May 7, 2019

7 May 2019 Current Affairs

सजीवांच्या 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर :
  • पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला मानवाची कृत्येच कारणीभूत आहेत, पण यातून सरतेशेवटी माणसाचेच नुकसान होणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या स्टेट ऑफ नेचर या
    मूल्यमापनात म्हटले आहे.
  • तसेच माणसांनी वने, महासागर, जमीन, हवा हे सगळेच धोक्यात आणले असून हवामान बदलांइतकाच हा धोका महत्त्वाचा आहे असे 132 देशांच्या साडेचारशे तज्ञांच्या बैठकीचे अध्यक्ष रॉबर्ट वॉटसन यांनी सांगितले.
  • तर येत्या दहा वर्षांत किमान 1 लाख प्राणी व वनस्पती नष्ट होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
  • गेल्या 10 दशलक्ष वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टीची जेवढी हानी झाली नाही त्यापेक्षा दहा ते शंभर पट वेगाने हानी आता सुरू आहे. त्यामुळे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉर्स मेले होते त्यानंतरची ही सर्वात मोठी हानी असणार आहे.
    ज्या पद्धतीने आपण उत्पादन करतो, वापरतो, त्या सर्व घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर हे नष्टचर्य सुरूच राहील.
  • संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केलेला अहवाल 1800 पानांचा असून त्यात 15 हजार स्रोतांचा वापर करण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्येही एका अहवालात हवामान विज्ञान समितीने म्हटले होते की, सामाजिक स्थित्यंतरे झाल्याशिवाय तापमान वाढ 1.5 अंशांच्या टप्प्यात ठेवणे शक्य नाही. आधीच तापमान वाढ 12 अंश सेल्सियस झाली असून शतकअखेरीस ती 3 अंशांनी वाढणार आहे.
ओदिशाला केंद्राकडून एक हजार कोटी रुपयांची मदत :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॅनी वादळाचा फटका बसलेल्या ओदिशाची हवाई पाहणी करून मदत कार्यासाठी आणखी एक हजार कोटींची मदत जाहीर केली.
  • किनारी राज्यांसाठी आपत्ती दीर्घकालीन आपत्ती निवारण योजना आखण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे. फॅनी वादळाने ओदिशाला झोडपून काढले त्यात 34 बळी गेले होते.
  • तसेच फॅनी वादळाची चाहूल लागताच केंद्राने राज्याला 381 कोटी रुपये मंजूर केले होते असे सांगून मोदी म्हणाले की, राज्याची गरज लक्षात घेऊन वेगाने मदतकार्य करण्यासाठी 1000 कोटी मंजूर करण्यात येत आहेत.
CBSE निकाल जाहीर, 91.1 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण :
  • CBSE 10th Result 2019 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
  • तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण 4.40 टक्क्यांनी वाढले आहे. यंदा दहावीचा निकाल 91.1 टक्के लागला आहे.
  • तर पास होण्याचे प्रमाण दरवर्षी कमी होण्याची 2014 पासूनची प्रथा यंदा खंडित झाली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला निकाल लागला आहे. अर्थात, 2017 चा विचार केला तर यंदा लागलेला निकाल तसा कमीच आहे.
  • यंदाच्या वर्षी निकालात 99.85 टक्केंसह त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली आहे. तर महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल 99 टक्के लागला असून हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. 95.89 टक्क्यांसह अजमेर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या मुलींचे प्रमाण 2.31 टक्क्यांनी जास्त आहे.
कर सहायक परीक्षेत हर्षल भामरे प्रथम :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या कर सहायक पदाच्या मुख्य परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील हर्षल भामरे हे राज्यात प्रथम आले. महिलांमधून बीड जिल्ह्यातील कल्पना मुंडे या प्रथम आल्या आहेत.
  • एमपीएससीतर्फे कर सहायक पदाच्या 478 पदांसाठी 14 आक्टोबर 2018 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.
  • तसेच या परीक्षेबाबत न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीने म्हटले आहे.
इस्रो करणार 22 मे रोजी प्रक्षेपण :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 22 मे रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट (रिसॅट-2 बीआरवन) अवकाशात सोडणार असल्यामुळे भारताला अवकाशात नजर ठेवण्यासाठी आणखी एक डोळा लाभणार आहे. यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांच्या तुलनेत रिसॅट-2 बीआर वन हा खूपच अत्याधुनिक आहे.
  • नवा उपग्रह हा बाहेरून जुन्या उपग्रहासारखाच दिसतो; परंतु आधी अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहापेक्षा याचे कॉन्फिग्युरेशन वेगळे आहे.
  • तसेच नव्या उपग्रहाची टेहळणी व इमेजिंग क्षमता ही वाढलेली आहे. रिसॅटच्या एक्स बँड सिनेथिक अपर्चर राडारची (एसएआर) क्षमता दिवस-रात्र तसेच सर्व हवामानात लक्ष ठेवण्याची आहे. राडार ढगात शिरू शकते व एक रिझोल्युशन
    एक मीटरपर्यंत झूम करू शकते. रिसॅट उपग्रह पृथ्वीवरील इमारत किंवा वस्तूचे छायाचित्र दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकते. त्यामुळे हा उपग्रह पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी दहशतवादी तळ आणि नियंत्रण रेषेवरील
    दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सवरून होणाऱ्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करील.
  • तर यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांनी घेतलेल्या इमेजेसचा (प्रतिमा) उपयोग 2016 मध्ये केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईक्ससाठी आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-महंमदच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांसाठी केला गेला आहे.
दिनविशेष :
  • 7 मे 1907 मध्ये मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
  • सोनी ह्या कंपनी ची स्थापना 7 मे 1946 मध्ये झाली.
  • एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा 7 मे 1907 मध्ये सुरू झाली.
  • लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 7 मे 1990 मध्ये प्रदान.
  • 7 मे 1992 मध्ये एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
  • पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात 7 मे 1861 मध्ये जन्म.

6 May 2019 Current Affairs

आज 7 राज्यातील 51 मतदारसंघामध्ये मतदान :
  • लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
  • तसेच मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये 674 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
  • तर 8 कोटी 75 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानात यंत्रबंद होणार आहे. या फेरीमध्ये
    हिला उमेदवारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या टप्प्यामध्ये सुमारे साडेतीन लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत
आता खासगी वितरकांकडेही मिळणार दर्शनिका :
  • शासकीय ग्रंथ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे येणाऱ्या पिढीला आकलन व्हावे, या उद्देशाने राज्याच्या दर्शनिका विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
  • तर गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडेच उपलब्ध होणार्या जिल्हा-राज्य दर्शनिका आता लवकरच खासगी वितरकांकडेही उपलब्ध होणार आहेत.
  • दर्शनिका विभाग महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव टिकविण्यासाठी काम करत आहे. या दर्शनिका गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडे उपलब्ध होत होत्या. मात्र, यामुळे त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते. परिणामी, वाचक आणि वितरक यांच्यातील ही दरी दूर करण्यासाठी दर्शनिका विभागाने ही सर्व गॅझेटिअर खासगी वितरकांकडे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच विभागामार्फत आतापर्यंत एकूण 87 ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. या सर्व ग्रंथांच्या ई-बुक आवृत्तीदेखील प्रकाशित करण्यात आल्या असून, 40 हजारांपेक्षा जास्त पृष्ठे शासनाच्या संकेतस्थळावर ‘दर्शनिका’ या शीर्षकाखाली
    सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
महिला लोकप्रतिनिधी झेंडावंदनापासून दूरच :
  • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातून त्यांना सत्तेत सहभागाची संधी देण्यात आली; मात्र महिला लोकप्रतिनिधींना कमी लेखून राष्ट्रीय कार्यक्रमांच्या दिवशी झेंडावंदनापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. त्याची दखल घेत आयोगाने अमरावती विभागीय आयुक्तांकडून पाचही जिल्हा परिषदांचा अहवाल मागविला आहे.
  • तसेच निवडणुकीनंतर ग्रामपंचायत सदस्यांच्या कारभाराच्या धोरणाचा आढावा आयोगाने घेतला. त्यासाठी आयोगाने आपल्या स्तरावर माहिती घेतली. त्यात ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी महिलांनी अनेक तक्रारी केल्या. त्यावर
    उपाययोजना करण्यासाठी आयोगाने संबंधित यंत्रणांकडून माहितीही मागवली. सोबतच शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली.
  • शासनासह आयोगाने या तक्रारींबाबतचा अहवाल संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मागवला. तसे पत्र विभागीय आयुक्तांना दिले; मात्र अहवाल विभागीय आयुक्तांना सादर झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने अहवाल देण्याचे पंचायत विभाग, गटविकास अधिकाऱ्यांना बजावले आहे.
भारताने गेल्या वर्षी 25 लाख पर्यटकांना दिला ई-व्हिसा :
  • भारताने गेल्या वर्षी 25 लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण 2015 या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या 26 वरून 21 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
  • तसेच यासंदर्भात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिसाच्या उपश्रेणींची संख्या 104 वरून 65 इतकीकरण्यात आली आहे.
  • 2015 साली इमिग्रेशन विभागाने 5.29 लाख ई-व्हिसा जारी केले होते. गेल्या वर्षी हीच संख्या 25.15 लाख इतकी झाली.
  • भारतीय दूतावासातर्फे देण्यात येणार्या पेपर व्हिसाची संख्या घटली आहे. 2015 साली अशा व्हिसांची 45 लाख इतकी असलेली संख्या 2018 साली 35 लाख झाली.
  • भारताकडून 166 देशांतील पर्यटक, नागरिकांना ई-व्हिसा देण्यात येतो. पर्यटन, वैद्यकीय, व्यावसायिक काम, कॉन्फरन्सला हजर राहणे अशा कारणांकरिता अर्ज केल्यापासून 72 तासांत ई-व्हिसा मिळतो. वेब शो, मालिका, चित्रीकरण स्थळे निवडण्यासाठी दौरा करणे अशा कारणांसाठी फिल्म व्हिसाही देण्यात येतो.
  • फिल्म व्हिसा असलेल्या विदेशी पर्यटकाला आता भारतात 180 दिवस राहायची मुभा देण्यात आली आहे.
‘फोनी’मुळे राज्यातील हवामानात बदल :
  • बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते.
  • आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
  • तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34, 25 अंशाच्या आसपास राहील.
दिनविशेष :
  • 6 मे : आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन
  • पेनी ब्लॅ नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट 6 मे 1840 मध्ये प्रसारित झाले.
  • पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन 6 मे 1889 मध्ये झाले.
  • ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु 6 मे 1949 मध्ये झाले.
  • 6 मे 1954 मध्ये रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
  • अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा 6 मे 1983 मध्ये लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
  • 6 मे 1997 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.

5 May 2019 Current Affairs

फॅनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले :
  • ओदिशानंतर फॅनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले.
  • पश्चिम बंगालमध्ये वादळाची तीव्रता ओदिशापेक्षा कमी झाली असली तरी पश्चिम बंगालमध्ये ताशी 90 किलोमीटरच्यावेगाने वादळ धडकले आहे. तसेच फॅनी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • तर ताशी 175 किलोमीटर वेगाच्या चक्रीवादळाने ओदिशात जोरदार तडाखा दिला. नंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे.
जीएसपी योजना रद्द केल्यास अमेरिकी कंपन्यांनाही फटका :
  • भारताबरोबर निर्यात वाढवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना फटका बसण्याची भीती असल्याने अमेरिकेने सार्वत्रिक अग्रक्रम योजना रद्द (जीएसपी) करू नये, असे आवाहन 25 काँग्रेस सदस्यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधींना केले आहे. तर
    भारताबरोबरची ही योजना रद्द करण्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली आहे.
  • तसेच सार्वत्रिक अग्रक्रम योजना हा अमेरिकेचा जुना कार्यक्रम असून त्यामुळे संबंधित देशांच्या हजारो वस्तू कुठलाही कर लागू न करता अमेरिकेत येत असतात. त्याचा लाभ भारतालाही होत आहे.
  • 4 मार्च रोजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले,की भारताबरोबरची ही योजना आम्ही बंद करणार असून यापुढे भारताला त्याचा लाभ मिळू देणार नाही.
  • तसेच त्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली असून त्या पाश्र्वभूमीवर 25 अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी ही योजना रद्द न करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे मन वळवण्याचे प्रयत्न केले आहेत.
‘इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात झाला आहे.
  • फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान करण्यात आला.
  • भारत आणि फ्रान्समधील अवकाशसंशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडल्याबद्दल किरण कुमार यांचा सन्मान करण्यात आल्याचे फ्रान्समार्फत सांगण्यात आले आहे.
  • तसेच फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेकझॅण्डर जीगलर यांनी दिल्लीमधील फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान केला.
  • तर ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्टने केली होती.
  • हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फ्रान्सच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
भारत करणार चांद्रयान-2 चं प्रक्षेपण :
  • भारताची महत्वाकांक्षी मोहिम असणाऱ्या चांद्रयान-2 चं लवकरच प्रक्षेपण केलं जाणार आहे.
  • तसेच 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने 1 मे रोजी यासंबंधी घोषणा केली आहे.
  • जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने चांद्रयान-2 चं प्रक्षेपण केलं जाणार आहे.
  • श्रीहरीकोटा येथून हे प्रक्षेपण केलं जाणार असून 6 सप्टेंबरपर्यंत चांद्रयान-2 चंद्रावर पाऊल ठेवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर, लॅण्डर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) हे तीन प्रमुख भाग असणार आहेत.
  • तसेच चांद्रयान-2 चं वजन 3290 किलो असणार आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळं होईल. यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावरु उतरेल आणि यानंतर पुन्हा रोव्हर त्याच्यापासून वेगळा होईल.
  • ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आण सेन्सर्स असणार आहेत. अशाच पद्धतीने रोव्हरमध्येदेखील अत्याधुनिक उपकरणं असतील. हे दोघे मिळून चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या मिनरल्स आणि इतर गोष्टींची माहिती पाठवतील. जी माहिती पाठवली जाईल त्याचा इस्त्रो अभ्यास करणार आहे.
दिनविशेष :
  • 5 मे : युरोप दिन
  • कुबलाई खान हा 5 मे 1260 मध्ये मंगोलियाचा सम्राट बनला.
  • 5 मे 1901 मध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • पश्चिम जर्मनीला 5 मे 1955 मध्ये सार्वभौमत्व प्राप्त झाले.
  • 5 मे 1964 मध्ये युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिन घोषित केला.

मोफत सेमिनार

                                                                     मोफत सेमिनार... !

एमपीएससी क गट,तलाठी,पोलिस  भरती  व जिल्हा परिषद अशा विविध स्पर्धा व सरळसेवा परीक्षांसाठी गणित व बुद्धीमापन या विषयांचे संपूर्ण मोफत मार्गदर्शन...!



                                       मुंबई , ठाणे व पालघर परिसरातील विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा.

                                                                            धन्यवाद...! 

May 3, 2019

1 May 2019 Current Affairs

फॅनी’ चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता :
  • फॅनी हे चक्रीवादळ अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून ते शुक्रवारी दुपापर्यंत ओदिशामध्ये धडकू शकते, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
  • तसेच सध्या फॅनी वादळ दक्षिण पूर्वेकडे आणि बंगालच्या उपसागरात असून ते पुरीपासून 830 कि.मी.वर, विशाखापट्टणमपासून (आंध्र प्रदेश) 670 कि.मी.वर आणि त्रिंकोमालीपासून (श्रीलंका) 680 कि.मी.अंतरावर आहे, असे हवामान खात्याने 12 वाजता जाहीर केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.
  • तर फॅनी चक्रीवादळ पुढील 12 तासांमध्ये अधिक रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असून ते 3 मे रोजी दुपापर्यंत ओदिशाच्या किनाऱ्यावर थडकण्याची शक्यता आहे, या वेळी 170-180 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि भारतीय तटरक्षक दल यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला
पुडुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांना केंद्राने दिलेले अधिकार काढले :
  • पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना मद्रास उच्च न्यायालयाने दणका दिला. पुडुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजामध्ये बेदी यांना हस्तक्षेप करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • तसेच नायब राज्यपाल म्हणून केंद्र सरकारने बेदी यांना काही विशेष अधिकार दिले होते ते अधिकार न्यायालयाने काढून घेतले आहेत. या अधिकारांमुळे बेदी पुडुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालत होत्या.
  • तर सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची फाइल तपासण्यासाठी मागविण्याचा अधिकार त्यांना मिळाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि बेदी यांच्यात खटके उडत होते. पुडुचेरीतील काँग्रेसचे आमदार के.
    लक्ष्मीनारायणन यांनी बेदी यांच्या विशेष अधिकारांना न्यायालयात आव्हान दिले होते त्यावर न्या. आर. महादेवन यांनी आदेश दिला.
  • न्यायालयाने बेदी यांचे विशेषाधिकार रद्द केल्याने त्यांना आता सरकारकडून कोणतीही फाइल मागविता येणार नाही अथवा सरकारला किंवा सरकारच्या वतीने कोणताही आदेश देता येणार नाही.
‘जेट’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘विस्तारा’चा मदतीचा हात :
  • जेट एअरवेज बंद झाल्यानंतर नोकरी गेलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एअर विस्ताराने मदतीची हात दिला आहे.
    विस्ताराने जेटच्या 550 कर्माचाऱ्यांना आपल्यामध्ये सामिल करुन घतले आहे. यापूर्वी स्पाईसजेटनेही जेटच्या कर्माचाऱ्यांना नोकरी देऊ केली आहे.
  • तसेच विस्ताराने समावून घेतलेल्या 550 कर्मचाऱ्यांमध्ये 100 पायलट्सचा समावेश आहे.
  • तर लवकरच एअर विस्तारा आणि एअर एशिया जेटची विमानं आपल्या ताफ्यात समाविष्ट करुन घेणार आहेत.
  • दरम्यान, जेट एअरवेजने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठीची आजपासूनच मेडिक्लेमची सुविधाही बंद केली आहे.
  • टाटा समुहाच्या मालकीच्या एअर विस्ताराने जेट एअरवेजच्या 450 केबिन क्रू कर्मचाऱ्यांना आपल्याकडे नोकरी दिली आहे. त्याचबरोबर एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर या विमान कंपन्याही जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत
    आहेत. एअर एशिया जेटचे बोईंग 737 आपल्या ताफ्यात समावून घेणार आहे.
अमित पंघालची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस :
  • भारतीय बॉक्सिंग महासंघाने आशियन गेम्स व आशियन चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता अमित पंघाल व विश्व चॅम्पियनशिप 2017 चा कांस्यपदक विजेता गौरव बिधुडी यांच्या नावांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
  • तर अमितने जकार्तामध्ये आशियन गेम्समध्ये 49 किलो वजनगटात उज्बेकिस्तानचा विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबाय दुसमातोव्हचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले होते.
  • तसेच गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी अमितच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
  • अमितच्या नावावर विचार करण्यात आला नव्हता. कारण तो 2012 मध्ये डोप चाचणीत अपयशी ठरला होता. त्यासाठी त्याच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.
व्हेल मासा बनला रशियाचे अस्त्र :
  • उत्तर नार्वेच्या समुद्रात मच्छीमारांना एक सफेद व्हेल मासा आढळला. त्याच्या गळयाभोवती हार्नेस म्हणजे पट्टयासारखे काहीतरी बांधण्यात आले होते. रशियाकडून या व्हेल माशाचा उपयोग हेरगिरीसाठी केला जात असल्याची दाट शक्यता आहे. रशियन नौदलाने या व्हेल माशाला प्रशिक्षित केले असावे अशी शक्यता नॉर्वेच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.
  • तसेच या व्हेल माशाच्या गळयातील हार्नेस म्हणजे पट्टयावर ‘इक्युपमेंट ऑफ सेंट पीटसबर्ग’ असे लिहिलेले होते. या हार्नेसचा उपयोग कॅमेऱ्यासाठी किंवा अन्य उपकरणांसाठी केला जात असावा अशी शक्यता नॉर्वेच्या तज्ञांनी व्यक्त केली.
  • नॉर्वेची सीमा रशियाला लागून आहे. फिनमार्कच्या समुद्रात मागच्या आठवडयात सर्वप्रथम हा व्हेल मासा दिसला होता.
जपानच्या सम्राटांचा स्वेच्छेने राज्यत्याग :
  • जपानचे लोकप्रिय सम्राट अकिहितो यांनी स्वेच्छेने राज्यत्याग केला. अखंडपणे 200 वर्षे सुरू असलेली जपानची राजेशाही ही जगातील सर्वात जुनी राजेशाही असून, त्यातील कोणाही सम्राटाने स्वत:हून राजसिंहासनावरून पायउतार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • तसेच टोकियोच्या राजप्रासादाच्या ‘पाईन दालनात’ सम्राट अकिहितो यांनी आपली राज्यवस्त्रे, तलवार आणि पवित्र मानला जाणारा मुकुटमणी उतरवून ठेवला.
  • सम्राट या नात्याने केलेल्या शेवटच्या भाषणात अकिहितो यांनी जपानच्या प्रजेचे मनापासून आभार मानले व जपानसह संपूर्ण जगात शांतता आणि आनंद नांदावा, अशी कामना केली.
दिनविशेष :
  • 1 मे : जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
  • 1 मे 1760 मध्ये किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
  • द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये 1 मे 1840 मध्ये जारी केले गेले.
  • हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल 1 मे 1844 मध्ये स्थापन झाले.
  • 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
  • आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत 1 मे 1886 मध्ये पहिल्यांदा साजरा केला.
  • 1 मे 1890 मध्ये जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
  • रामकृष्ण मिशन ची सुरूवात 1 मे 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली.
  • 1 मे 1927 मध्ये जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
  • सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण 1 मे 1930 मध्ये करण्यात आले.
  • गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली.
  • 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.