Oct 26, 2018

अंकगणित भाग ६

1) कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.
  • उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)
  • 125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा.
  • 500 चे 30% = 150     
  • 500 चे 10% = 50   
  • 30% = 10%×3
  • = 50×3 = 150
  • 500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)
  • 500 ची 1% = 5
  • :: 500 चे 8% = 40
2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.
  • उदा. 368 चे 12.5% = ?
  • 368×12.5/100
  • = 368×1/8= 46
3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.
  • उदा. 465 चे 20% = 93    
     
  • 465×20/100
  • = 465×1/5 ने गुणा = 93
4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.
  • उदा. 232 चे 25% = 58
  • 232×25/100
  • = 232×1/4= 58
5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.
  • उदा. 672 चे 37.5% = 252    
     
  • 672×37.5/100
  • = 672×3/8
  • = 252
6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.
  • उदा. 70 चे 50% = 35   
     
  • 70×50/100
  • = 70×1/2
  • = 35
7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.
  • उदा. 400 चे 62.5% = 250  
       
  • 400×62.5/100
  • = 400×5/8
  • = 250
8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.
  • उदा. 188 चे 75% = 141  
       
  • 188×3/4
  • = 141
9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.
  • उदा. 888 चे 87.5% = 777  
       
  • 888 × 87.5/100
  • = 888×7/8
  • = 777
10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.
  • उदा. 25 चे 25% = 6.25
  • 25 × 25/100
  • = 625/100
  • = 6.25
 नमूना पहिला –
उदा.
2400 पैकी 144= किती टक्के?
  1. 8%
  2. 6%
  3. 5%
  4. 4%
उत्तर : 6%
स्पष्टीकरण :-
टक्के (%) = 144×100/2400=144/24 = 6%
 नमूना दूसरा –
उदा.
X चे 7% = 126; तर X=?
  1. 1600
  2. 1800
  3. 1500
  4. 1400
उत्तर : 1800
स्पष्टीकरण :-
X × 7/100=126      
:: X=126×100/7=18×100 = 1800
 नमूना तिसरा –
उदा.
1500 चे 40% = X चे 8%;  :: X=?
  1. 6000
  2. 9000
  3. 7500
  4. 8500
उत्तर : 7500
स्पष्टीकरण :-
1500×40/100=X×8/100  
:: 1500×40=X=8
:: X=1500×40/8=1500×5=7500     किंवा
तोंडी काढताना     8 ची 5 पट = 40, यानुसार 1500 ची 5 पट = 7500 
 नमूना चौथा –
उदा.
1200 चे 8% = 400 चे किती टक्के?
  1. 16%
  2. 24%
  3. 20%
  4. 18%
उत्तर : 24%
स्पष्टीकरण :-
:: X=1200×8/100=400×X/100        
 :: 1200×8=400×X
:: X=1200×8/400=3×8=24%         
किंवा
तोंडी काढताना 400 ची 3 पट = 1200 आणि 8 ची 3 पट = 24%
 नमूना पाचवा –
उदा.
A ला B पेक्षा 10% गुण जास्त मुळाले, तर B ला A पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले ?
  1. 10%
  2. 9%
  3. 9 1/11%
  4. 11 1/11%
उत्तर : 9 1/11%
सूत्र :
B ला A पेक्षा टक्के कमी गुण = 100×टक्के/100+टक्के = 100×10/100+10= 1000/110 = 9 1/11%
 नमूना सहावा –
उदा.
A ला B पेक्षा 10% गुण कमी मिळाले, तर B ला A पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले ?
  1. 9 1/11%
  2. 10%
  3. 11 1/9%
  4. यापैकी नाही  
उत्तर : 11 1/9%
सूत्र :-
B ला A पेक्षा टक्के जास्त गुण = 100×टक्के/100-टक्के = 100×10/100-10 = 1000/90 = 100/9 = 11 1/9%
 नमूना सातवा –
उदा.
एका परिक्षेत 30% विधार्थी गणितात नापास झाले. 20% विधार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विधार्थी दोन्ही विषयांत नापास झाले, तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विधार्थी उत्तीर्ण झाले?
  1. 40%
  2. 30%
  3. 70%
  4. 60%
उत्तर : 60%
क्लृप्ती :-
परिक्षेत नापास झालेल्यांची टक्केवारी =                       (गणितात नापास) +     (इंग्रजीत नापास)  – (दोन्हीविषयांत नापास)
केवळ गणितात नापास विधार्थी %=30-10=20%                   30%     +        20%           –    10                   = 40%
इंग्रजीत नापास विधार्थी %=20-10=10%        
दोन्ही विषयात मिळून नापास %=10%                                       गणित नापास →  (30%)
:: परिक्षेत नापास विधार्थ्यांची टक्केवारी = 40%                             इंग्रजी नापास →   (10%)
:: उत्तीर्ण विधार्थ्यांची टक्केवारी = 60%                                     दोन्ही विषयात नापास → (20%)      
 नमूना आठवा –
उदा.
150 चा शेकडा 60 काढून येणार्‍या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?
  1. 96
  2. 54
  3. 90
  4. 30
उत्तर : 96
स्पष्टीकरण :
150 चे 60% = 90     90 चे 60% = 54
:: 150-54 = 96
 नमूना नववा –
उदा.
एका परिक्षेत 70% विधार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विधार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विधार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विधार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर त्या परीक्षेस एकूण किती विधार्थी बसले होते?
  1. 7500
  2. 5000
  3. 6000
  4. 8000
उत्तर : 5000
स्पष्टीकरण :-
                   इंग्रजी     गणित     दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण     परिक्षेत एकूण अनुत्तीर्ण विधार्थी %=
उत्तीर्ण           70%      65%      25%                        30+35-25 = 40%    
अनुउत्तीर्ण       30%      35%                 
:: परिक्षेत एकूण अनुउत्तीर्ण विधार्थी = 40%
:: उत्तीर्ण विधार्थी = 100-40 = 60%
    :: 60% विधार्थी = 3000
    :: एकूण विधार्थी = 3000×100/60 = 5000
 नमूना दहावा –
उदा.
एका गावाची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% ने वाढते, तर 3 वर्षांनंतर ती किती होईल ?
  1. 15,297
  2. 15,792
  3. 15,972
  4. 15,927
उत्तर : 15,972
वर्ष (n)    मुद्दल (P)    दर (R)    व्याज (I)    रास (A)
1    12,000    10%    1200    13,200
2    13,200    10%    1320    14,500
3    14,500    10%    1452    15,972 15,927
सूत्र :-
A=P×(1+r/100)n :: A=12,000×(11/10)3
= 12,000×1331/1000=1331×12=15,972
 नमूना अकरावा –
उदा.
एका गावची लोकसंख्या 3,630 आहे, ती दर 10 वर्षानी 10% ने वाढते; तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?
  1. 2,500
  2. 3,000
  3. 3,300
  4. 2,904
उत्तर : 3,000
क्लृप्ती :-
P= A/(1×r/100)n     ∷ P= 3630/((11/10)2 )=(3630/11)/10×11/10  
∷ 3,630×10/11×10/11=3,000
 नमूना बारावा –
उदा.
एका खोलीचे भाडे शे. 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनंतर शे. 25 ने वाढविले, तर मूळ भाडयात शेकडा वाढ किती झाली?
  1. 20%
  2. 45%
  3. 25%
  4. 50%
उत्तर : 50%
स्पष्टीकरण :-
मूळ भाडे 100 मानू     20% वाढ = 120 वर पुन्हा 25% वाढ = 120 ×25/100=30
मूळ भाडयातील वाढ = 20+30 = 50%
नमूना तेरावा –
उदा.
एका पुस्तकाची किंमत शे. 20 ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला. तर पूर्वीच्या उत्पन्नात शे. कितीने फरक पडला?
  1. 20% कमी
  2. 25% जास्त
  3. 25% कमी
  4. फरक नाही
उत्तर : फरक नाही
स्पष्टीकरण :
100 प्रतींची 100 रु. किंमत मानू  100-20=80रु.   100 प्रती = 80 रु.
तर 125 प्रती = 125/100×80/1=100  आताचे उत्पन्न – पूर्वीचे उत्पन्न = फरक
= 100-100 = 0
 नमूना चौदावा –
उदा.
साखरेची किंमत शे. 60 वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
  1. 37.5%
  2. 60%
  3. 40%
  4. 20%
उत्तर : 37.5%
सूत्र :
(100×टक्के )/(100+60 )=(100×60 )/(100+60 )=(100×60 )/160=6000/160=37.5%   
नमूना पंधरावा –
उदा.
3/5%  हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल?
  1. 0.6
  2. 0.006
  3. 0.06
  4. 60.0
उत्तर : 0.006
स्पष्टीकरण :
प्रथम व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा व नंतर 100 ने भागा.
अथवा
दोन स्थळांनंतर डावीकडे दशांश चिन्ह धा. 3/5%=0.6/100=0.006
 नमूना सोळावा –
उदा.
7/12  चे 6%=किती ?
  1. 0.35
  2. 0.035
  3. 3.5
  4. 0.0035
उत्तर : 0.035

No comments:

Post a Comment