Jan 7, 2019

MPSC संपूर्ण माहिती

  • राज्यसेवा परीक्षा
  • पोलिस उपनिरीक्षक / सहाय्यक / विक्रीकर निरीक्षक
  • टंकलेखक / लिपीक परीक्षा

1. राज्यसेवा परीक्षा :
राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.
परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे :
गट-अ
  • Deputy Collector
  • Deputy Superintendent of Police (DySP)
  • Assistant Commissioner of Police (ACP)
  • Sub-registrar Cooperative Societies
  • Deputy Chief Executive Officer
  • Block Development Officer (BDO)
  • Tahsildar
  • Desk Officer
  • Assistant Regional Transport Officer (ARTO)
  • M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service)
  • Chief Officer (Nagarpalika) ( I & II)
  • Assistant Commissioner of Sales Tax
  • Mantralaya Section Officer
गट-ब
  • Taluka Inspector of Land Records (TILR)
  • Naib Tahsildar
परीक्षेचे स्वरूप :

  • पूर्व परीक्षा : पूर्व परीक्षेसाठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठबहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे.
  • मुख्य परीक्षा : यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात.
  • पेपर-1 : मराठी गुण-100 वेळ-तीन तास
  • पेपर-2 : इंग्रजी गुण-100 वेळ -तीन तास
मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर हे दिर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. भाषा अभ्यासक्रमात निबंध लेखन, व्यवहार, अहवाल लेखन, पत्रकार परिषद, औपचारिक भाषण तयार करणे, संवादकौशल्य, उतार्‍यावरील प्रश्न भाषांतर, सारांश लेखन व व्याकरण इ चा समावेश असेल.
  • Paper – I – History & Geography
  • Paper –II – Indian Constitution & Indian Politics (with ref. to Maharashtra)& Law
  • Paper – III – Human Resource Development (HRD) & Human Rights
  • Paper – IV – Economics of Planning & Development Science &Technology Development
चारही पेपर हे बहुनिष्ठबहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदविस्तरावरची असते, 3:1 या प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पद्धत असेल (चुकीच्या 3 उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल) प्रत्येकी पेपर 150 गुणांचाअसेल व वेळ दोन तास असतील.
  • प्रत्येक पेपर मध्ये खुल्या गटातील उमेदवारांना 45% गुण व राखीव वर्गातील उमेदवारांना 40% गुण मिळवण आवश्यक आहे.
  • मुलाखतीसाठी 100 गुण असतील.


पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI)

  • PSI, STI आणि Assistant या तिन्ही पदाकरिता पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच आहे.
  • पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) पदांसाठी पदवीधर, मराठीचे ज्ञान असणे आवश्यक
वय :
खुला गट : 18 ते 38 वर्ष
राखीव गट : 18 ते 43 वर्ष
परीक्षेचे स्वरूप :
  • पूर्व परीक्षा – 100 गुण
  • मुख्य परीक्षा – 200 गुण
  • मुलाखत – 75/50 गुण
पोलिस उपनिरीक्षकासाठी 200 गुणांची शारिरीक चाचणी घेतली जाते.
(NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत 75 गुणांची होते तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत 50 गुणांची होते.)
पूर्व परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा ही सर्व पदांसाठी सारखीच असते. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ. गटकांचा समावेश असतो.
मुख्य परीक्षेचे स्वरूप :
पोलिस निरीक्षक मुख्य परीक्षा :
  • एकूण गुण – 200
  • पेपर 1 – 100 गुण
    मराठी – 60 गुण
    इंग्रजी – 40 गुण
  • पेपर 2 – 100 गुण
यात चालू घडामोडी जगातील तसेच भारतातील, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम-2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदार्‍या, मुंबई पोलिस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा इ. घटकांचा समावेश असतो.
विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा :
  • एकूण गुण – 200
  • पेपर 1 – 100 गुण
    मराठी – 60 गुण
    इंग्रजी – 40 गुण
  • पेपर 2 – 100 गुण
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम – 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था इ. घटकांचा समावेश असतो.
सहाय्यक मुख्यपरीक्षा :

  • एकूण गुण – 200
  • पेपर – 1 : 100 गुण
    मराठी : 60 गुण
    इंग्रजी : 40 गुण
  • पेपर : 100 गुण
यात चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, महितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम -2005, संघनक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा(शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्रसरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्रचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व न्यायमंडळ इ. घटकांचा समावेश असतो.
  • पोलिस उपनिरीक्षक पुरुष शारिरीक चाचणी – एकूण गुण – 200
  • थाळीफेक (वजन 7.26 किग्रॅ, अंतर 7.5 मिटर) – गुण 40
  • पुल-अप्स – गुण 40
  • लांब उडी (4.5 मिटर) – गुण 20
  • धावणे (800 मि) 2 मि 30 सेकंद – गुण 100
  • पोलिस उपनिरीक्षक महिला शारिरीक चाचणी – एकूण गुण 200
  • थाळीफेक (वजन 4.5 किग्रॅ, अंतर 6 मिटर) – गुण 40
  • चालणे (3 किमी – 23 मि.) – गुण 80
  • धावणे (200मि 37 सेकंद) – गुण 80 
लिपिक व टंकलेखक पदाची माहिती 
मराठी व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट व 40 शब्द प्रती मिनिट या परीक्षा ज्या विद्यार्थांनी पास केल्या असतील किंवा जे टायपिंगच्या परीक्षांना बसले असतील त्यांच्या साठी ही एक चांगली संधी आहे.
पात्रता : 10 वी पास
वय : 18 ते 33 वर्ष
परीक्षेचे टप्पे : एक लेखी परीक्षा नंतर टायपिंग टेस्ट
परीक्षेचे स्वरूप :
200 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका, एकूण गुण 400
अभ्यासक्रम : मराठी व्याकरण, इंग्रजी, सायन्स ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अंकगणित
MPSC परीक्षेमध्ये मुलींना 30 % आरक्षण आहे.

No comments:

Post a Comment