडळाची मंजूरी:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने 6 डिसेंबर रोजी कृषी निर्यात धोरणाला मंजूरी दिली. यामुळे आता 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारने दिलेले वचन पूर्ण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. Grapes-Farming
  • मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि व्यवसाय मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
  • कृषी निर्यात धोरणाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे दिलेले वचन पूर्ण होणार आहे.
  • स्थिर व्यापाराच्या शासन धोरणामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या निर्यातीची संधी मिळणार असून त्याचा चांगला फायदाही होणार आहे. या धोरणामुळे सेंद्रीय आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ्यांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. तसेच या धोरणामुळे विविध शेतमालाची निर्यात करणेही शक्य होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (6 डिसेंबर 2018)
भविष्यात जगात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये सूरत अग्रस्थानी:
  • भविष्यात जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये भारताचे वर्चस्व असेलग्लोबल इकोनॉमिक रिसर्चच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे.
  • भविष्यातील जीडीपी दराची तुलना केल्यास चित्र वेगळे असेल. 2019 ते 2035 दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या 20 शहरांपैकी 17 शहरे एकटया भारतातील असतील असे या अहवालात म्हटले आहे.
  • बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांची कामगिरी उत्तम असेल असे ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. 2019 ते 2035 दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या 10 शहरांमध्ये सूरत पहिल्या स्थानावर असेल.
  • तसेच त्याखालोखाल आग्रा, बंगळुरु, हैदराबाद या शहरांचा क्रमांक असेल. नागपूर, तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा ही शहरे सुद्धा टॉप टेनमध्ये आहेत.
लिपिक पदावर पदोन्नतीस मिळणार 25 टक्के आरक्षण:
  • राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक, साहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता एसटीच्या लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी आरक्षण मिळणार आहे. ST Mahamandal
  • तर या कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये 25 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
  • चालक, वाहक, साहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षारक्षक, खलाशी, साहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचार्‍यांना या निर्णयाचा लाभ होईल.
  • राज्यात या पदावर सुमारे 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील.
  • या निर्णयामुळे महामंडळातील ज्या कर्मचार्‍यांनी लिपिक, टंकलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण घेतले आहे त्यांचे शिक्षण वाया न जाणार नाही. उलट आता त्यांना एसटी महामंडळातच पदोन्नतीची संधी मिळणार आहे, असे रावते यांनी सांगितले.
सरकार आयकर विषयी नवी सेवा आणणार:
  • आयकर परताव्याचा अर्ज भरताना अनेक करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही क्लिष्ट पद्धत संपवण्याचा सरकारचा विचार आहे. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाबाबत सरकारचा विचार सुरू आहे.
  • नव्या योजनेनुसार, आयटीआर भरताना केवळ तुम्हाला स्वाक्षरी करण्याची गरज असेल, उर्वरित काम आयकर विभाग करेल. केंद्रीय कर संचालक मंडळाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी याबाबत माहिती दिली.
  • तसेच यानुसार, आयकर परतावा भरणाऱ्यांना लवकरच आधीपासूनच भरलेला फॉर्म मिळेल, त्यामुळे परतावा भरण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी होईल.
  • आयकर विभागाकडून कर्मचारी किंवा बँकेसारख्या अन्य संस्थांद्वारे टीडीएसच्या आधारे आधीपासूनच भरलेल्या फॉर्मची प्रणाली तयार करण्यावर काम सुरू आहे.
  • फॉर्म भरणाऱ्या करदात्याला जर आधीपासूनच भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास त्यात एडिटचा पर्याय देखील मिळेल, त्यामुळे आवश्यक बदल करुन त्याला परतावा भरता येईल.
राज्यात साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा:
  • मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने 1 ते 15 जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
  • तर या पंधरवड्यादरम्यान मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
  • त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. तो होतो की नाही, याचा पंधरवड्यात सर्व कार्यालय प्रमुखांनी आढावा घेण्याचे आदेश शासन निर्णयात देण्यात आले.
आता आपला आधार क्रमांक मागे घेता येणार:
  • नागरिकांना आपला आधार क्रमांक मागे घेण्याचा अधिकार देणाऱ्या प्रस्तावावर सध्या केंद्र सरकार काम करीत आहे. या स्वरुपाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच आधार क्रमांकाला वैधता दिली आहे. तथापि, त्याबरोबरच काही अटीही घातल्या आहेत. हे करताना आधार कायद्यातील कलम 57 न्यायालयाने रद्द केले आहे.
  • तर याच कलमान्वये खासगी कंपन्यांना पडताळणीसाठी आधार क्रमांकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली होती. यामुळे आधार कार्ड धारकांच्या डेटाची गैरवापर केला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. Aadhar
  • निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने आधार क्रमांक, बँक खाती आणि सीम कार्डशी जोडणेही घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आधार मागे घेण्याचा प्रस्ताव सरकारकडून आला आहे.
  • उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार प्राधिकरणाने यासंबंधीचा प्राथमिक प्रस्ताव तयार केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक मागे घेण्याचा अधिकार असेल. त्यासाठी त्याला सहा महिन्यांचा अवधी दिला जाईल, अशी तरतूद या प्रस्तावात आहे.
  • तसेच हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाला पाठविला होता. मंत्रालयाने शिफारशीत म्हटले की, आधार मागे घेण्याचा अधिकार केवळ ठराविक समूहापुरता मर्यादित असू नये. तो सर्व नागरिकांना मिळायला हवा. हा प्रस्ताव आता मंत्रिमंडळासमोर जाणार आहे.
दिनविशेष:
  • 7 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय लष्कर ध्वज दिन‘ तसेच ‘आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन‘ आहे.
  • सन 1825 मध्ये बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज होते.
  • पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात सन 1856 मध्ये झाला.
  • स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म 7 डिसेंबर 1921 मध्ये झाला.



०६ डिसेंबर २०१८ चालू घडामोडी


देशातील सर्वात लांब जोडपूल लवकरच खुला होणार:
  • ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सगळ्यात लांब अशा रेल्वे- रस्ते पुलाचे (रेल-रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत. high bridge
  • 4.94 किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे. सुशासन दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुलाचे उद्घाटन करतील, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
  • माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी 1997 साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर 2002 सालीच या पुलाचे काम सुरू झाले.
  • गेल्या 16 वर्षांत या पुलाच्या बांधकामाची मुदत अनेकवेळा चुकल्यानंतर 3 डिसेंबरला या मार्गावर पहिली मालगाडी धावली. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत रसदपुरवठय़ात सुधारणा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या पायभूत प्रकल्पांपैकी बोगिबील हा एक आहे.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (5 डिसेंबर 2018)
करीमनगरचे नाव बदलून करीपुरम ठेवले जाणार:
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास भाजपा करीमनगरचे नामांतर करेल असे आश्वासन दिले आहे. करीमनगरचे नाव बदलून करीपुरम करु असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
  • ‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास लोकांच्या भावनांचा आदर राखत करीमनगरचे नामांतर करीपुरम करण्याचा प्रयत्न करु’, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नामांतरं केल्याने आधीच योगी आदित्यनाथ यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे.
  • ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र तरीही नावं बदलण्याचा सपाटा अद्याप सुरु आहे. नुकतंच एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपाला निवडून दिल्यास हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करु असं आश्वासन दिलं होतं.
  • ‘जर हैद्राबादचं भाग्यनगर करायचं असेल तर तुम्ही भाजपाला तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली पाहिजे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. तेलंगणामधील माजी भाजपा नेता टी राजा  सिंह लोध यांनीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आपला पक्ष तेलंगणामधील शहरांची नावे बदलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
म.सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:
  • भारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा झाली. विविध 24 भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • यंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म.सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध‘ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर ‘भाषा सन्मान‘ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे. Patil
  • 29 जानेवारी 2019 रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • डॉ. शैलजा बापट या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे.
  • तसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्‌स’ म्हणून निवड करण्यात आली होती.
  • हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. 203 – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे. तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्वालकॉमकडून नवा प्रोसेसर लाँच:
  • सुपरफास्ट 5G इंटरनेटचे स्वप्न पाहणाऱ्या तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्वालकॉमने नुकताच स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला असून सर्वात आधी अमेरिकेमध्ये हे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे.
  • तसेच यानंतर आशिया आणि युरोपमध्ये 5G सेवा पुरवठादार तयार झाल्यानंतर या प्रोसेसरचे स्मार्टफोन आणले जाणार आहेत. 5G हे सध्याच्या 4 जी पेक्षा 50 ते 100 पटींनी जास्त वेगवान असणार आहे.
  • क्वालकॉमने यंदाच्या मोबाईल कॉफ्रन्समध्ये 5G साठी प्रोसेसर आणण्याची घोषणा केली होती. तसेच हा प्रोसेसर पुढील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये उपलब्ध करण्याचे सांगितले होते. यावेळी मोबाईल निर्मात्या कंपन्यांनीही यास संमती दिली होती.
  • 4 डिसेंबर रोजी हवाई येथील एका कार्यक्रमात क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला. या प्रोसेसरमध्ये X50 हे मोडेम असणार आहे.
  • क्वालकॉमचा हा अद्ययावर प्रोसेसर व्हेरिझोन कम्युनुकेशनच्या मदतीने सॅमसंग 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन अमेरिकेत 2019 च्या मध्यापर्यंत उपलब्ध होतील.
  • सॅमसंग ही कंपनी अॅपलला अमेरिकेमध्ये कडवी टक्कर देत असून 5G च्या स्पर्धेत बाजी मारल्यास अॅपलला चांगलेच जड जाणार आहे.
  • अॅपलला 5G असणाऱ्या आयफोनसाठी 2020 पर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच सॅमसंगनंतर वनप्लस ही प्रिमिअम बजेट स्मार्टफोन बनविणारी कंपनीही 5G चे फोन आणण्याची शक्यता आहे.
‘आरबीआय’कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम:
  • रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने 6.5 टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे.
  • तसेच रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के आणि बँक रेट 6.75 टक्के कायम ठेवला आहे. 2019-20 मध्ये जीडीपी 7.4 टक्के राहिल असा अंदाज आहे. RBI
  • 2018-19 च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर 2.7 ते 3.2 टक्के राहिल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला. नुकतेच जीडीपीची आकडे समोर आले.
  • तर त्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये 7.1 टक्क्यापर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपी 8.2 टक्के होता.
  • चालू वर्षात आरबीआयने आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये काही अंकांची घसरण झाली. अर्थतज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दिनविशेष:
  • 6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.
  • संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.
  • पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.
  • सन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • सन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती

०५ डिसेंबर २०१८ चालू घडामोडी

देशातील सर्वात अवजड उपग्रह GSAT-11 चे प्रक्षेपण:
  • अखेर तो क्षण आलाच जेव्हा देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चे प्रक्षेपण करण्यात आले. 5,854 वजन असणाऱ्या या उपग्रहाचे आज (5 डिसेंबर) सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आले. GSAT-11
  • हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा  आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचे सांगितले जात आहे.
  • याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवले होते.
  • Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
  • यानंतर GSAT-11 चे प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चे प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
  • तसेच हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचे काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला 100 गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (4 डिसेंबर 2018)
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला मोठे यश:
  • व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी भारताला मोठे यश मिळाले आहे. 3600 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यातील कथीत दलाल आणि ब्रिटिश नागरिक ख्रिश्चिअन मिशेलला भारतात आणण्यात येत आहे.
  • तर त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून भारताच्या तपास यंत्रणा मिशेलला दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन गेले. त्यानंतर तेथून त्याला थेट भारतात आणण्यात येणार आहे. याबाबत काही माध्यमांनी वृत्त दिले आहे.
  • नोव्हेंबरमध्ये कसेशन कोर्टाने कनिष्ठ कोर्टाच्या आदेशाला कायम ठेवत मिशेलच्या प्रत्यार्पणाचा मार्ग खुला केला होता. वृत्तानुसार, 54 वर्षीय मिशेलला दुबई विमानतळावर नेण्यात आले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात येणार आहे.
  • भारताने 2017 मध्ये खाडीतील देशांकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. सीबीआय आणि ईडी याप्रकरणी मिशेलवर फौजदारी खटल्याप्रकरणी चौकशी करीत आहेत.
10वीच्या विद्यार्थ्यांना यू-ट्यूबव्दारे मार्गदर्शन:
  • यंदापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत.
  • 6 डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारती वाहिनीवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • दहावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (2018-19) बदलण्यात आला आहे. प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्येही मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी करून पाठ केलेले उत्तरपत्रिकांमध्ये उतरविण्याऐवजी त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करावे, त्यांची मते नोंदवावीत यासाठी कृतिपत्रिका देण्यात येणार आहे. Youtube
  • या कृतिपत्रिकांचे सराव प्रश्नसंच ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर 26 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ बालभारतीने तयार केले आहेत.
  • येत्या 6 डिसेंबरपासून ते यू-ट्यूबवरील बालभारतीच्या वाहिनीवर उपलब्ध केले जाणार आहेत अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली आहे.
  • विद्यार्थ्यांनी सराव कृतिपत्रिका सोडविल्यानंतर त्यांच्या कुठे चुका झाल्या त्या या व्हिडीओ पाहून दुरूस्त करता येणार आहेत. सर्व विषयांचे व्हिडीओ विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
  • 6 डिसेंबर रोजी सर्व प्रथम भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील. 7 रोजी द्वितीय भाषा विषयांचे तर 8 रोजी तृतीय भाषा विषयांचे व्हिडीओ उपलब्ध होतील.
चार गुरुत्वीय लहरींची लायगो, व्हर्गो प्रकल्पात नोंद:
  • लायगो या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांतर्गत आणखी चार गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात आले असून, कृष्णविवरांच्या एकमेकांवरील आघातानंतरच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरींची निर्मिती होत असते.
  • अमेरिकेतील लायगो व युरोपच्या व्हर्गो या गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांनी 10 कृष्णविवरांच्या व एका न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद केली आहे.
  • यात गुरुत्वीय लहरी घटनांची नोंद GW170729, GW170809, GW170818, and GW170823 या नावांनी झाली असून, त्यातील जीडब्ल्यू 170729 या गुरुत्वीय लहरी 29 जुलै 2017 रोजी नोंदल्या गेल्या.
  • तर त्या जास्त वस्तुमान असलेल्या दूरस्थ स्रोतापासून आलेल्या होत्या. त्यातील विलीनीकरणाची घटना ही पाच अब्ज वर्षांपूर्वीची असून, त्यात निर्माण झालेली ऊर्जा ही पाच सौर वस्तुमानाइतकी आहे. तिचे रूपांतर शेवटी गुरुत्वीय लहरीत झाले.
  • 12 सप्टेंबर 2015 ते 19 जानेवारी 2016 या काळात पहिल्यांदा गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला लायगो प्रकल्पात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रगत लायगो प्रकल्पात तीन द्वैती कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून आलेल्या गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.
  • 30 नोव्हेंबर 2016 ते 25 ऑगस्ट 2017 या काळात एका द्वैती न्यूट्रॉन ताऱ्याच्या विलीनीकरणातून व सात कृष्णविवरांच्या विलीनीकरण घटनातील गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.
मुस्लिम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकावे:
  • बांगलादेश, पाकिस्तान आणि सीरिया यांच्यासारख्या मुस्लिम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकले पाहिजेतरच जगात शांतता नांदू शकते असे तिबेटीयन अध्यात्मिक गुरु दलाई लामा म्हणालेDalai Lamba
  • 125 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असूनही आज भारतात विविध धर्म-परंपरा आहेत. मुस्लिम देशांनी भारताकडून शिकले पाहिजे तरच जगात शांतता नांदेल असे दलाई लामा म्हणाले.
  • भारतात सर्व धर्मांमध्ये एक समन्वय असून अहिंसेच्या तत्वामुळे आज आधुनिक भारताचा विकास होत आहे असे दलाई लामा यांनी पत्रकारांना सांगितले.
  • भारत आणि चीनमध्ये असलेल्या डोकलाम वादाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करुन हा प्रश्न सोडवला पाहिजे. हिंदी-चिनी भाई भाई या घोषणेनुसार दोन्ही देशांमध्ये संवाद झाला पाहिजे असे दलाई लामा म्हणाले.
दिनविशेष:
  • 5 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक माती दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना सन 1906 मध्ये 5 डिसेंबर रोजी झाली.
  • भारताचे 14वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल ‘जयंत नाडकर्णी‘ यांचा जन्म 5 डिसेंबर 1931 मध्ये झाला.
  • सन 2016 मध्ये गौरव गिल यांनी ‘आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप 2016‘ हा किताब जिंकला.

०४ डिसेंबर २०१८ चालू घडामोडी

आता येणार क्यूआर कोडवर आधारित ऑफलाइन आधारकार्ड:
  • आधारसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडवर आधारित ऑफलाइन आधारला मंजुरी देण्याच्या मुद्द्यावर केंद्र आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चर्चा सुरू आहे.
  • बँक खाती उघडणे, पेमेंट वॉलेट वापरणे, विमा कवच खरेदी करणे, यासाठी आवश्यक असलेल्या पडताळणीत ई-केवायसीच्या जागी ऑफलाइन आधारचा वापर केला जाऊ शकेल. QR code
  • ऑफलाइन आधार आणल्यास वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांनाही फायदा होणार आहे. आधार बंधनकारक करण्याची मागणी या कंपन्या करीत आहेत. तथापि, सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. अशा  परिस्थितीत या कंपन्यांना ऑफलाइन आधार उपयुक्त ठरू शकेल.
  • खासगी संस्थांना आधार पडताळणी करण्याचे अधिकार देण्यात येऊ नयेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बँक खात्यांसाठी आधार बंधनकारक नसावे, असेही न्यायालयाने दिलेल्या निर्णयात  म्हटले आहे. त्यामुळे ऑफलाइन आधारवर चर्चा सुरू झाली.
  • तसेच हा आधार क्रमांक आधार प्राधिकरणाच्या सर्व्हरशी जोडलेला नसेल. त्याऐवजी आधार प्राधिकरणाची डिजिटल स्वाक्षरी असलेल्या क्यूआर कोडची  प्रिंटआउट नागरिकांना मिळेल. हा दस्तावेज रेशन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना आणि मतदान कार्ड यापेक्षा अधिक विश्वसनीय असेल.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (3 डिसेंबर 2018)
जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी:
  • पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये लग्नसोहळ्यास उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथे बंदी घालण्यात आली आहे. अशाप्रकारचा आदेशच उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने काढला आहे. तसंच या आदेशाची प्रतही  लग्न समारंभासाठी हॉल देणाऱ्या मालकांकडे देण्यात आली आहे.
  • जानेवारी ते मार्चदरम्यान येथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • प्रयागराज येथे जानेवारी ते मार्च महिन्यात कुणी लग्नासाठी हॉल बुक केला असेल किंवा इतरही बुकिंग केलं असल्यास नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे योगी सरकारकडून सांगण्यात आले आहे. यासंबंधित लेखी सूचना हॉटेलमालक आणि लग्नासाठी हॉल देणाऱ्या मालकांना  देण्यात आली आहे. प्रयागराज वगळता इतर शहरांमध्ये लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • पुढील वर्षी कुंभमेळय़ात पाच पवित्र स्नान होणार आहेत. पहिले स्नान हे मकर संक्रांतीला तर दुसरे पवित्र स्नान पौष पौर्णिमेला होत आहे. त्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात मौनी आमावस्या, वसंत पंचमी आणि माघी पौर्णिमेला होणार आहे. तर मार्च महिन्यात महाशिवरात्री एकादशीला पवित्र स्नान होईल.
नौदलात लवकरच नव्या युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश होणार:
  • नौदलाच्या ताफ्यामध्ये नव्या 56 युद्धनौका व पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचाही समावेश करण्यात येईल, असे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सांगितले.
  • नौदल दिनानिमित्ताने पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 32 युद्धनौकांची बांधणी सुरू आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी 2.5 लाख मच्छीमार बोटींवर ऑटोमेटेड आयडेंटिफिकेशन ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येत आहेत. Bharatiy Naudal
  • समुद्री गस्तीनौकांच्या बांधणीला विलंब झाल्याबद्दल रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग लिमिटेडवर नौदलाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे, असे लांबा यांनी सांगितले. या प्रकल्पाला बँकेने दिलेल्या हमीची रक्कम नौदलाने स्वत:च्या ताब्यात घेतली आहे.
  • तसेच या प्रकरणाची नौदलाकडून चौकशी सुरू आहे. मात्र हा व्यवहार अद्याप रद्द झालेला नाही, असेही ते म्हणाले. मालदीवमध्ये भारताला अनुकूल असलेले सरकार आले असून दोन्ही देशांतील सागरी सुरक्षाविषयक सहकार्य वाढावे याचे प्रयत्न आहेत.
कॅन्सरशी लढा देण्यासाठी राज्य शासन रिलायन्स सोबत:
  • जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत.
  • रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहेया लढ्यामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
  • बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समूहाचे कॅन्सर केअर हॉस्पीटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
  • तर याप्रसंगी व्यासपीठावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, रिलायन्स हॉस्पीटलच्या अध्यक्षा टिना अंबानी, डॉ. तुषार मोतीवाला, डॉ. राम नारायण यांची उपस्थिती होती.
कतार या देशाची ‘ओपेक’मधून माघार:
  • ऊर्जासंपन्न असलेल्या कतार या लहानशा अरब देशाने ओपेक (ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिग कंट्रीज) या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेतून जानेवारी 2019 पासून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे. या आठवडय़ातील ओपेकच्या बैठकीस कतार हजेरी लावणार आहे.
  • तेलाच्या किमती कमी होत असताना घसरण थांबवण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करण्याच्या आवाहनास कतारने प्रतिसाद न देता उत्पादन वाढवण्याचे समर्थन केले आहे. ओपेक मधील बलाढय़ देश असलेल्या सौदी अरेबियाने कतारवर बहिष्कार टाकल्याने असलेली नाराजी यातून व्यक्त झाली आहे.
  • कतारचे ऊर्जामंत्री साद शेरिदा अल काबी यांनी अचानक ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर या संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले असून, 2016 मध्ये तेलाच्या किमती पिंपाला 30 डॉलरपेक्षा कमी झाल्याने उत्पादन कपातीस सदस्य नसलेल्या देशांना राजी करण्याचे आव्हान या संघटनेपुढे होते.
  • 1960 मध्ये ओपेकची स्थापना झाल्यानंतर कतारने या संघटनेतून प्रथमच माघार घेतली असून, कतारचे ऊर्जामंत्री अल काबी यांनी सांगितले, की यापुढे आमचा देश एलपीजी वायूची निर्यात वर्षांला 77 दशलक्ष टनावरून 110 दशलक्ष टन करणार आहे.
दिनविशेष:
  • 4 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय नौसेना दिन‘ आहे.
  • भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म 4 डिसेंबर 1910 मध्ये झाला होता.
  • भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 मध्ये झाला.
  • सन 1924 मध्ये गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
  • भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची सन 1948 मध्ये नेमणूक झाली होती.

०३ डिसेंबर २०१८ चालू घडामोडी

जी-20 परिषदेचे 2022 मध्ये यजमानपद भारताकडे:
  • जी-20 देशांची परिषद 2022 मध्ये भारतात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथे तेराव्या जी 20 शिखर बैठकीवेळी ही घोषणा केली. त्यांनी भारताला यजमानपद  दिल्याबद्दल इटलीचे अभिनंदन केले आहे. Narendra Modi
  • 2022 मधील जी 20 परिषदेचे यजमानपद इटली भूषवणार होता, पण भारताच्या विनंतीनुसार त्यांनी या परिषदेचे यजमानपद भारताला देऊ केले. 14 वी जी 20 परिषद जपानमध्ये तर पंधरावी सौदी  अरेबियात होणार आहे.
  • 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असून हे वर्ष विशेष आहे, त्यामुळे सर्वानी वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे म्हणजे भारतात यावे. भारताचा संपन्न इतिहास, विविधता यांचा अनुभव  घ्यावा, भारताचे आदरातिथ्यही बघावे असा संदेश समाजमाध्यमांद्वारे मोदी यांनी पाठवला होता.
  • जी 20 देशांमध्ये अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय समुदाय, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया,  तुर्कस्थान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश होता.
  • तर जी 20 देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे 90 टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा 80 टक्के भाग या देशात आहे. जगाची दोनतृतीयांश लोकसंख्या या देशात राहते व जगातील निम्मा  भूभाग या देशात आहे.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (2 डिसेंबर 2018)
अनिल बिलावा ठरला ‘नवोदित मुंबई श्री’:
  • गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडी मैदानात रंगलेल्या नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत परळच्या हर्क्युलस जिमच्या अनिल बिलावा याने किताबावर नाव कोरले.
  • बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आाणि फिटनेस संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल 195 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तर वेळेचे पालन न करणाऱ्या 20 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंना सहभाग नाकारण्यात आला.
  • प्रत्येक गटात 4-5 चांगले खेळाडू असल्यामुळे विजेता निवडण्यासाठी परीक्षकांना मेहनत घ्यावी लागली. 55 आणि 60 किलो वजनी गटात अनुक्रमे बॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारी आणि विपुल सावंत यांनी बाजी मारली.
  • किताबासाठी हेमंत, विपुल, रुपेश चव्हाण, मकरंद दहिबावकर, अनिल बिलावा, राजेश खाटीकमोट आणि विकास म्हापसेकर यांच्यात चुरस रंगली. पण 75 किलो वजनी गटाच्या विजेता अनिल बिलावाने जेतेपदावर नाव कोरले.
‘ए.एस. राजीव’ बँक ऑफ महाराष्ट्रचे नवे व्यवस्थापकीय संचालक:
  • इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए.एस. राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 डिसेंबर रोजी कार्यभार स्वीकारला आहे.
  • ए.एस. राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक आणि इंडियन बँक मधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बँकिंगचा अनुभव आहे. Bank of Maharashtra
  • चार्टर्ड अकाउंटंट असण्यासोबतच त्यांच्याकडे कॉर्पोरेट क्रेडिट, आंतरराष्ट्रीय बँकिंग, ट्रेझरी, जोखीम व्यवस्थापन, क्रेडिट देखरेख व पर्यवेक्षण, एनपीए व्यवस्थापन, नियोजन आणि विकास, मानव संसाधन,  दक्षता, कॉर्पोरेट प्रशासन, तपासणी व लेखापरीक्षण, सायबर सुरक्षा, वित्त, खाती आणि कर यासह बँकिंगच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठा अनुभव आहे.
  • तसेच राजीव हे गणित पदवीधर असून सोबतच एफसीए, एमबीए, डीआयएसए आणि सीएआयआयबी पात्र आहेत.
साई संस्थानकडून राज्याला बिनव्याजी कर्ज:
  • आर्थिक संकटात सापडलेले फडणवीस सरकार साईबाबांच्या चरणी आले आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज राज्य सरकारला देण्याचा निर्णय शिर्डी साई संस्थानने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
  • नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्प चाळीस वर्षांपासून रखडले आहे. धरण बांधून पूर्ण असले, तरी निधीअभावी कालव्यांची कामे रखडली आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी  संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती.
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या एक फेब्रुवारीला कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याबाबतचा प्रस्ताव शिर्डी संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने 1 डिसेंबर  रोजी मंजुरी दिली.
  • तसेच राज्य सरकारला दोन टप्प्यांत हे कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळ आणि साई संस्थान यांच्यात याबाबत करारही करण्यात आला.
व्हॉट्‌सऍपकडून लवकरच पेमेंट सुविधा देण्यात येणार:
  • फेक न्यूजप्रकरणी टीकेचा सामना केल्यानंतर ‘व्हॉट्‌सऍप‘ आता भारतात आपल्या पेमेंट सुविधेचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे प्रमुख ख्रिस डॅनियल यांनी नुकतेच रिझर्व्ह बॅंकेला पत्र लिहून याबाबतची परवानगी मागितली आहे. Whats App
  • भारतातील व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांची संख्या सुमारे 20 कोटी आहे. त्यांना पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस असून, त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्‌सऍप प्रयत्नशील आहे. ही सुविधा  सुरू करण्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर 10 लाख युझर्सद्वारे याची चाचणी घेण्यात आली आहे.
  • तत्पूर्वी व्हॉट्‌सऍपची प्रतिस्पर्धी कंपनी ‘गुगल’ने भारतात यापूर्वीच आपली पेमेंट सुविधा सुरू केली असून, रिझर्व्ह बॅंकेकडून परवानगी मिळाल्यानंतर व्हॉट्‌सऍपच्या युझर्सनाही या सुविधेचा लाभ घेता येणार  आहे.
  • दरम्यान, पेमेंट सुविधेसाठी विविध बॅंका, तसेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत बोलणी सुरू असल्याची माहिती व्हॉट्‌सऍपच्या प्रवक्‍त्याने दिली.
  • मध्यंतरी व्हॉट्‌सऍपवरील फेक संदेशांमुळे  जमावाकडून हत्यांचे प्रकार समोर आल्यानंतर व्हॉट्‌सऍपवर टीकेची झोड उठली होती. सरकारने याची दखल घेत ठोस उपाय योजनेच्या सूचना व्हॉट्‌सऍपला केल्या होत्या.
दिनविशेष:
  • 3 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक अपंग दिन‘ आहे.
  • सन 1870 मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
  • जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1882 मध्ये झाला.
  • भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 मध्ये झाला.
  • 3 डिसेंबर 1951 हा दिवस कवियत्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांचा स्मृतीदिन आहे.



०२ डिसेंबर २०१८ चालू घडामोडी

आता ड्रोनकडून होणार अवयवांची वाहतूक :
  • अवयव प्रत्यारोपणामध्ये वाहतूक कोंडीची अडचण येऊ नये यासाठी आता ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत रुग्णालयांना ड्रोनपोर्ट्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • तसेच मोठय़ा आकाराच्या ड्रोनची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यानंतर महिन्याभराने परवाने देण्यास सुरुवात होणार आहे, सध्या 2.0 या ड्रोन धोरणावर काम सुरू आहे.
  • तर मोठय़ा रुग्णालयांमध्ये हवाई मार्गिका तयार करण्यावरही विचार सुरू आहे, असे सिन्हा म्हणाले.
  • अवयव प्रत्यारोपण सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये ड्रोनपोर्ट्स तयार केल्यानंतर अवयव वाहतुकीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींचे प्रमाण कमी होणार आहे.
  • तसेच नव्या धोरणावर 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्लोबल एव्हिएशन परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (1 डिसेंबर 2018)
सुपरसॉनिक ब्राह्मोस खरेदीसाठी 3 हजार कोटी रुपये मंजूर :
  • लष्करी साहित्य खरेदीच्या 3 हजार कोटी रुपयांच्या महत्वाच्या व्यवहाराला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली.
  • तर नौदलाच्या दोन स्टेल्थ फ्रिगेटसाठी सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि लष्कराच्या अर्जुन रणगाडयासाठी एआरव्ही गाडया विकत घेण्यात येणार आहेत.
  • संरक्षण साहित्य खरेदीसंबंधी निर्णय घेणारी मंत्रालयाची सर्वोच्च समिती संरक्षण खऱेदी परिषदेने मंजुरी दिल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
  • तसेच भारत एक अब्ज डॉलर मोजून रशियाकडून दोन स्टेल्थ फ्रिगेट विकत घेणार आहे. या दोन्ही फ्रिगेटस ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असतील.
  • तर ब्राह्मोस हे भारताचे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून भारत आणि रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन :
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
  • 1989 ते 1993 या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
  • तर बिल क्लिंटन यांच्याकडून बुश यांना पराभव स्वीकारावा लागला आणि अवघ्या चार वर्षात त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले.
भारत-चीन-रशिया यांच्यात बारा वर्षांनी चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात जी-20 परिषदेत चर्चा झाली.
  • भारत,चीन आणि रशिया या देशात बारा वर्षांनंतर येथे त्रिपक्षीय चर्चा झाली असून त्यात बहुदेशीय संस्थांमध्ये सुधारणा कार्यक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • तसेच संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना या संस्थात सुधारणांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
  • खुली जागतिक अर्थव्यवस्था व बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा फायदा आर्थिक वाढ व भरभराटीसाठी व्हायला हवा असेही या वेळी सांगण्यात आले.
दिनविशेष :
  • 2 डिसेंबर – जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
  • 2 डिसेंबर 1402 मध्ये लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
  • 2 डिसेंबर 1942 मध्ये एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला

०१ डिसेंबर २०१८ चालू घडामोडी

272 उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘मोफत वायफाय’:
  • चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह  स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि 2020 पर्यंत अंतराळात असे 10 उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे.
  • 2026 पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे 272 उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून  संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल. Free Wifi
  • कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भविष्यात यातून मोठी कमाई  होऊ शकेल.
  • चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला लोकांना आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे  नेटवर्क जाईल.
  • एका अहवालानुसार, जगातील 300 कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात 7 हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या  काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे 1600 उपग्रह अंतराळात पाठवणार आहे.
  • स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड  वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (30 नोव्हेंबर 2018)
अभिनव बिंद्राला ISSF कडून मानाचा ब्लू क्रॉस पुरस्कार:
  • भारताचा माजी नेमबाजपटू आणि बिजींग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने देशाची मान आणखी एकदा उंचावली आहे. 36 वर्षीय अभिनवला ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना) कडून  मानाचाBlue Cross पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
  • नेमबाजी क्षेत्रात ब्लू क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार मिळवणारा अभिनव बिंद्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • नेमबाजी क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल  अभिनवला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल अभिनवनेही आतापर्यंत आपल्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
  • बिजींग ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकासह, अभिनव बिंद्राने 2006 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदकही पटकावले होते. याव्यतिरीक्त 7 राष्ट्रकुल खेळांची पदके आणि 3  आशियाई खेळांची पदकंही अभिनवच्या नावावर जमा आहेत. त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याचा खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभुषण या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान केला  आहे.
नेहा नारखेडे अमेरिकेतील टॉप टेक महिलांमध्ये:
  • फोर्ब्सने नुकतीच 2018 या वर्षाची औद्योगिक क्षेत्रातील टॉप 50 महिलांची यादी जाहीर केली आहे.
  • जगभरातील महिलांचा यामध्ये समावेश असला तरीही भारतीयांसाठी आणि मराठी लोकांसाठी ही यादी विशेष खास आहे. Neha
  • कारण यामध्ये चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला मराठमोळी आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी महिला आपले स्थान निर्माण करत असल्याचे  चित्र आहे.
  • नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरुणीने यामध्ये बाजी मारल्याने मराठी लोकांसाठी तर ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. नारखेडे यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्या कोफ्लूएंट या कंपनीच्या  सहसंस्थापक आहेत.
  • सुरुवातीला त्यांनी लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंदिंनिअर म्हणून काम केले. अपाची काफका हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
  • तर नेटफ्लिक्स, गोल्डमॅन सॅशे आणि उबर यांसारख्या कंपन्या नारखेडे यांच्या कंपनीच्या ग्राहक कंपन्या आहेत. नारखेडे यांचे वय अवघे 32 असून त्यांनी या यादीत 35व्या स्थान पटकावले आहे.
अनुदानित सिलिंडर तसेच विनाअनुदानित सिलिंडर स्वस्त:
  • अनुदानित सिलिंडर 7 रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडर 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
  • दिल्लीत या संदर्भातली घोषणा करण्यात आली आहे. आत्तापर्यंत अनुदानित सिलिंडर हा दिल्लीत 507 रुपये 42 पैशांना मिळत होता जो आता 500 रुपये 90 पैशांना मिळणार आहे.
  • विनाअनुदानित सिलिंडर हा 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत हा सिलिंडर 942 रुपये 50 पैशांना मिळत होता जो आता 809 रुपये आणि 50 पैशांना मिळणार आहे.
  • तसेच नव्या किंमती 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सातवा वेतन आयोग एक जानेवारी पासून लागू होणार:
  • मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.
  • विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर उत्तर दिले आहे. सरकारच्या निर्णयामुळे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सहा लाख निवृत्त  कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. केंद्राने लागू केला तेव्हापासून राज्यात देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी काही  कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले होते.
  • त्यावर सरकारने के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. येत्या 5 डिसेंबरला के.पी. बक्षी समिती अहवाल सादर करणार असून सातवा वेतन आयोग मात्र येत्या एक जानेवारी 2019 लागू करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.
अजय भूषण पांडे भारताचे नवे अर्थ सचिव:
  • देशाच्या अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते अर्थ सचिव हसमुख आधिया यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. Ajay Pande
  • पांडे हे महाराष्ट्र केडरच्या 1984 बॅचचे अधिकारी असून, आधार (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया)चे (यूआयडीएआय) या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
  • देशात बायोमेट्रिक ओळखपत्र म्हणून आधार विकसित करण्यात अजय भूषण पांडे यांचा मोठा सहभाग आहे. मागील 8 वर्षांपासून ते प्रोजेक्टशी संलग्न आहेत. त्याचबरोबर आधारला बँक खात्याशी जोडून सर्वसामान्य नागरिकाला सरकारी फायदे मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. आधारकार्डचे महत्व सर्वोच्च न्यायालयात पटवून देण्यात देखील त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
  • अजय भूषण पांडे हे आयआयटी कानपूरच्या इलेक्ट्रिकल शाखेचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहताना त्यांनी ट्रान्समिशन व वितरणात होणारी गळती थांबविण्यासाठी मोठ्या उपाययोजना राबविल्या होत्या.
  • तसेच महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सचिव म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पांना चालना देण्याचे काम त्यांनी केले आहे.
दिनविशेष:
  • 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी 1 डिसेंबर 1917 रोजी महाराष्ट्र फिल्म  कंपनीची स्थापना केली.
  • एस.एस. आपटे यांनी सन 1948 मध्ये हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
  • सन 1963 मध्ये नागालँड भारताचे 16वे राज्य झाले.
  • 1 डिसेंबर 1965 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से-बिएसएफ (BSF) ची स्थापना झाली.
  • सन 1980 मध्ये 1 डिसेंबर रोजी मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.