Oct 26, 2018

अंकगणित भाग ७

  • ल.सा.वि. म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या (LCM) दिलेल्या संख्यानी ज्या लहांनात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे त्यांचा ल.सा.वि. होय
  • ल.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी मोठी संख्यांच असते.
  • उदा. 12 व 18 चा ल.सा.वि. 36.
          12 = 2×6 = 2×2×3 
         18 = 2×9 = 2×3×3  
                        = 2×2×3×3
म.सा.वि. (महत्तम साधारण विभाजक) :-
  • म.सा.वि. म्हणजे महत्तम साधारण विभाजक संख्या (HCM) दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक म्हणजे त्यांचा म.सा.वि. होय.
  • म.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी लहान संख्याच असते.
  • उदा. 12 व 18 चा म.सा.वि. = 6
          12 = 2×2×3     
         18 = 2×3×3     
             = 2×3
             = 6

  • दोन संख्यांचा गुणाकार = ल.सा.वि. × म.सा.वि
  • ल.सा.वि. = दोन संख्यांचा गुणाकार / म.सा.वि.
  • म.सा.वि. = दोन संख्यांचा गुणाकार / ल.सा.वि.
  • पहली संख्या = ल.सा.वि. × म.सा.वि. / दुसरी संख्या
  • दुसरी संख्या = ल.सा.वि. × म.सा.वि. / पहिली संख्या
  • दोन संख्यांतील असामाईक अवयवांचा गुणाकार = ल.सा.वि. / म.सा.वि.
  • दोन संख्यांपैकी लहान संख्या = म.सा.वि. × लहान असामाईक अवयव
  • दोन संख्यांपैकी मोठी संख्या = म.सा.वि. × मोठी असामाईक अवयव
  • व्यवहारी अपूर्णांकांचा ल.सा.वि. = अंशांचा ल.सा.वि./ छेदांचा म.सा.वि.
उदा. 2/5, 4/10, 6/15     
यांचा ल.सा.वि. = 2, 4, 6 चा ल.सा.वि. / 5,10,15 चा म.सा.वि. = 12/5

नमूना पहिला –
दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?
  1. 80
  2. 48
  3. 32
  4. 16
उत्तर : 48
क्लृप्ती :-
ल.सा.वि.×म.सा.वि./एक संख्या = दुसरी संख्या, या सूत्रानुसार 192×16/64 = 48

नमूना दूसरा –
दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा म.सा.वि. 23 आहे. तर त्या संख्यांचा ल.सा.वि. किती?
  1. 134
  2. 128
  3. 138
  4. 118
उत्तर : 138
क्लृप्ती :-
दोन संख्यांच्या गुणाकार/म.सा.वि. = ल.सा.वि. = 3174/23 = 138
क्लृप्ती :-
दोन संख्यांचा गुणाकार/ल.सा.वि. =  म.सा.वि.

नमूना तिसरा –
दोन संख्यांचा म.सा.वि. 25 व ल.सा.वि. 350 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
  1. 45
  2. 175
  3. 35
  4. 50
उत्तर : 50
क्लृप्ती :-
ल.सा.वि.×म.सा.वि. = दोन संख्यांचा गुणाकार
मोठी संख्या = म.सा.वि. × मोठ्या असमाईक अवयव = 25×7 = 175
लहान संख्या = म.सा.वि. × लहान असमाईक अवयव = 25×2 = 50
सूत्र:-
ल.सा.वि./म.सा.वि.  = असामाईक अवयवांचा गुणाकार
:: 350/25 = 14 = 7×2

नमूना चौथा –
दोन संख्यांचा गुणाकार 270 व म.सा.वि. 3 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
  1. 18
  2. 15
  3. 12
  4. 24
उत्तर : 15
क्लृप्ती :-
गुणाकार./म.सा.वि.  = ल.सा.वि.  270/3  = 90
असमाईक अवयवांचा गुणाकार = ल.सा.वि./म.सा.वि. = 90/3 = 30 = 5×6
लहान संख्या = म.सा.वि. × लहान असामाईक अवयव यावरून लहान संख्या = 5×3 =15

नमूना पाचवा –
अशी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती, कि जिला 5,12 व 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात?
  1. 120
  2. 124
  3. 240
  4. 180
उत्तर : 124
स्पष्टीकरण :-
5, 12, 15 चा ल.सा.वि. = 60 ही दोन अंकी संख्या आहे.
म्हणून 60×2 = 120+4 = 124 ही तीन अंकी संख्या उत्तर येईल.

नमूना सहावा –
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, कि जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते व 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते?
  1. 149
  2. 135
  3. 137
  4. 133
उत्तर : 137
स्पष्टीकरण : –
12, 16 व 18 यांचा ल.सा.वि. = 144
:: 144-7 = 137
[12-5 = 7, 16-9 =7, 18-11 = 7]


नमूना सातवा –
एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते व 10 ने भागल्यास बाकी 9 उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती?
  1. 89
  2. 180
  3. 178
  4. 144
उत्तर : 178
स्पष्टीकरण :-
9 व 10 चा ल.सा.वि. = 90
उदाहरणातील माहितीप्रमाणे  
9-8=10-9=1 यानुसार 90-1=89
:: संख्येची दुप्पट
सूत्र :-
अपूर्णाकांचा ल.सा.वि. = अंशांचा ल.सा.वि./छेदांचा म.सा.वि.

नमूना आठवा –
दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून, त्यांचा म.सा.वि 16 आहे व ल.सा.वि. 96 आहे. तर x = किती ?
  1. 16
  2. 32
  3. 8
  4. 12
उत्तर : 8
स्पष्टीकरण :
दोन संख्यांचा गुणाकार = ल.सा.वि. × म.सा.वि.
:: 4x × 6x = 96×16
:: 24×2 = 96×16  x2 = 64

No comments:

Post a Comment