Oct 25, 2018

HOME ASSIGNMENT NO.09


                         
                             मराठी व्याकरण 


प्र.१.ला. जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
प्र.२ रा .एकापुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला ......जोडणे म्हणतात?
प्र.३ रा .मध्ये उभा दंड असणारी व्यंजने किती?
प्र.४ था. अर्धा दंड असणारी पण अर्धी न होऊ शकणारी व्यंजने किती?
प्र.५ वा.'र' व्यंजन लिहिण्याच्या लिपी लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
प्र.६ वा .एकाक्षरी शब्दांतील 'अ ' चा उच्चार ............ होतो? 
प्र.७ वा .प्रत्येक स्वराचे .........उच्चार आहेत.
प्र.८ वा .संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांतील .........'अ ' हा पूर्णोच्चरित असतो.
प्र.९ वा .आकारान्तपूर्वीचे स्वर मराठीत ............ उच्चारले जातात.
प्र.१०वा .चार अक्षरी शब्दांतील ........अक्षरातील 'अ ' अपूर्ण उच्चारला जातो.
प्र.११वा .'ज्ञानेंद्रिय 'या शब्दाची फोड व करा.
प्र.१२वा.'गृहपाठ' या शब्दाची फोड करा.
प्र.१३वा .स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात तर व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात हे विधान.......आहे.
प्र.१४वा .'गवत ' या शब्दात किती 'अ ' आहेत?
प्र.१५वा .आकारान्ताखेरीज इतर शब्दातील .........अक्षर 'अ ' युक्त असेल तर ते अपूर्ण उच्चारले जाते.

No comments:

Post a Comment