नमूना पहिला –
उदा .
795421 ऊया संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती?
795421 ऊया संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती?
- 9,000
- 900
- 90,000
- 9,00,000
उत्तर : 90,000
स्पष्टीकरण :
अंकाची स्थानिक किंमत लिहिताना त्या अंकापुढे जेवढे अंक येतात. तेवढे शून्य त्या अंकापुढे लिहिणे.
यानुसार 9 च्या पुढे 4 अंक आहेत म्हणून 90,000.
नमूना दूसरा –
उदा .
4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
- 330
- 270
- 170
- 280
उत्तर : 270
स्पष्टीकरण :
समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 9 च्या पटीत असतो.
43322 9 ×3 = 27
270
उदा. 564863 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 59940
6×9=54 मधले अंक 9 ने भरा व पुढील अंक 0 ने भरा.
नमूना तिसरा –
उदा .
8**3 या चार अंकी संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता?
8**3 या चार अंकी संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता?
- 7
- 8
- 9
- 4
उत्तर : 8
स्पष्टीकरण :
स्थानिक किमतीतील फरक हा संख्येतील पहिल्या अंकाच्या पुढील अंक येतो.
उदा. 720 7 च्या पुढील अंक 8 येईल.
नमूना चौथा-
उदा .
35132 या संख्येतील 3 च्या नंतर येणार्याी 5 ची स्थानिक किंमत ही 1 नंतर येणार्या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
35132 या संख्येतील 3 च्या नंतर येणार्याी 5 ची स्थानिक किंमत ही 1 नंतर येणार्या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
- 10
- 1000
- 100
- 10000
उत्तर : 100
स्पष्टीकरण :
पट काढताना दिलेल्या पहिल्या अंकाच्या पुढे कितव्या स्थानावर तो अंक येतो.
हे मोजून 1 वर तेवढे शून्य देणे.
उदा. 5 च्या पुढे दुसर्या स्थानावर शतकाचा 5 येतो. म्हणून 1 वर 2 शून्य = 100
नमूना पाचवा –
उदा .
5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?
5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?
- 1000
- 100
- 10000
- 10
उत्तर : 100
स्पष्टीकरण :
5 अंकी लहानात लहान संख्या 10000 आहे.
3 अंकी लहानात लहान संख्या = 100
:: 10000÷100=100 किंवा 5-3=2 फरकाएवढे शून्य 1 वर देणे 100
नमूना सहावा-
उदा .
खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?
खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?
- 2354
- 21753
- 54213
- 62301
उत्तर : 54213
स्पष्टीकरण :
ज्या संख्येतील दिलेल्या अंकापुढे सर्वात जास्त अंक येतील त्या अंकाची त्या संख्येतील स्थानिक किंमत सर्वात जास्त असते
No comments:
Post a Comment