Oct 30, 2018

प्रशासकीय विभाग- कोकण भाग १



कोकण विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
ब्रिटीश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटीश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी असे तीनच जिल्हे होते.
कोकण विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र), उत्तरेस गुजरात राज्य व दक्षिणेस गोवा राज्य आहे.



कोकण विभागचे भारत देशामधील स्थान

देशभारत ध्वज भारत
स्थापना१ मे १९६०
मुख्यालयमुंबई
राजकीय भाषामराठी
क्षेत्रफळ३०,७४६ चौ. किमी (११,८७१ चौ. मैल)
लोकसंख्या24,807,357
प्रमाणवेळयूटीसी+०५:३०


रत्नागिरी जिल्हा:- रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.
हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.


रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमा

रत्‍नागिरी जिल्ह्यातील नद्या

काजळी, केव, गड, बोर, मुचकुंदी, वाशिष्टी, शास्त्री, सावित्री

तालुके

रत्‍नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत:
  1. गुहागर
  2. खेड
  3. चिपळूण
  4. मंडणगड
  5. दापोली तालुका
  6. रत्‍नागिरी
  7. राजापूर
  8. लांजा
  9. संगमेश्वर

दळणवळण

रत्‍नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४)

प्रेक्षणीय स्थळे

  1. आंबडवे
  2. गणपतीपुळे
  3. गणेशगुळे
  4. गुहागर
  5. चिपळूण
  6. जयगड
  7. नाणीज
  8. पावस
  9. पूर्णगड
  10. माचाळ
  11. मार्लेश्वर
  12. रत्‍नागिरी (शहर)
  13. शेरीवली
  14. संगमेश्वर

रत्‍नागिरी जिह्यातील गड-किल्ले

१.आंबोळगड

३. गोविंदगड
४. जंगली जयगड
९. भवानीगड
११. महीमंडणगड
१२. यशवंतगड
१३. रत्‍नदुर्ग

शेती

रत्‍नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजूनारळफणसआमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली (स्थापना ;१८ मे १९७२ )

राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ (१) : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग.
विधानसभा मतदारसंघ (५) : दापोलीगुहागरचिपळूणरत्‍नागिरी व राजापूर.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती

सिंधुदुर्ग जिल्हा :-

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्राम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे.सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.




प्राचीन इतिहास

भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रविड राजास द्वारकेपासून हुलकावणी देत मुचकुंद राजाच्या गुहेत लपून बसले व कालयवनाचा वध झाल्यावर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका आहॆ. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असा निष्कर्ष काढता येतो. मराठ्यांच्या पूर्वी जिल्ह्यावर आदिलशाही राजवट होती.

अर्वाचीन इतिहास

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मेइ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

चतुःसीमा

जिल्ह्यातील तालुके व नद्या

नद्या

मासेमारी

सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे.
प्रमुख मासेमारी बंदरे (८) - आचार, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट मच्छीमारांचीर लोकसंख्या - २५३६५ मत्स्यॊत्पादन - १९२७३ मेट्रिक टन. . मच्छीमार सहकारी संस्था - ३४ (एकूण सभासद १४२१६)

फुले

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर्‍हेतर्‍हेची रानफुले आढळतात. ही फुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवा आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित यांनी सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही पुस्तिका तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणार्‍या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला मिळते. ही माहिती त्या फुलांच्या बाह्य स्वरूपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदी शास्त्रीय तपशिलासह आहे.. पुस्तकात काही वेलीफुलांची रंगीत छायाचित्रे देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या, तसेच बर्‍याचशा अज्ञात अशा वैशिष्ट्यपूर्ण वेलीफुलांची माहिती देणारे हे पुस्तक कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • आचार खाडी (बेकवाटर)
  • आंबोली थंड हवेचे ठिकाण
  • कुणकेश्वर मंदिर (देवगड)
  • तेरेखोल किल्ला
  • देवगड किल्ला व दीपगृह
  • राजवाडा (सावंतवाडी)
  • विजयदुर्ग किल्ला
  • संत राऊळ महाराज मठ कुडाळ
  • सावडाव धबधबा
  • सिंधुदुर्ग किल्ला
  • सुवर्ण गणेश मंदिर मालवण

समुद्र किनारे

  • पुरळ, देवगड
  • मिठबांव, देवगड
  • तारामुंबरी, देवगड
  • आचरा, मालवण
  • तारकर्ली, मालवण
  • चिवला राजकोट, मालवण
  • देवबाग, मालवण
  • निवती, वेंगुर्ला
  • भोगवे, वेंगुर्ला


 रायगड जिल्हा :- 
रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.

सीमा
रायगड जिल्ह्याच्या

तालुके

पालघर जिल्हा :-

पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़.

नव्याने निर्माण झालेल्या या जिल्ह्यात खालील ८ तालुके असतील -
मुंबई जिल्हा :-

Jump to navigationJump to search
मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ उच्चार ऐका) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.
मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी मुंबई ही कुलाबा, लहान कुलाबा, माहीममाझगावपरळवरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण बनवली.[१] १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँकमुंबई शेअर बाजारराष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.



नाव

मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. संदर्भ हवा ] पोर्तुगीजांच्या बोम बाहीयाचे इंग्रजांनी बाँबे केले.. मुंबई, बंबई आणि बाँबे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या गगरीला हिला मुंबापुरी म्हणतात. . १९९५ मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून पुन्हा मुंबई करण्यात आले.

मुंबादेवीचे देऊळ.

इतिहास


गेटवे ऑफ इंडिया, मुंबई
मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनीबहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा-दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकलीसंदर्भ हवा ] व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.
मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्याअगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत जसे  माहीम, शींव (सायन), धारावीकुलाबावडाळाशिवडीवरळीवेसावेकफ परेड, मांडवी, चारकोप, खार, चिंबई, गोराई, मालाडमढ, वगैरे. इवलेसे|कोळी लोक.
मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. (१६६१ : १०,०० ते १६८७ : ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.
१८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले.
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कलकत्याखालोखालदुसरे मोठे शहर बनले .भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.

स्वातंत्र्य


हुतात्मा चौक
१९५५ नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि  गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे१९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले..
१९७०च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कलकत्याला मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. हिंदुह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बंबई (हिंदी भाषा) व बॉम्बे (इंग्लिश भाषा) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजीं महाराज यांचे नाव देण्यात आले.

मुंबईतील दादर येथील एक कबुतरखाना
दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वलमजी रतनशी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅन्ट रोडला, गिरगावात व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.[२]

भूगोल


मुंबईचे भारतातील स्थान
मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभागउल्हास नदीच्या मुखावर असलेल्या साल्सेट बेटांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.
मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसातानसातुळशी, विहार, लोवर वैतरणा, अप्पर वैतरणा व पवई. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व मिठी नदी(ऊर्फ माहीम नदी) तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि विरारजवळ समुद्राला मिळते. माहीम नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.

हवामान

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात(मार्च ते ऑक्टोबरतापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मॉन्सूनचा पाऊस मुंबईला जून ते सप्टेंबरपर्यंतझोडपतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६२००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.
नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ३८° से. ते किमान ११° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७.४°से असे नोंदवले गेले आहे. हवा खूप गरम असते pavsalyat
मुंबईच्या तापमानाचा आलेख.
मुंबईच्या तापमानाचा आलेख.

अर्थव्यवस्था


मुंबई समभाग बाजार
मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १०% कारखाना-रोजगार (Factory employment), ४०% प्राप्तिकर, २०% केंद्रीय कर (Central excise), ६०% आयात कर, ४०% परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजारभारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न भारतीय रूपया९,१९,६०० कोटी इतके होते व प्रती व्यक्ती आय भारतीय रूपया१,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.
१९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.
मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.

प्रशासन

महानगर प्रशासन


बृहन्मुंबई महानगरपालिका
मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहराचे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो.
मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात.

जिल्हा प्रशासन

मुंबई शहर महाराष्ट्राच्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा(जमीनजुमल्याच्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व

मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.

महानगर पोलिस यंत्रणा

मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असून शहर सात पोलिस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागाचे प्रमुख म्हणून पोलिस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलिस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे.

न्याय यंत्रणा

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीवदादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय(Sessions Court) आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत.

वाहतूक व्यवस्था


मुंबईच्या उपनगरीय गाड्या
मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.

रस्ता

मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र ३, राष्ट्रीय महामार्ग क्र ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरु आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी महामार्ग सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: १) पूर्व द्रुतगती मार्ग (सायन ते ठाणे). २) पूर्व मुक्तमार्ग (फोर्ट ते घाटकोपर) ३) सायन पनवेल द्रुतगती मार्ग (सायन ते पनवेल). ४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते बोरीवली).
मुंबईच्या बेस्ट (Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) कंपनीच्या) बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट नवी मुंबईमीरा-भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नव्या मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे, दिंडोशी व बोरीवलीपर्यंत चालवते.
मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८% लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते.

रेल्वे

मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेग-वेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिममध्य व हार्बर.
२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५०० हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व ९, १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपोदरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंतचे काम चालू आहे.
भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारतातील इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदादरलोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस), मुंबई सेन्ट्रलवांद्रे टर्मिनस ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात.

वायुमार्ग

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. जुहू विमानतळ हा भारतातील पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.

जलमार्ग

मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारतातील सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५% ते ६०% मालवाहतूक येथून होते. मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे

नागरी सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्याची गरज पडते पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते.या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्याची गळती वा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो देवनार, मुलुंड व गोराईतील डंपिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते.
बेस्टमहावितरण व रिलायन्स एनर्जी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्तीमार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक वाढत चालला आहे व काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल्.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल.टाटा उद्योगसमूहरिलायन्स मोबाईलएअरटेल, व्होडाफोन, एअरसेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात.

लोकजीवन


मुंबई शहर: 'चौपाटी' किनाऱ्यावरुन दिसणारे दृश्य
मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.
मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - मराठी असून कोळी, कोकणीहिंदीइंग्रजी,या भाषादेखील बोलल्या जातात.
मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.
विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरीबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.

असामाजिक तत्त्वे

१९९२-१९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्याच (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बाँबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकी हल्ला होता.

धर्म

इतरात शिख व पारसी चा समावेश
धर्मप्रमाण
हिंदू
  
65.99%
मुस्लिम
  
20.65%
बौद्ध
  
4.85%
जैन
  
4.10%
ख्रिश्चन
  
3.27%
इतर
  
1.15%
२०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची धार्मिक लोकसंख्येत हिंदू (६५.९९%), मुस्लिम (२०.६५%), बौद्ध (४.८५%), जैन (४.१०%), ख्रिश्चन (३.२७%),[३][४][५]शिख (०.५८%) आणि बाकी पारशीयहूदी व निधर्मी आहेत.[३][६] भाषावार जनसंख्येत मराठी मराठा लोक ४२%, हिंदी, गुजराती लोक १९% व बाकी अन्य भाषी लोक आहेत.

मुंबईकर आणि मुंबईची संस्कृती


मुंबईच्या बाजारपेठेतील एक दृश्य
मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात. तसेच मुंबईला स्वप्ननगरी असे म्हणतात. मुंबईचे डबेवाले प्रसिद्ध आहेत.
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.
मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.
मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेत. जहांगीर कलादालन , एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छ्त्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.
न्यूयॉर्कमधील ्रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[७]

मुंबईची बम्बय्या हिंदी

मुंबईत एक खास हिंदीची बोली बोलली जाते, तिला बम्बय्या हिंदी म्हणतात. त्यांतही सामान्य माणासांची बम्बय्या हिंदी आणि गुंडांची हिंदी/भाईलोकांची हिंदी यांसारखे काही भेद आहेत:-

भाईलोकांची हिंदी

‘क्या रे कोमथा बिमथा करेली. ए टायनिज अँटम टिल्लम. हापमरद ठिक से बैठ.‘
‘गुजरात्याला माहीत आहे/एक चहा एक कोल्डींग्स/ बस हँन्डल हुआ ना भाय कस्टमर’
‘चिल्लर पार्टीसे जगण्या बोलेला है, दस का खोका भेज देणे का. आपण से पंगा महंगा पडेगा तेरी मॉ की तो. झिंग्या लाल्या बच्चन हसरैला है. तेरा एड्रेस निकालुंगा ठोक डालूंगा’

प्रसारमाध्यमे

मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृतपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृतपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए, हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृतपत्रे महाराष्ट्र टाइम्ससकाळलोकसत्तासामना व नवा काळ अशी आहेत. भारतातील इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात.
दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच्‌ सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार नेटवर्क, झी नेटवर्क व सोनी टीव्ही या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. झी मराठीई टीव्ही मराठी व सह्याद्री वाहिनी ह्या मराठी वाहिन्या मराठी प्रेक्षकांना सेवा पुरवतात.
मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत.

शिक्षण

मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर बाकी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएस्‌ई) / आयसीएस्‌ई बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.संदर्भ हवा ] भारतातील १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कलावाणिज्य किंवा शास्त्र शाखेत) प्रवेश घेतात. १२वी नंतर साधी पदव्युत्तर पदविका (पदवी) किंवा अभियांत्रिकीकायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. आय. आय. टी, मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट(व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI) व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटत आहे. ही चिंतेची बाब आहे.

खेळ

क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. त्याचबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. सुनिल गावसकरसचिन तेंडुलकर हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचेच.
फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकीटेनिसस्क्वॉशबिलियर्ड्सबॅडमिंटनटेबल टेनिसडर्बीरग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. वॉलीबॉलबास्केटबॉल हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे.

उपनगरे

मुंबईविषयी लिहिली गेलेली पुस्तके

ललित

  • Breathless in Bombay (मर्झबान एफ. श्रॉफ- २००९)
  • Family Matters (रोहिन्टन मिस्त्री- २००२)
  • Maximum City: Bombay Lost and Found (सुकेतू मेहता-२००४)
  • Midnight's Children (सलमान रश्दी- १९८१)
  • Mumbai Fables (ग्यान प्रकाश)
  • Ravan & Eddie (किरण नगरकर- १९९४)
  • Shantaram (ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्‌स- २००३)
  • अधांतर (गिरणगावावरचं नाटक) लेखक - जयंत पवार
  • जिंकून हरलेली लढाई (सचिन वाझे)
  • मुंबई...बंबई... बाँबे (कवितासंग्रह - बाळासाहेब लबडे)
  • राडा (कादंबरी) लेखक - भाऊ पाध्ये
  • लालबाग परळ (मराठी चित्रपट)

ललितेतर

  • Alice in Bhuleshwar: Navigating a Mumbai Neighbourhood (कैवान मेहता)
  • Love and Longing in Bombay (विक्रम चंद्र- १९९७)
  • Beautiful Thing: Inside the Secret World of Bombay's Dance Bars (सोनिया फालेरो)
  • Behind the Beautiful Forevers : Life, Death and Hope in a Mumbai Undercity (कॅथरीन बू-२०१२)
  • Black Friday: The True Story Of The Bombay Bomb Blasts (एस. हुसेन झैदी)
  • Bombay (सॅम्युअल शेपर्ड-१९३२)
  • Bombay and Western India (खंड १ला, जेम्स डग्लस-१८९३)
  • Bombay Cinema: An Archive of the City (रंजनी मजुमदार)
  • Bombay-Gateway of India, (प्रकाशक : द रोटरी क्लब ऑफ इंडिया-१९३६)
  • Bombay, Meri Jaan (संपादक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस- २००३)
  • Bombay A Photorama 1661–1931 (मुंबई महापालिका प्रकाशन)
  • Bombay Place Names and Street names (एस.टी. शेपर्ड-१९१७)
  • Bombay-Poona Souvenir (खंड २१वा, इंडियन सायन्स काँग्रेस-१९३४)
  • Bombay: The Cities Within (शारदा द्विवेद्वी)
  • Bombay Then and Mumbai Now (नरेश फर्नांडिस आणि जिम मॅसेलॉस)
  • Censorship and Sexuality in Bombay Cinema (मोनिका मेहता)
  • City Of Gold : The Biography Of Bombay (गिलियन टिंडॉल)
  • The Gazetteer of Bombay City and Island (सरकारी प्रकाशन, ३ खंड-१९०९)
  • Glimpses of India (जे.एच. फरनॉक्स-१८९५)
  • Govind Narayan's Mumbai: An Urban Biography from 1863 (संपादक : मुरली रंगनाथन)
  • Guide to Bombay (जे.एम. मॅक्लीन-१८९९)
  • History of Bombay 1661–1708 (एम.डी. डेव्हिड-१९७३)
  • In the Mission Field (प्रकाशक : दमणची बिशपरी-१९२५)
  • Jamsetji Jejeebhoy (जे.आर.पी. मोदी-१९५९)
  • Mafia Queens Of Mumbai: Stories Of Women From The Ganglands (एस. हुसेन झैदी)
  • Old and New Bombay-A historical and descriptive account of Bombay and its environs (प्रकाशक : जी. क्लॅरिज-१९१७)
  • Once Was Bombay (पिंकी विराणी)
  • One Hundred Years One Hundred Voices: The Millworkers Of Girangaon (एम.मेनन)
  • Opium City: The Making Of Early Victorian Bombay (अमर फरूकी)
  • Peoples of Bombay (पर्सिवल स्ट्रिप आणि ऑलिव्हिया स्ट्रिप, प्रकाशक : ठाकर ॲन्ड कंपनी लिमिटेड-१९४४)
  • Port of Bombay (प्रकाशक : मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष डब्ल्यू.एच. नील्सन)
  • Riots and After in Mumbai: Chronicles of Truth and Reconciliation (मीना मेनन)
  • Sentries of Mumbai (मुंबई विद्यापीठ)
  • Shells from Island of Bombay (डी.ई. वाच्छा-१९२०)
  • Views of Bombay -Old and New (टाइम्स ऑफ इंडिया प्रेस)
  • Why Loiter?: Women and Risk on Mumbai Streets शिल्पा फडके, समीरा खान आणि शिल्पा रानडे)
  • Zero Point Bombay: In and Around Horniman Circle (कमला गणेश, उषा ठक्कर आणि गीता चढ्ढा-२००८)
  • उत्तर कोकणचा प्राचीन इतिहास (रावबहाद्दुर पु.बा. जोशी-१९२६)
  • एक्सप्रेस टॉवरवरून (अप्पा पेंडसे)
  • प्रिय मुंबई (मधुवंती सप्रे - राजहंस प्रकाशन, २०१६)
  • माझी मुंबई (वा.वा. गोखले)
  • मुंबई आणि मुंबईकर (गंगाधर गाडगीळ)
  • मुंबई ON Sale (प्रकाश अकोलकर-२०१३)
  • मुंबईचे वर्णन (गोविंद नारायण माडगावकर- १८६३)
  • मुंबई छायाचित्र दर्शन १६६१-१९३१ (मुंबई महापालिका प्रकाशन)
  • मुंबई नगरी (न.र. फाटक)
  • वृक्षराजी मुंबईची (डॉ. कमलाकर हिप्पळगावकर); प्रकाशक : मुग्धा कर्णिक
  • सफर... मुंबईच्या वृक्षतीर्थांची (प्रकाश काळे)
  • २६/११, मुंबईवरील हल्ला (संपादक : हरिंदर बावेजा. अनुवाद - प्रा. मुकुंद नातू

मुंबई उपनगर :-

Jump to navigationJump to search

मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान
मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.

तालुके[संपादन]

मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला तालुकाबोरीवली तालुका व अंधेरी तालुका हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. Borivali हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

पर्यटनस्थळे[संपादन]

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मार्वे व मनोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुंफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.
या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात गिल्बर्ट हिल नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरिकेतील डेव्हिल्स टॉवर सारखी आहे. मात्र डेव्हिल्स टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अतिकठीण दगडापासून बनलेली आहे. या दृष्टिकोनातून ही टेकडी जगातील अशा प्रकारची एकमेव टेकडी ठरते
ठाणे जिल्हा :-

ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नविन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

चतुःसीमा 

तालुके


ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरीलएक स्थानक आहे.


    इतिहास

    ठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूसताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.
    पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासूनस्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ,मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.
    ठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.

    भौगोलिक स्थान 

    ठाणे is located in मुंबई
    ठाणे
    ठाणे
    ठाणे लोहमार्ग स्थानक
    ठाणे हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर असेही म्हणतात. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत.

    संस्कृती

    ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.
    ठाण्यात दही हंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो. येथे ठाणे शहर, मुंबई व उपनगरातून गोविंदा पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात.
    कुंजविहार आणि राजमाता ह्यांचे वडापाव आणि टिप-टॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहेत. 2015 साली 'मेतकूट' नावाचे उपहारग्रृह नौपाडा, घंटाली येथे सुरू झाले. महाराष्ट्राच्या सर्व प्रांतातील ( कोकण, पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ) खाद्यपदार्थ या एकाच ठिकाणी उपलब्ध झाले.
    ठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.

    वाहतूक व्यवस्था

    ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वहातूक व्यवस्था पुरवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून आणि ठाणे पूर्व स्थानकापासून मुंबईत बससेवा पुरवते. नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदणी नाक्यापासून नवी मुंबईत बससेवा पुरवते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवलीभायंदरपनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.
    ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरु झाली आहे.

    पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे

    गडकरी रंगायतन, मासुंदा तलावराम मारूती रस्तायेऊर, उपवन, कोपनेश्वर मंदिर, वर्तकनगर साई बाबा मंदिर, घंटाली मंदीर


    No comments:

    Post a Comment