Sep 29, 2018

२९ सप्टेंबर २०१८

चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2018)

भारत सातव्यांदा आशिया कप चॅम्पियन:
  • अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात केदार जाधवने बांगलादेशविरुद्ध विजयी धाव घेत भारताच्या सातव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.Asia Cup 2018
  • अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले. मात्र, भारतीयांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जेतेपद निसटू दिले नाही.
  • तसेच गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक पटकावला.
    बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 48.3 षटकात 222 धावा केल्यानंतर भारताने 50 षटकात 7 बाद 223 धावा करुन रोमांचक विजय मिळवला.
आयएनएसच्या अध्यक्षपदी जयंत मॅथ्यू यांची निवड:
  • इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) 2018-19 या वर्षासाठी मल्याळ मनोरमाचे जयंत मॅमेन मॅथ्यू यांची अध्यक्षपदी निवड झाली.
  • 28 सप्टेंबर रोजी आयएनएसची 79वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्यात मॅथ्यू यांची निवड झाली.
  • तसेच मिड-डेचे शैलेश गुप्ता हे डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले. बिझनेस स्टँडर्डच्या श्रीमती अकिला उरणकर या यापूर्वी अध्यक्ष होत्या.
  • व्हार्ईस प्रेसिडेंटपदी एल. अदिमूलम (हेल्थ अँड द अँटिसेप्टिक) यांची, तर शरद सक्सेना (हिंदुस्थान टाइम्स, पाटणा) यांची मानद कोषाध्यक्षपदी 2018-19 वर्षासाठी निवड झाली. लव सक्सेना हे आयएनएसचे सरचिटणीस आहेत.
शबरीमला येथील मंदिर सर्व महिलांसाठी खुले:
  • शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 28 सप्टेंबर रोजी बहुमताने रद्दबातल ठरवली.
  • शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नमूद केले आहे. न्या. इंदू मल्होत्रा या एकमेव महिला न्यायाधीशांनी मात्र त्या प्रथेत हस्तक्षेप करण्याविरोधात मत दिले.Shabarimala
  • पन्नाशीपर्यंतच्या वयोगटातील महिला या जननक्षम असतात तसेच त्यांना मासिक पाळी येते, या कारणावरून ही बंदी लागू होती. सरन्यायाधीश मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने चार विरूद्ध एक अशा मताने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, महिलांना अय्यप्पा मंदिरात प्रवेश नाकारणे हा लैंगिक भेदभाव असून यात हिंदू महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ नरीमन, न्या. अजय खालविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी एकसमान निकाल दिला.
वित्त संस्थांच्या व्याजदरात वाढ:
  • सूक्ष्म वित्त संस्थांकडून (एनबीएफसी-मायक्रो फायनान्स) दिली जाणारी छोटी कर्जे पाव टक्क्यांपर्यंत महागण्याची शक्यता आहे. या संस्थांनी कर्जदारांकडून वसूल करण्याच्या किमान व्याजदरात रिझर्व्ह बँकेने 0.10 टक्के वाढ केली आहे. हा दर आता वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
  • रिझर्व्ह बँकेने बिगर बँक वित्त संस्थांना (एनबीएफसीकर्ज वितरणाचा परवाना दिला आहे. यापैकी सूक्ष्म वित्त संस्था (मायक्रो फायनान्स) बँकांकडून 8 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज घेतात व 15 ते 21 टक्के व्याजदराने ग्राहकांना पत पुरवठा करतात.
  • तसेच ही कर्जे 5 हजार रुपयांपासून ते अधिकाधिक 50 हजार रुपयांची असतात. यांचा परतफेडीचा कालावधीसुद्धा कमी असतो. तात्काळ गरजेसाठी ही कर्जे दिली जात असल्याने त्यांचे वितरण ग्रामीण भागातच अधिक असते. आता ही कर्जे महागणार आहेत.
  • एनबीएफसी-मायक्रो फायनान्स संस्थांनी ग्राहकांना किमान व्याजदर किती आकारावा, हे रिझर्व्ह बँक दर तीन महिन्यांनी घोषित करते.
जागतिक क्रमवारीमध्ये पुणे विद्यापीठाचे स्थान उंचावले:
  • ऑक्‍सफर्ड ऑफ द ईस्ट‘ अशी ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक स्तरावरील मूल्याकंनात पहिल्या पाचशे ते सहाशे विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळवले आहे.
  • शैक्षणिक संस्थांचे जागतिक स्तरावर मूल्यांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2018-19 ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सहावा क्रमांक पटकाविला असून, पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
  • पुणे विद्यापीठ वगळता देशातील एकाही विद्यापीठाचा जागतिक स्तरावरील पहिल्या सहाशेपर्यंतच्या क्रमवारीत समावेश झालेला नाही. ‘टाइम्स’ संस्थेकडून दरवर्षी जगभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते.
  • विद्यापीठ 2016 पासून ‘टाइम्स’च्या जागतिक क्रमवारीत सहभागी होत आहे. गेली तीन वर्ष विद्यापीठ 600 ते 800 या क्रमवारीत होते. यंदा विद्यापीठाने महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.
दिनविशेष:
  • 29 सप्टेंबर हा दिवस ‘जागातिक हृदय दिन‘ आहे.
  • सन 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरूझाली.
  • बिर्ला तारांगण‘ हे आशियातील पहिले तारांगण सन 1963 मध्ये कोलकाता येथे सुरू झाले.
  • सन 2012 मध्ये ‘अल्तमस कबीर‘ हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले.

Sep 28, 2018

नेहरूंचा अलिप्ततावाद

पंचशील आणि अलिप्ततावाद

पंडित नेहरुंचे परराष्ट्र धोरण

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला नेहरुंना जागतिक इतिहासाची सखोल माहिती होती. तसेच आंतराराष्ट्रीय संबंधाची चांगली जाण होती. नेहरुंनी देशाच्या हितसंबंधाला अग्रक्रण देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशील धोरणाच्या माध्यामातून जागतिक शांतता व सहकार्य वृध्दिंगत केले. तर अलिप्ततेच्या धोरणाचा अवलंब करुन जागतिक राजकारणास विधायक वळण देऊन नवीन विचार रुजविला.

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्रे :-

राष्ट्रहितास प्राधान्य

पंडित नेहरुंनी शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत असतांना भारताच्या हितसंबंधाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय असताना नेहरुंनी देशाचे हितसंबंध जपले.

जागतिक शांतता व सहकार्य

पहिल्या व दुसर्‍या महायुध्दमुळे जग होरपळून निघाले होते. असे विनाशकारी महायुध्द पुन्हा उदभवू नये यासाठी नेहरुंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सहकार्याचे महत्व विशद केले. शांततामय सहजीवना चा त्यांनी पुरस्कार केला.

स्वातंत्र्याचा पुरस्कार व स्वातंत्र्यालढयास सहाय्य

कोणतेही राष्ट्र पारतंत्र्यात राहू नये यासाठी त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. ज्या राष्ट्रामध्ये पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी चळवळी सुरु आहेत. त्यांना भारताने पाठिंबा व सहकार्य देऊ केले.

आफ्रो आशियायी राष्ट्रांना सहकार्य

पाश्चिमात्यांच्या आर्थिक व राजकीय साम्राज्यवादाला बळी पडलेल्या आफि्रका, आशिया, खंडातील राष्ट्रांनी परस्पर सहकार्याचे धोरण ठेवल्यास त्यांची उन्नती होऊ शकेल.

वसाहतवादास विरोध

आशिया आफि्रका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपियनांच्या वसाहतवातदातून आपली मुक्तता होण्यासाठी धडपडत होती. त्यांनी वसाहतवादाच्या विरोधात उभ्या केलेलया संघर्षास नेहरुंनी पाठिंबा देऊ केला.

संयुक्त राष्ट्रसंघाला सहकार्य

विनाशकारी महायूध्दे पुन्हा होऊ नयेत, राष्ट्रा -राष्ट्रातील प्रश्न सामंजस्याच्या मार्गाने सुटावेत यासाठी संयुक्त राष्ट्र संघ निर्माण झाला होता. युनोच्या माध्यमातून नि:शस्त्रीकरण परिषदा दुर्बल राष्ट्रांना सहकाय्र अशा उपक्रमांनाभारताने सक्रिय साहाय्य केले. नेहरुंच्या काळात भारत युनोचा क्रियाशिल सदस्य झाला.

अलिप्ततेचे धोरण

पंडित जवाहरलाल नेहरुंच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्ततेच्या धोरणास अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या धोरणाच्या माध्यमातून त्यांनी जागतिक राजकारणाला विधायक वळण देऊन भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळवून दिले.

पंचशील

आंतराष्ट्रीय सदभावना व सहकार्य वृद्विगंत व्हावे जागतिक शांतता टिकावी या प्रमुख उद्देंशाने पंचशील तज्ञ्ल्त्;वांचा पुरस्कार करण्यात आला होता.

पंचशील

जैन धर्मामध्ये पंचज्ञ्ल्त्;वांना महत्वपूर्ण स्थान आहेत. तर बौध्द धर्मामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, व ब्रहायर्च, या पंचशील मार्गाने शील -संवर्धनावर भर देण्यात आला आहे. आशिखा खंडातील अनेक राष्ट्रांवर बौध्द धर्माचा प्रभाव आहे. पाश्चात्यंच्या गुलामगिरीतून इंडोनिशिया मुक्त करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यात डॉ. सुकार्नो यांनी बौध्द धर्मीय पंचतज्ञ्ल्त्;वांच्या आधारावर पंचशीलचे सर्वाना आव्हान केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रभक्ती, श्रध्दा, व्यक्ती, स्वातंत्र्य, सामाजिक व देवावर विश्र्वास या तज्ञ्ल्त्;वांची त्यांनी घोषणा केली.
पंडित नेहरुंनी पंचशील तज्ञ्ल्त्;वाचे पावित्र्य ओळखून त्यास देशाच्या अलिप्तवादाची धोरणात स्थान देण्याचे ठरविले २९ एप्रिल १९५४ मध्ये तिबेटच्या स्वायत्ततेसंबंधी भारत व चीन यांच्यात झालेया करारामध्ये आधूनिक पंचशील तत्वांचा समावेश करण्यात आला. ती तत्वे पुढीलप्रमाणे
(१) कोणत्याही कारणास्तव परराष्ट्रावर आक्रमण न करणे
(२) एकमेंकाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे
(३) परस्परांना हितावह होईल असा समानतेचा व्यवहार करणे.
(४) शांततामय सहजीवनाचा अंगीकार करणे.
(५) परस्परांना सार्वभैामत्वाचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे.
भारताने अंगीकारलेल्या पंचशील धोरणास व्हिएतनाम म्यानमार नेपाळ, आओस, युगोस्लाव्हियचा, कंबोडिया, या राष्ट्रांनी मान्यता दिली, इंडोनेशियातील बांडुंग येथे नवस्वतंत्र आफि्रका व आशियायी राष्ट्रांची परिषद १८ एप्रिल १९५५ रोजी संपन्न झाली. या परिषदेत आशिया खंडातील २३ राष्ट्रांनी तर आफि्रका खंडातील ६ राष्ट्रांनी सहभाग घेतला. या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावर विचारविनिमय झाला. पंडित जवाहरलाल नेहरुंनी पंचशील धोरण स्वीकारण्याचे आवाहन परिषदेतील राष्ट्रांना केले. पाकिस्तान वगळता परिषदेतील सर्व राष्ट्रांनी पंचशील धोरणास मान्यता दिली.

अलिप्तवाद :-

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरुपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. पंडित जवाहरलाल नेहरुं दि. ७ सप्टेंबर १९४६ रोजी भारताच्या अलिप्तवादाची धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात कि कोणत्याही राष्ट्राचा उपग्रह म्हणून न राहता, आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषददांमध्ये भाग घेऊ आम्ही शक्यातो सत्तागटाच्या राजकारणापासून अलिप्त राहू इच्छितो. अमेरिका, रशिया या महासज्ञ्ल्त्;ाांच्या गटामध्ये सामील न होता जागतिक व्यासपीठावर भारतास सन्मानाचे स्थान मिळविता येईल. नेहरु म्हणतात. महासज्ञ्ल्त्;ाांच्या बलाढय शक्तींशी तोंड देण्यासाठी अलिप्ततावाद माध्यमातून तिसर्‍या शक्तीच्या निर्मितीची आवश्यकता आहे. अलिप्ततावाद या शब्दांचा सर्वप्रथम वापर नेहरुंचे परराष्ट्र व्यवहार पाहणारे व्ही के. कृष्णमेनन यांनी केला. नेहरुंनी आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून या संकल्पनेस आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले म्हणून नेहरुंना अलिप्ततावादाचे उदगाते असे संबोधले जाते.
काही राजकीय विचारवंतांनी नेहरुंच्या वरील धोरणास तटस्थता हस्तक्षेप विरहित धोरण असे उपहासात्मक संबोधले मात्र नेहरूनी आपल्या कार्याने अलिप्ततावादाला आंतराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे स्थान प्राप्त करून दिले. हे धोरण विधायक क्रियाशील व निश्चित स्वरुपाचे आहे. आंतराष्ट्रीय क्षेत्रातील एक कायम टिकणारा नीती प्रवाह म्हणून अलिप्तृतावादी धोरणास महत्व आहे.

अलिप्ततावादी धोरणाची वैशिष्टे

(१) लष्करी संघटना व लष्करी करारापासून अलिप्तता, (२) शांततेच्या धोरणाचा अवलंब (३) सहकार्य व सहजीवनाचे धोरण, (४) स्वातंत्र्य व सार्वभौमत्व यांचा अंगीकार (५) निर्भयतेचे धोरण (६) प्रसंगानुरूप कारवाई करण्याचे स्वातंत्र्य.
वरील वैशिष्टयांवर आधारित अलिप्त राष्ट्र चळवळीची वाटचाल सुरु झाली. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल गमाल नासेर, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांच्या नेतृत्वाखाली अलिप्त राष्ट्र संघटना निर्माण झाली.

Sep 27, 2018

चालू घडामोडी २८ सप्टेंबर २०१८

रयत शिक्षण संस्थेसाठी विशेष टपाल तिकीट:
  • रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हर प्रकाशित करण्यात येणार आहे.Rayat Shikshan Sanstha
  • सातारा येथील संस्थेच्या मुख्यालयात 4 ऑक्टोबरला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात हे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती टपाल खात्याच्या सूत्रांनी दिली.
  • कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये लावलेल्या या संस्थारूपी रोपट्याचे आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. संस्थेच्या या कारकिर्दीबाबत टपाल तिकीट प्रकाशित करून गौरव करण्यात येणारअसल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
औषधविक्रेत्यांचा आज देशभरात बंद:
  • केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ऑनलाइन औषधविक्रीच्या मसुद्याला विरोध करत ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने 28 सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. त्यामुळे देशभरातील औषधे दुकाने बंद राहणार आहेत.
  • ऑनलाइन औषधविक्रीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे.
  • ई-फार्मसीच्या मसुद्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी 20 ते 27 सप्टेंबर या काळात देशभरातील औषधविक्रेते काळ्या फिती लावून काम करत होते. त्यानंतर आता देशभरातील औषधांची दुकाने बंद असणार आहेत.
  • ऑनलाइन औषधविक्रीच्या मसुद्यामध्ये ई-फार्मसीला सरसकट अधिकार देण्यात आले असून याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. ई-फार्मसीमुळे औषधविक्रीमध्ये मक्तेदारी निर्माण होऊन औषधविक्रेते संपुष्टात येतील.
  • तेव्हा ई फार्मसीला सरकारने कायदेशीर मान्यता देऊ नये. या संपामध्ये देशभरातील तब्बल साडेआठ लाख औषध विक्रेते सहभागी होणार असून राज्यातील 70 हजारांहून अधिक दुकाने बंद असतील, असे ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.
NSG सदस्यत्वासाठी ब्रिटनकडून भारताचे समर्थन:
  • अणुपुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी विनाअट भारताला समर्थन देण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा ब्रिटनकडून जाहीर करण्यात आले आहे. गटात सहभागी होण्यासाठी भारताने वारंवार आपली योग्यता सिद्ध केली असल्याचे ब्रिटनने सांगितले आहे.
  • जागतिक स्तरावर तंत्रज्ञान निर्यातीच्या नियंत्रणासाठी चार मुख्य व्यवस्था आहेत. अण्वस्त्रे आणि अणु तंत्रज्ञानाच्या हस्तांतरण आणि प्रसाराबाबतचे नियम ठरवण्यात एनएसजीची महत्त्वाची भूमिका आहे.NSG
  • महत्त्वाचे म्हणजे 1974ला भारताने केलेल्या अणुचाचणीवर प्रतिक्रिया म्हणून एनएसजीची स्थापना करण्यात आली होती.
  • ब्रिटन भारताकडे एक जबाबदार देश म्हणून पाहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, वारंवार चीनने विरोध केलेला असतानाही भारत पुन्हा एकदा एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • तसेच गेल्या महिन्यात अमेरिकेसोबत झालेल्या 2+2 डायलॉग आणि अमेरिकेकडून भारताला टियर-1 देशांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने अमेरिका एनएसजी सदस्यत्वासाठी मदत करेल अशी भारताला अपेक्षा आहे.
आधारविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय:
  • शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी ‘आधार कार्ड‘ असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी दिला.
  • आधार‘च्या घटनात्मक वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. तसेच, आधार कार्ड कायद्यातील कलम 57 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यामुळे ‘आधार’चा डेटा खासगी कंपन्यांना वापरता येणार नाही.
  • आधार‘मुळे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या आशयाच्या 31 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अर्जनकुमार सिक्री, न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर, न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण यांचा समावेश आहे.
  • गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी आणि इतर कारणांसाठी ‘आधार’ सक्ती केली होती. त्यातील काही गोष्टींसाठीची सक्ती रद्द केली असली, तरीही ‘आधार’ घटनात्मकरित्या वैध असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींना‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना जागतिक स्तरावरील हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल मिळाला आहे. पंतप्रधान मोदींसह फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनाही हा सन्मान मिळाला आहे.
  • संयुक्त राष्ट्राने (यूएन) पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगातील सहा व्यक्तींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ‘ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन या दोघांना संयुक्तरित्या हा सन्मान प्राप्त झाला आहे.
  • 2022 पर्यंत भारताला एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प आणि आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे नेतृत्वामुळे मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आधार क्रमांक पॅनकार्डला लिंक करणे अनिवार्य:
  • सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी प्राप्तिकर विवरणासाठी दिलेल्या निकालामुळे पॅन क्रमांक (परमनंट अकाउंट नंबर) व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे (लिंक करणे) बंधनकारक बनले आहे. मात्र आतापर्यंत 50 टक्के लोकांनी आधार व पॅन लिंक केले नसल्याचे आढळून आले आहे.
  • प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 21 कोटी 8 लाख 16 हजार 776 लोकांनी पॅन व आधार एकमेकांना जोडले आहे. प्रत्यक्षात पॅन कार्डधारकांची संख्या 41 कोटी 26 लाख 6968 इतकी आहे. म्हणजे 20 कोटींहून अधिक लोकांनी पॅन व आधार एकमेकांना लिंक केलेले नाही, असा अर्थ निघतो.
  • अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवून दिली आहे. तसे 30 जून रोजी जाहीर करण्यात आले होते. तोपर्यंत ते काम संबंधित पॅन कार्डधारकांना करावेच लागणार आहे. मात्र आधारचा फैसला होईपर्यंत पॅन व आधार जोडण्यास मुदतवाढ देण्याचे मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयानेच जाहीर केले होते. आता न्यायालयाचा निर्णय आला असून, त्यात हे करणे बंधनकारक केले आहे.
दिनविशेष:
  • 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिनआंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून पाळला जातो.Bhagat Singh
  • क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.
  • 28 सप्टेंबर 1967 हा दिवस सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन आहे.
  • ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982मध्ये झाला.

स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु करताना...

Sep 26, 2018

चालू घडामोडी २७ सप्टेंबर २०१८

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 ऑगस्ट रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींचा हा 47वा मन की बात कार्यक्रम होता.

  • दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाव्दारे देशातील जनतेला संबोधित करतात. मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधानांनी अनेक विषयांना हात घातला आणि विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला.


  • जाणून घेऊया ‘मन की बात’मधील काही महत्त्वाचे मुद्दे-
  • भीषण पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या केरळचा उल्लेख करताना मोदींनी बचाव कार्यात मदत करणाऱ्या नौदल, एनडीआरएफ आदी सर्व जवानांचं कौतुक केलं. संपूर्ण देश केरळच्या पाठीशी उभा आहे असे ते म्हणाले.


  • पंतप्रधान मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण काढली. 16 ऑगस्ट रोजी वाजपेयींच्या निधनाची बातमी आल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता असे ते म्हणाले.


  • महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये अत्यंत कमी वेळात दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा उल्लेख केला.


  • Man Ki Baat
  • ‘दलित आणि अनुसूचित जाती-जमातींवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा (संशोधन विधेयक) पुनर्स्थापित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत ते विधेयक मंजूर केले. तसेच अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण करीत ओबीसी आयोग बनवला व त्याला संविधानिक दर्जा देण्याचं काम केंद्र सरकारने केले आहे.

  • भाषेचे महत्त्वही यावेळी मोदींनी अधोरेखित केले. प्रत्येक भाषेचे वेगळे महत्त्व असते. तामिळ जगातील सर्वात जुनी भाषा असल्याचा देशाला गर्व आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्वही सांगितले.

Must Read (नक्की वाचा):

प्रसिद्ध आरके स्टुडिओची विक्री होणार:
  • बॉलिवूड अभिनेते राज कपूर यांच्या आरके स्टुडिओची आता विक्री करण्यात येणार आहे. राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी चेंबूरमध्ये आरके स्टुडिओची निर्मिती केली. मात्र, आता हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय राज कपूर यांची पत्नी कृष्णा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी घेतला आहे.

  • कपूर कुटुंबीय हा स्टुडिओ विकण्यासाठी बिल्डर, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्सच्या संपर्कात आहे. कपूर कुटुंबियांकडून ऋषी कपूर यांनी सांगितले, की आम्ही स्टुडिओची पुनर्बांधणी केली होती. मात्र, स्टुडिओची पुनर्बांधणी करणे नेहमीच शक्य नाही. अनेकदा सर्व गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार होत नाहीत. त्यामुळे आम्ही सगळे याबाबत दु:खी आहोत आणि आता आम्ही हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

  • दरम्यान, राज कपूर यांनी दोन एकर जागेत वसलेल्या या आरके स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली. मागील वर्षी 16 सप्टेंबरला स्टुडिओला आग लागली होती. या आगीमुळे स्टुडिओतील बहुतांश भाग जळाला होता. तसेच चेंबूर लांब असल्याने अंधेरी किंवा गोरेगाव येथेच शुटिंगसाठी जागा निवडण्यात येत आहे.

डॉन ब्रॅडमन यांना गुगलकडून मानवंदना:
  • ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांचा 27 ऑगस्ट हा 110 वा वाढदिवस आहे. गुगलने सर ब्रॅडमन यांना आपल्या डूडलच्या माध्यमातून खास मानवंदना दिलेली आहे.

  • ब्रॅडमन यांचा ठेवणीतला कव्हर ड्राईव्हचा फटका खेळतानाचं अॅनिमेटेड डूडल खास आजच्या दिवशी बनवण्यात आलेलं आहे.


  • Don Bradman
  • 27 ऑगस्ट 1908 रोजी जन्म झालेल्या ब्रॅडमन यांना क्रिकेटमधले सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानलं जातं.


  • आपल्या कारकिर्दीत ब्रॅडमन यांनी तब्बल 12 कसोटी व्दिशतकं झळकावली. 334 ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती.

  • ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत असतानाही ब्रॅडमन यांनी धावांचा रतिब घातला होता. 95.14 च्या सरासरीने ब्रॅडमन यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये 28 हजार 67 धावा काढल्या. आपल्या अखेरच्या कसोटीत 100 ची सरासरी गाठण्यासाठी ब्रॅडमन यांना अवघ्या 4 धावांची गरज होती, मात्र ही कामगिरी करणं त्यांना जमलं नाही.

भारतीय पुरूष व मिश्र संघांना कांस्यपदक:
  • भारताच्या पुरुष व मिश्र संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्यामुळे कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष संघाला सिंगापूरकडून तर मिश्र संघाला थायलंडकडू न पराभूत व्हावे लागल.

  • पात्रता फेरीनंतर पुरूष संघ चौथ्या तर मिश्र संघ अग्रस्थानी राहिले होते. सुपर मिश्र संघात उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही. भारताच्या पुरूषांच्या 6 सदस्यीय संघामध्ये जग्गी शिवदसानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलाणी, देवब्रत, मुजुमदार आणि सुमीत मुखर्जी यांचा समावेश होता.

  • तसेच दुसरीकडे मिश्र संघामध्ये किरण नाडर, हेमा देवरा, हिमानी खंडेलवाल, बचिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मण्णा आणि राजीव खंडेलवाल यांनी भारतीय संघाची आघाडी सांभाळली.
दिनविशेष:
  • सन 1957 मध्ये मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
  • उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 मध्ये झाला
    .
  • इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते सेतू माधवराव पगडी यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला.
  • संतसाहित्याचे अभ्यासक वि.रा. करंदीकर यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला.

चालू घडामोडी २६ सप्टेंबर २०१८

चालू घडामोडी   

Sep 25, 2018

ASO पदाविषयी संपूर्ण माहिती

ASO पदाविषयी संपूर्ण माहिती 

PIS (पोलीस उपनिरीक्षक ) पदाविषयी संपूर्ण माहिती

PIS (पोलीस उपनिरीक्षक ) पदाविषयी संपूर्ण माहिती 

STI पदाविषयी संपूर्ण माहिती





STI पदाविषयी संपूर्ण माहिती 



Duties of STI-:

Duties and Responsibilities of Sales Tax Inspector
  • Handle cases related to payment of Sales Tax by dealers/vendors
  • Contact defaulters and obtain information regarding payment of taxes
  • collect the information of dealer’s current debtors and serve a notice under section 33 of the MVAT Act, 2002 on all debtors
    visits the place of business/shop/factory/godown, etc as well as place of residence of the dealer for the purpose of execution of warrant of attachment.
  • Do the Panchnama for attaching the property
  • Arrange and be present for the auction of property
  • etc
Promotion:-

Sales Tax Officer
Asst Commissioner of Sales Tax (in certain cases)
Sales Tax Training Center, 7th Floor, Vikrikar Bhavan, Mazgaon, Mumbai


Training :-

एस.टी.आय. परीक्षेचा फायनल रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने खालीलप्रमाणे काळजी घ्यावी:
  • सर्वात आधी आपले कागज पत्रे तयार ठेवावीत. त्यासाठी MPSC च्या वेब साईट वरसर्व साधारण सूचनावाचाव्यात.
  • जवळच्या पोलीस स्टेशनला चौकशी करावी कि तुमचे वेरीफिकेषण आले आहे का आणि त्याची पूर्तता करावी.
  • जोइनिन्ग लेटर आले कि लगेच माझगाव च्या ऑफिस ला किंवा त्या पत्रात दिलेल्या ऑफिसला ठराविक तारखेला जॉईन व्हावे.
  • जे शासकीय सेवेत अगोदरपासून आहेत त्यांना जर  पे प्रोटेक्शन, सर्विस प्रोटेक्शन हवे असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा किंवा नियम प्रमाणे जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे करावे नाहीतर मग राजीनामा देवून एस.टी.आय. जावीन करावे पण असे केल्यास त्यांना  पे प्रोटेक्शन, सर्विस प्रोटेक्शन मिळणार नाही हे लक्षात असू द्यावे.
ट्रेनिंग:
  • एक तर माझगाव ला ट्रेनिंग होईल १५ दिवस किंवा तुम्हाला मिळालेल्या ऑफिस मध्येच ट्रेनिंग सुरु होईल.
  • कालावधी१५ दिवस ते पुढे वर्षे पण असू शकतो.
पगार:
  • ह्या अवधीत सर्वांना सारखाच पगार मिळेल मग प्रोबेशन संपल्यावर जे अगोदर शासकीय सेवेत होते त्यांना नियमाप्रमाणे पे प्रोटेक्शन, सर्विस प्रोटेक्शन मिळते.

How to Solve Question Papers

 according to new syllabus:-


मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण  एस. टी. आय. पूर्व परीक्षा 2019 देणार आहात ना?
माझ्या मते तुम्ही जर खालीलप्रमाणे प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी वेळेचं नियोजन केलं तर तुम्ही ठरलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवू शकाल.
100 प्रश्नसोडवण्यासाठी 60 मिनिटे असतात.
साधारणपणे, खालीलप्रमाणे प्रश्न येतात त्या त्या विषयावर:
  • अंकगणित बुद्धिमापन – 15 प्रश्न
  • भूगोल – 15 प्रश्न
  • इतिहास – 15 प्रश्न
  • विज्ञान – 15 प्रश्न
  • नागरिकशास्त्र – 10 प्रश्न
  • चालू घडामोडी – 15 प्रश्न
  • अर्थव्यवस्था – 15 प्रश्न
प्रश्नपत्रिका सोडवतांनी खालीलप्रमाणे वेळेची विभागणी करावी म्हणजे सर्व प्रश्न सोडवता येतील:
  • 10 मिनिटेशेवटच्या क्षणी रिविजन साठी म्हणजे काही प्रश्न राहिले असतील तर त्यांना सोडवण्यासाठी राखून ठेवावेत.
  • अंकगणिताचे 15 प्रश्न सुरुवातीला सोडवू नयेत कारण त्यात भरपूर वेळ वाया जातो. ते प्रश्न सर्वात शेवटी सोडवावेत. त्यासाठी 10  मिनिटे बाजूला ठेवावेत.
  • तर मग 85 प्रश्न 40 मिनिटांत सोडवायाचेत. 40 min x 60 sec = 2400 seconds
  • प्रत्येक प्रश्न 28 सेकंदात सोडवायचा प्रयत्न करावा. (2400 /85 = 28)
  • ज्या प्रश्नाचं उत्तरयेतचनसेल तर तो प्रश्न लगेच सोडून द्यावा आणि पुढच्या प्रश्नाकडे जावे. पण त्या प्रश्नाच्या अगदी समोर एक लहानसा डॉट टाकावा (तो सहजासहजी दुसऱ्या कुणाला दिसू नये) म्हणजे लगेच तुम्हाला कळेल कि तो प्रश्न राहून गेलाय. किंवा तो प्रश्न क्रमांक तुम्हीरफ वर्ककराल त्या जागी लिहून ठेवावा.
  • एखादा प्रश्न 20 सेकंदात सोडवता आला नाही तर त्याला सोडून पुढील प्रश्नाकडे जावे. पण त्या प्रश्नाच्या अगदी समोर एक लहानसा डॉट टाकावा (तो सहजासहजी दुसऱ्या कुणाला दिसू नये) म्हणजे लगेच तुम्हाला कळेल कि तो प्रश्न राहून गेलाय. किंवा तो प्रश्न क्रमांक तुम्हीरफ वर्ककराल त्या जागी लिहून ठेवावा.
  • जर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 20 सेकंद दिलेत तर पहिल्या राउंड मध्ये 85 प्रश्नांना 28 मिनिटे लागतील (85 प्रश्न X 20 सेकंद = 1700 सेकंद/60 = 28 मिनिटे).
  • दुसरा राउंड 12 मिनिटांचा असेल. तर 12 मिनिटांत राहून गेलेले प्रश्न सोडवावेत. तेव्हा सुद्धा वरील प्रमाणे 20 सेकंदाचा रूल वापरावा.
  • 10 मिनिटांत अंक गणितावरील 15 प्रश्न सोडवावेत.
  • सर्वात शेवटी 10 मिनिटे उरतील तर त्यादरम्यान राहून गेलेले बाकी प्रश्न सोडवावेत.
ऑल बेस्ट मित्रांनो !!!

STI Prelims Exam Syllabus
New syllabus from 2018.
सामान्य क्षमता चाचणी:
प्रश्नसंख्या – १००   एकूण गुण – १००   दर्जा – पदवी   वेळ – तास  प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
. नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
आधुनिक भारताचा विशेषत:  महाराष्ट्राचा इतिहास
. भूगोल  (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
सामान्य विज्ञानभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र.
. बुद्धिमापन चाचणी अंकगणित 


2015 – STI Prelims – Expected Cut Off for example :-


STI Prelims 2014 – Revised Expected Cut Offs (Exam conducted on 1 Feb 2015)
Please DO NOT ask queries related to Cut Offs. Please refer these cut offs for your category. All questions related to this will be deleted as I have to give time to other queries.
Open Category
GENERAL – 32-35
FEMALE – 30-32
SC Category
GENERAL – 30-33
FEMALE – 30-32
ST Category
GENERAL – 30-32
FEMALE – 25-28
DT(A) Category
GENERAL – 32-35
FEMALE – 30-32
NT(B) Category
GENERAL –32-35
SBC Category
GENERAL –32-35
NT(C) Category
GENERAL – 32-35
FEMALE – 30-32
OBC Category
GENERAL –32-35
FEMALE – 30-32
PH
Hearing Impaired – 25-28