Jan 7, 2019

रेल्वे परीक्षा संपूर्ण माहिती

रेल्वेतील कर्मचार्‍यांच्या एकूण चार लेव्हल आहेत. ग्रुप – अ, ग्रुप – ब, ग्रुप – क, आणि ग्रुप – ड
ग्रुप – अ :
या विभागातील कर्मचारी भरती युपीएससी कडून करण्यात येते.
ग्रुप – ब :
या विभागातील कर्मचारी ग्रुप-क मधुन पदोउन्नतीने येत असतात.
ग्रुप – क :
या भागातील कर्मचारी भरती आरआरबी कडून होत असते
आरआरबी कडून भरली जाणारी पदे पुढीलप्रमाणे :
  1. असिस्टंट स्टेशन मास्टर
  2. डॉयव्हरर्स
  3. मोटरमन
  4. गार्ड
  5. सिग्नल व मेकॅनिकल इन्स्पेक्टर इ.
  6. टीसी
ग्रुप – ड :
या परीक्षेसाठी 10 वी पास ही पात्रता आहे व त्यासाठी वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  1. ट्रॅकमॅन
  2. खलाशी
  3. गॅगमॅन
  4. टेक्निशियन
  5. पिऊन
  6. स्वीपर
परीक्षेचे स्वरूप :
लेखी व फिजिकल इफिसियन्सी टेस्ट
लेखी परीक्षा : ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. एकूण गुण 200 आणि 2 तास वेळ व चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण कापले जातात.
परीक्षेचा अभ्यासक्रम :
  1. जनरल नॉलेज / अवेरनेस
  2. भारताचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राजकारण
  3. जनरल सायन्स
  4. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणक इ.
  5. बुद्धिमत्ता  
फिजिकल इफीसीयन्सी टेस्ट :
पुरुषांसाठी 6 मिनिटात 1500 मिटर अंतर धावणे व महिलांसाठी 400 मिटर अंतर 3 मिनिटात धावणे

No comments:

Post a Comment