Apr 30, 2019

30 April 2019 Current Affairs

देशात चौथ्या टप्प्यात 64 टक्के मतदान:
  • लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांमधील 72 मतदारसंघांमध्ये सुमारे 64 टक्के मतदानझाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या, तर काही भागात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याच्या तक्रारी मिळाल्या.
  • 2014 च्या निवडणुकांत ज्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपने 32 पैकी 30 जागा मिळवल्या होत्या, त्या राजस्थानमध्ये (13 जागा) 62 टक्के, उत्तर प्रदेशात (13 जागा) 53.12 टक्के, तर मध्य प्रदेशात (6 जागा) 65.86 टक्के मतदान झाले.
  • पश्चिम बंगालमधील आठ मतदारसंघांत 76.47 टक्के मतदान झाले. बिरभूम मतदारसंघातील नानूर, रामपूरहाट, नलहाटी व सुरी येथे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये चकमकी उडाल्या व त्यात अनेक लोक जखमी झाले.
भारतीय सैन्याकडून हिममानवच्या पाऊलखुणांचे फोटो प्रसिद्ध:
  • बर्फाळ प्रदेशातील हिममानवाविषयी आपण नेहमीच चर्चा ऐकतो. याविषयीच्या कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले असून भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
  • भारतीय सैन्याच्या पथकाला 9 एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. नेपाळ-चीन सीमेजवळचा हा परिसर आहे. हे ठसे मानवी पावलासारखे दिसत असले तरी त्यांचा आकार 32 x 15 इंच इतका होता.
  • तर या भागातील कोणत्याही प्राण्याच्या पावलांचे ठसे इतके मोठे नसल्याने सैन्याचे पथकही संभ्रमात पडले होते. मात्र, हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत. हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता सैन्याने वर्तवली आहे.
खेलरत्नसाठी बजरंग व विनेश यांच्या नावांची शिफारस:
  • भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) नुकत्याच आशियाई चॅम्पियन ठरलेला बजरंग पूनिया व गेल्या वर्षी आशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती विनेश फोगाट यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
  • डब्ल्यूएफआने बजरंग व विनेश यांची गेल्या दोन वर्षांतील शानदार कामगिरी बघता त्यांच्या नावांची पुरस्कारासाठी शिफारस केली.
  • डब्ल्यूएफआयचे अधिकारी म्हणाले, ‘या दोघांनी अर्ज सादर केले होते. त्यानंतर डब्ल्यूएफआयने त्यांच्या नावांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली.’ जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बजरंगने अलीकडेच शियानमध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
  • विनेश आशियाई चॅम्पियनशिपमध्ये केवळ कांस्यपदक जिंकू शकली, पण ती नव्या गटात 53 किलोमध्ये खेळत होती. ती 2018 मध्ये आशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिला भारतीय महिला मल्ल ठरली.
  • बजरंग व विनेश यांच्या व्यतिरिक्त डब्ल्यूएफआयने राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरान व पूजा ढांडा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
  • 25 वर्षीय पूजाने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य व राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. 21 वर्षीय दिव्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. राष्ट्रकुल व आशियाई गेम्समध्ये ती तिसऱ्या स्थानी होती.
66व्या कलेशी गाठ घालून देणारा दिग्दर्शक:
  • गेल्या काही वर्षांत तरुण दिग्दर्शक अनेक वेगवेगळे विषय घेऊन मराठी चित्रपट करत आहेत. या दिग्दर्शकांच्या पंक्तीत आणखी एक नाव सामील झालं आहे ते म्हणजे ‘ग्रहण‘ फेम अभिनेता योगेश देशपांडे.
  • अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रातील लेखन-दिग्दर्शनाचा अनुभव असलेल्या योगेशला अभिनेता म्हणून झी मराठी वाहिनीवरील ग्रहण मालिके ने घराघरांत पोहोचवले होते. आता योगेश ’66 सदाशिव’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे.
  • 65 वी कला म्हणून मान्यता मिळालेल्या जाहिरात क्षेत्रातील अनुभवाचा आधार घेऊन योगेशने एक कथा लिहिली. ज्यात तो लोकांना 66व्या कलेची ओळख करून देणार आहे.
दिनविशेष:
  • 30 एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन म्हणून साजरा केला जातो.
  • भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक ‘धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके’ यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता.
  • माणिक बांडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये झाला.
  • वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापना सन 1936 मध्ये केली.
  • सन 1977 मध्ये 9 राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • कलकत्त्यात 1982 या वर्षी बिजान सेतु हत्याकांड घडले होते.

29 April 2019 Current Affairs

1 मे पासून आर्थिक गोष्टींत होणार बदल :
  • येत्या 1 मे 2019 पासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे.
  • तसेच बदलण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बँक, रेल्वे, विमानसेवा यांच्या संबंधित आर्थिक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.
  • तर सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने अशाप्रकारे नियमांमध्ये बदल करण्यात येतात.
  • SBI : 1 मेपासून बँकेचे डिपॉझिट आणि कर्जाचे व्याजदर RBIच्या बेंचमार्क दराशी जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना आधीच्या व्याजाच्या तुलनेत बचत खात्यावर कमी व्याज मिळणार आहे. हा नियम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त
    जमा रक्कम आणि कर्जदरावर लागू आहे.
  • PNB : पंजाब नॅशनल बँक स्वतःचा डिजिटल वॉलेट PNB Kitty (पीएनबी किटी )ला 1 मेपासून बंद करणार आहे. त्यामुळे 1 मेपासून आपल्याला पीएनबी किटीऐवजी दुसऱ्या पर्यायी वॉलेटचा वापर करावा लागणार आहे. बँकेने
    ग्राहकांना 30 एप्रिलपूर्वी वॉलेटमधील रक्कम खर्च करण्याविषयी सूचित केले होते. ही रक्कम खर्च न झाल्यास ‘आयएमपीएस’द्वारे बँकेच्या खात्यात वळते करून घेण्यासही सांगितले होते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप ‘पीएनबी
    किट्टी’मधील रक्कम खर्च अथवा वळती केलेली नाही, त्यांना एक दिवसाचा अवधी आहे.
  • रेल्वे आरक्षण : 1 मेपासून ट्रेन प्रवासाचे आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडले आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. एक मेपासून चार्ट तयार होण्याच्या चार तास आधी प्रवाशांना
    बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.
  • तिकीट रद्द केल्यास शुल्क नाही : 1 मेपासून एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट 24 तासांचा आत रद्द केल्यास आपल्याला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.
  • गॅस दर : 1 मेपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे. यावेळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी 1 एप्रिलला घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली होती.
पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ :
  • केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करत कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे.
  • तसेच आता कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) चालू आर्थिक वर्षासाठी 8.61 टक्के इतके व्याज मिळणार आहे. तर याचा फायदा तब्बल 6 कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
  • ‘ईपीएफओ’ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पीएफवर 8.61 टक्के इतके व्याज मिळणार आहे.
  • तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये भविष्य निर्वाह निधीवर 8.55 टक्के व्याजदर होते आता 2018-19 मध्ये 0.10 टक्केवाढवून 8.61 टक्के करण्यात आला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती :
  • शिवसेनेत प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तसेच मागच्या आठवडयात प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.
  • तर पत्रकार परिषदेत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या आठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याचा निर्णय प्रियंका चतुर्वेदी यांना पटला नव्हता.
भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच 20 रुपयाची नवी नोट दाखल :
  • भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच 20 रुपयाची नवी नोट दाखल होणार आहे.
  • रिझव्‍‌र्ह बँकेकडून लवकरच नवीन वैशिष्टय़े आणि रंगातील 20 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे.
  • गेल्या दोन-तीन वर्षांत मध्यवर्ती बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. त्याच्याबरोबर आता लवकरच 20 रुपयाची नवी नोटदेखील
    चलनात येणार आहे.
  • तर 20 रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील रंग (हिरवट पिवळा) असेल. या नोटेवर RBI चे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस भारताचा
    सांस्कृतिक ठेवा असलेल्या वेल्लोरा लेणींचे चित्र असणार आहे. तसेच अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे.
दिनविशेष :
  • 29 एप्रिल : आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
  • 29 एप्रिल 1945 दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
  • 29 एप्रिल 1986 मध्ये लॉस एंजेल्स लाईब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे 4,00,000 पुस्तके नष्ट झाले.

27 April 2019 Current Affairs

महिला ‘आयपीएल’मधून ऑस्ट्रेलियाची माघार:
  • पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनर्आखणीसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) वाद सुरू असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप ‘बीसीसीआय’ने केला आहे.
  • मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तीन क्रिकेटपटूंना महिला ‘आयपीएल’मध्ये सहभागी होण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मज्जाव केला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत जयपूर येथे तिरंगी स्पर्धा होणार आहे.
  • पुरुषांची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात यावी, यासाठी ‘बीसीसीआय’वर दडपण आणण्याच्या हेतूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकारी बेलिंडा क्लार्क (माजी कर्णधार) यांनी हा ई-मेल पाठवला आहे.
  • नव्या दौरा आखणी कार्यक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियाला जानेवारी 2020 मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळावी लागणार आ
भास्कर कांबळी 2019 चा मुंबई महापौर श्री:
  • ग्रेस फिटनेसच्या भास्कर कांबळीने एकापेक्षा एक अशा सरस असलेल्या खेळाडूंवर सहज मात करीत मुंबई महानगर पालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री 2019 वर आपले नाव कोरले आणि शरीरसौष्ठव हंगामाचा आपला शेवट दणदणीत केला.Bhaskar-Kambli
  • पालिकेकडून केवळ दीड लाखांचा तुटपंजा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन यांनी पुन्हा एकदा दमदार शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचे धाडस दाखवले.
  • सर्वत्र निवडणूकांची रणधुमाळी सुरू असल्यामुळे या स्पर्धेला फारसे कॉर्पोरेट तसेच राजकीय बळही लाभू शकले नाही. तरीही संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अजय खानविलकर यांनी पुन्हा एकदा शरीरसौष्ठव खेळाला आर्थिक बळ दिले.
  • क्रीडाप्रेमी संतोष राणे यांनी केलेल्या सहकार्यामुळे अनंत अडचणी येऊनही यंदाही मुंबई महापौर श्री स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्याचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी सांगितले. आमचा खेळ असंख्य क्रीडाप्रेमी संघटक आणि हितचिंतकांमुळे आर्थिकदृष्ट्या चांगलाच सक्षम झाल्याचेही सावंत म्हणाले.
माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व नाममात्र:
  • आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) ‘लाल यादीत’ लुप्तप्राय प्रजाती म्हणून नोंदझालेल्या माळढोक पक्ष्याला वाचवण्यासाठी सँच्युरी नेचर फाऊंडेशन, कन्झर्वेशन इंडिया आणि द कार्बेट फाऊंडेशन यांनी आपत्कालीन मोहीम सुरू केली आहे.
  • जगभरात पक्ष्यांना वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीतीचा वापर या मोहिमेसाठी करण्यात आला आहे. यात माळढोकचा वावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण ठिकाणांवरील वीज तारा भूमिगत करणे, या पर्यायाचा समावेश आहे.
  • गेल्या 50 वर्षांत 90 टक्के माळढोकचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. या पक्ष्याच्या अलीकडच्या सर्वेक्षणात 150 पेक्षाही कमी जंगलात त्यांचे अस्तित्व राहिले आहे. या सर्वेक्षणात मध्यप्रदेशातून तर ते कधीचेच नाहीसे झाल्याचा निष्कर्ष आहे, तर महाराष्ट्रात त्यांची संख्या केवळ आठ इतकी आहे. कधीकाळी हाच पक्षी भारतातील बारा राज्यात आणि पाकिस्तानच्या काही भागात आढळून येत होता.
  • भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून) व भारतीय विज्ञान संस्था (बंगळुरू) येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात या पक्ष्यांमध्ये एक कमी अनुवंशिक विविधता आढळून आली. त्यावरून त्यांची संख्या गेल्या अनेक वर्षांपासून कमी कमी होत जाऊन संपण्याच्या मार्गावर असल्याचे निष्पन्न झाले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश, साक्षीला कांस्यपदक:
  • रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजेत्या विनेश फोगटलाआशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय महिलांना या स्पध्रेत एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही.vinesh fogat
  • साक्षीला 62 किलो वजनी गटामध्ये उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु कांस्यपदकाच्या ‘प्ले-ऑफ’ सामन्यात साक्षीने उत्तर कोरियाच्या ह्य़ोन ग्याँग मूनला नमवून कांस्यपदक पटकावले.
  • स्पर्धेच्या प्रारंभी साक्षीने व्हिएतनामच्या थाय माय हॅन्ह नग्युएनला पराभूत करीत आगेकूच केली. मात्र दुसऱ्या फेरीत जपानच्या युकाको कावाईकडून तिला पराभव पत्करावा लागला. मात्र कावाई अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्याने साक्षीला रेपिचेजमध्ये पुन्हा संधी मिळाली.
  • ‘रेपिचेज’ फेरीत साक्षीने तांत्रिक गुणांआधारे जिआई चोयवर मात केली. या स्पर्धेपूर्वी विनेशने 50 किलो वजनी गटात जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, ऑलिम्पिकच्या दृष्टीने कुस्तीसाठी नवीन वजनी गट निश्चित केल्यामुळे तिने 53 किलो गट निवडला.
‘ईपीएफ’वर यंदा 8.65 टक्के व्याज मिळणार:
  • आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्याच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
  • यामुळे ईपीएफओच्या 6 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) ईपीएफओच्या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ 8.65 व्याज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • सुत्रांनी सांगितले की, वित्तीय सेवा विभागाने रिटायरमेंट फंडच्या पुरेशा व्यवस्थापनाशी निगडीत काही अटी पूर्ण करण्याच्या आधारावर ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • याआधी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
  • गेल्या तीन वर्षांत ईपीएफच्या व्याजदरात केलेली ही पहिली वाढ आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के इतका व्याजदर होता, तो 2016-17 मध्ये 8.65 टक्क्यांवर आणण्यात आला. 2017-18 मध्ये तो 8.55 टक्के म्हणजे आणखीच घट करण्यात आली. मात्र, आता 2018-19 मध्ये वाढ करण्यात आली आहे.
  • अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आता आयकर विभाग आणि श्रम मंत्रालय 2018-19 साठी व्याजदरची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर ईपीएफओ आपल्या 120 हून अधिक क्षेत्रिय कार्यालयांना कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजदर जमा करण्यासाठी निर्देश देईल.
विश्वचषकाच्या 22 पंचांमध्ये भारताचे फक्त एक पंच:
  • इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तीन विश्वविजेते खेळाडू आणि सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचाचा 22 जणांच्या सामनाधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.
  • 48 दिवसांच्या विश्वचषकासाठी एकूण 16 पंच, सहा सामनाधिकारी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) निवड केली आहे.
  • तर यात डेव्हिड बून, ब्रुस ऑक्सनफोर्ड, कुमार धर्मसेना, आलीम दर यांचा समावेश आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची नेमणूक राऊंड रॉबिन टप्प्यांचे सामने संपल्यानंतर जाहीर केली जाईल.
दिनविशेष:
  • मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म 27 एप्रिल 1791 रोजी झाला.
  • सन 1854 मध्ये पुण्याहून मुंबईला तारायंत्राव्दारे पहिला संदेश पाठविला गेला.
  • चौथ्या ऑलिम्पिक खेळांना सन 1908 मध्ये लंडन येथे सुरुवात झाली होती.
  • सन 1961 मध्ये सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • एकाच अग्निबाणाव्दारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली सन 1999 मध्ये भारतात तयार झाली

Apr 26, 2019

26 April 2019 Current Affairs

भारतीय लष्कर हायटेक होणार:
  • भारत सरकार लवकरच सुरक्षादलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दूर्गम भागात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणाऱ्या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे.
  • सरकारने 613 कोटी 96 लाखांचे बजेट पास केले आले आहे. या पैश्यांमधून केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणाऱ्या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.
  • गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (एनएसजी) 16 कोटी 84 लाखांची तरतूद करण्यात आली असून या पैश्यांमधून रोमोटने चालणारी सात वाहने विकत घेतली जाणार आहेत.
महिलांचा सैनिक होण्याचा मार्ग मोकळा:
  • भारतीय लष्कराने 25 एप्रिलपासून महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. लष्करातील ‘मिलिटरी पोलिस’विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.Indian Army
  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी महिलांना लष्करात भरती करुन घेण्याची घोषणा केल्यानंतर चार महिन्यांनी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
  • लष्कराने यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली असून भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जून असणार आहे.
  • भारतीय सुरक्षा दलांमध्ये महिलांना आजवर केवळ अधिकारी पदावर नियुक्त केले जात होते. वैद्यकीय, कायदा, अभियांत्रिक अशा लष्काराच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये महिलांना समाविष्ट करुन घेतले जात होते. मात्र आता तरुणींना थेट लष्करी जवान बनण्याची संधी उपलब्ध होणार असून करियरचा नवा पर्याय म्हणून याकडे पाहता येणार आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा 2019:
  • गेल्या 30 वर्षांत आपली आगळी-वेगळी ओळख बनविणाऱ्या पुणे स्थित आणि नोंदणीकृत चॅरिटेबल संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे यावेळी संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींना सन्मानित केले गेले.
  • प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून प्रत्येक वर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळयाचे वितरण काल दिनांक 24 एप्रिल, 2019 रोजी मुंबई येथील षणमुखानंद हॉल येथे पार पडले. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल श्री विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असून यावर्षीच्या विजेत्यांना आरएसएस प्रमुख माननीय श्री मोहन भागवत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
  • यावर्षीचे संगीत आणि कला क्षेत्रातील नामवंत शास्त्रीय नर्तकी श्रीमती सुचेता भिडे-चाफेकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव श्री सलीम खान यांना प्रदान करण्यात आला.
  • भारतीय चित्रपटसृष्टीत महत्वपूर्ण योगदानासाठी श्री मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार तर श्रीमती हेलन यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित केले गेले.
  • तसेच साहित्य क्षेत्रात श्री वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कारांनी पुरस्कृत केले गेले. भद्रकाली प्रॉडक्शनचे ‘सोयारे सकाळ’ हे नाटक मोहन वाघ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरविण्यात आले.
  • तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना आनंदमयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आशियाई कुस्ती स्पर्धेत दिव्या, मंजूला कांस्यपदक:
  • भारताच्या दिव्या काकरान आणि मंजू कुमारी यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.aashiyaai sport
  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती दिव्या हिने 68 किलो वजनी गटाच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीत मोंगोलियाच्या बॅटसेटसेग सोरोंझोनबोल्ड हिला हरवत कांस्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर मंजू कुमारीने व्हिएतनामच्या थी हुआँग डाओ हिला 11-2 असे पराभूत करत भारताच्या खात्यात दुसऱ्या कांस्यपदकाची भर घातली.
  • दिव्या आणि मंजू यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे कांस्यपदकासाठीच्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली. 2017 मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या दिव्याला उपांत्य फेरीत चीनच्या फेंग झोऊ हिच्याकडून 4-14 असा पराभव पत्करावा लागला.
  • तर त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत दिव्याने व्हिएतनामच्या हाँग थुय गुयेन हिला 10-0 असे हरवले होते. गुडघ्याच्या दुखापतीनंतर पुन्हा एकदा पुनरागमन करणाऱ्या दिव्यासाठी कांस्यपदक विशेष मानले जात आहे.
ISSF World Cup स्पर्धेत भारताला सुवर्णपदक:
  • चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली आहे.
  • मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने 10 मी. एअर पिस्तुल मिश्र प्रकारात सुवर्णपदक कमावले. याआधी 10 मी. एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
  • मनू-सौरभ जोडीने अंतिम फेरीत आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवले. यजमान चीनच्या जोडीवर 16-6 अशी मात करत भारतीय जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत मनू-सौरभ जोडीने 482 गुणांसह पाचवे स्थान मिळवले होते. मनू-सौरभ व्यतिरीक्त हिना सिद्धु-शेहजार रिझवी या भारतीय जोडीला बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दिनविशेष:
  • 26 एप्रिल हा दिवस ‘जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन’ आहे.
  • पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म 26 एप्रिल 1479 मध्ये झाला होता.
  • अटलेटीको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना 1903 मध्ये झाली.
  • सन 1964 मध्ये टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.
  • जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणार्‍या अधिवेशनाची अंमलबजावणी सन 1970 मध्ये झाली होती.
  • सन 1973 मध्ये ‘अजित नाथ रे’ हे भारताचे 14वे सरन्यायाधीश झाले होते.

25 April 2019 Current Affairs

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत संजीवनी जाधवला कांस्यपदक:
  • भारताच्या 4 बाय 400 मीटर मिश्र रिले चमूने आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे, तर संजीवनी जाधवने 10 हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
  • 4 बाय 400 मीटर मिश्र रिले हा प्रकार अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात यंदा प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. भारताच्या मोहम्मद अनास, एम.आर. पूवम्मा, व्ही.के. विस्मया आणि अरोकिया रावजी या चमूने 3:16.47 मिनिटे वेळ राखून दुसरे स्थान मिळवले. या गटात बहरिनने सुवर्णपदक जिंकले. 400 मीटर शर्यतीतून पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेणारी हिमा दास या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही.
  • नाशिकच्या 22 वर्षीय संजीवनीने 32 मिनिटे आणि 44.96 सेकंद अशी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवताना भारताच्या खात्यावर कांस्यपदक जमा केले. बहरिनची शिताये हॅबटेगेब्रेल (31:15.62 मि.) आणि जपानच्या हितो निया (31:22.63 मि.) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर नाव कोरले
बालाकोटमध्ये सहापैकी पाच लक्ष्यभेद यशस्वी:
  • पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद प्रशिक्षण शिबिरावर 26 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात या परिसरातील सहा इमारतींपैकी पाच लक्ष्ये टिपण्यात भारतीय वायुदलाच्या विमानांना यश आले होते, असे वायुदलाने या हल्ल्यांबाबत केलेल्या पुनरावलोकनात (रिव्ह्य़ू) दिसून आले आहे.balkot
  • या सविस्तर पुनरावलोकनात या हवाई मोहिमेची बलस्थाने, कमकुवत बाबी आणि त्यातून शिकलेले धडे यांच्यावर झोत टाकण्यात आला असल्याचे या प्रक्रियेशी संबंधित दोन सूत्रांनी सांगितले.
  • लक्ष्याचा नेमका वेध घेण्यासाठी अधिक चांगली शस्त्रे हाताशी असायला हवी होती. त्यातून प्रचारयुद्धातही वरचष्मा राखता आला असता, हे या समीक्षेत मान्य करण्यात आले आहे. याचवेळी, धक्कातंत्र कायम राखणे, मोहिमेची सुरक्षितता, वैमानिकांची कुशलता आणि वापरलेल्या शस्त्रांची अचूकता याबद्दलच्या सकारातामक बाजूंचाही त्यात ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे.
आशियाई कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुला कांस्यपदक:
  • आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवशीसुद्धा वर्चस्व कायम राखले आहे. अमित धानकरने रौप्यपदक, तर राष्ट्रकुल विजेत्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेनेकांस्यपदकाची कमाई केली.
  • 2013 मध्ये 66 किलो गटात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमितला 74 किलो फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या डॅनियार कैसानोव्हाने त्याचा 5-0 असा पराभव केला.
  • हरयाणाच्या 28 वर्षीय अमितने पात्रता फेरीत इराणच्या अश्घर नोखोडिलारिमीवर 2-1 असा निसटता विजय मिळवला. मग उपांत्यपूर्व सामन्यात जपानचा युही फुजिनामी जखमी झाल्यामुळे त्याला पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपांत्य सामन्यात अमितने किर्गिझस्तानच्या इगिझ डहाकबेकोव्हाला 5-0 असे नमवले.
  • गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहुलने 61 किलो फ्रीस्टाइल प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या जिनचेओल किमचा 9-2 असा पाडाव केला.
निवडणुकीनंतर जाहीर होणार राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी:
  • 66व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावे लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर होणार आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होतात. पण यंदा लोकसभा निवडणूक असल्याने नावे जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.national-awards
  • राष्ट्रीय पुरस्कारांदरम्यान चित्रपटांना प्रोत्साहन देणाऱ्या राज्याचाही सन्मान केला जातो. मात्र निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
  • निवडणुकांमध्ये सर्व पक्षांना आणि उमेदवारांना समान संधी मिळणे अपेक्षित असते. अशा वेळी पुरस्कार जाहीर झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, त्यामुळे तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • वर्षभरात चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांना दरवर्षी 3 मे रोजी नवी दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी पुरस्कार वितरणाची तारिख अद्याप जाहीर झालेली नाही.
  • गेल्या वर्षी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर ‘वीलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला होता. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
हृतिक रोशनचा संघर्ष सातासमुद्रापार:
  • लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनने 2000 साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
  • या चित्रपटामुळे हृतिक रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर केवळ भारतीय तरुणीच नाही तर विदेशी प्रेक्षकही घायाळ आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता पार सातासमुद्रापार पोहोचलीआहे.
  • मात्र एक सशक्त अभिनेता होण्यासाठी हृतिकने बराच संघर्ष केला असून अनेक वेळा त्याने त्याच्या संघर्षाबाबत खुलेपणाने चर्चा केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या संघर्षाची दखल एका आंतरराष्ट्रीय पुस्तकाने घेतली आहे.
  • आंतरराष्ट्रीय आणि प्रसिद्ध असलेल्या बेन ब्रूक्स या पुस्तकामध्ये हृतिकने स्थान मिळविले आहे. ‘Stories for boys who dare to be different’ या पुस्तकात बीथोवेन, बराक ओबामा, फ्रॅंक ओसन यांसारख्या महान व्यक्तींसह ऋतिकच्या संघर्षांला चित्रित करण्यात आले आहे. नुकतेच हृतिकने सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली.
दिनविशेष:
  • 25 एप्रिल हा दिवस ‘जागतिक मलेरिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • रेडिओचे संशोधक गुग्लिल्मो मार्कोणी यांचा जन्म 25 एप्रिल 1874 मध्ये झाला.
  • स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे सन 1901 मध्ये अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
  • सन 1953 मध्ये डीएनए रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोध निबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला होता.

24 April 2019 Current Affairs

तीन न्यायाधीशांची चौकशी समिती:
  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध एका माजी महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रार प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. एस.ए. बोबडे, न्या. एन.व्ही. रामण्णा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांची एक समिती स्थापन केली. समिती स्थापन करण्याचा निर्णय ‘पूर्ण न्यायालयाने’ घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • सरन्यायाधीशांनी सेवाज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्या. एस.ए. बोबडे यांना याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यास सांगितल्याचे वृत्त देण्यात आले होते. त्यानुसार समिती स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला आणि तो न्यायाधीशांमध्ये वितरित करण्यात आला, न्यायाधीशांनी तो मान्य केला आणि त्यानुसार हा निर्णय घेतला गेला.
  • न्या. गोगोई यांच्या घरातील कार्यालयात गेल्या वर्षी ही महिला काम करीत होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा या महिलेचा आरोप आहे. या लैंगिक शोषणाला आपण विरोध केला असता आपल्याला काढून टाकण्यात आले आणि दिल्ली पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल असलेल्या माझ्या पती आणि दीरालाही निलंबित केले गेले, असा तिचा आरोप आहे.
आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत स्वप्ना बर्मनला रौप्यपदक:
  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि गतविजेत्या स्वप्ना बर्मन हिला आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.Swapna-Barman
  • मात्र पदकासाठीचा दावेदार समजल्या जाणाऱ्या जिन्सन जॉन्सनने दुखापतीमुळे पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीतून माघार घेतली.
  • 22 वर्षीय स्वप्नाने सात क्रीडाप्रकारांमध्ये 5993 गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले. तिच्यावर उझबेकिस्तानच्या एकतारिना वोरनिना हिने 6198 गुण मिळवत मात केली. याच गटात भारताच्या पूर्णिमा हेमब्राम हिला 5528 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • स्वप्नाच्या रौप्यपदकामुळे भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली. तर महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरी हिने 10.03.43 सेकंद अशी वेळ देत पाचवे स्थान प्राप्त केले.
तिसऱ्या टप्प्यात राज्यात 61 टक्के मतदान:
  • लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघांत 23 एप्रिल रोजी संध्याकाळी सहापर्यंत सरासरी 61.30 टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. उन्हाचा कडाका असतानाही पश्चिम महाराष्ट्रात उत्साहात मतदान झाले.
  • औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा व रत्नागिरी वगळता इतर 6 ठिकाणी मतदानाची टक्केवारी गेल्या वेळपेक्षा बरीच घसरली. सर्वाधिक कमी मतदान पुण्यात 52 टक्के झाले. ईव्हीएम बिघाडीच्या 600 वर तक्रारी आल्या.
  • अहमदनगरमध्ये सर्वाधिक 500 तर कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात 72 ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने मतदानप्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली. औरंगाबाद, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, मराठवाडा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही यंत्र बिघाडीच्या घटना घडल्या. त्यामुळे सहा वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदार रांगेमध्ये मतदानासाठी ताटकळत उभे होते.
बजरंगची पुन्हा एकदा आशियाई स्पर्धेत सुवर्ण कमाई:
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंग पुनियाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कमाल केली. अखेरच्या क्षणी पिछाडीवर असताना सलग 10 गुणांची कमाई करत बजरंगने पुन्हा एकदा आशियाई स्पर्धेच्या सुवर्णपदाकाला गवसणी घातली.bajrang punia
  • पुरुषांच्या 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बजरंगने कझाकस्तानच्या सायाटबेक ओकासोव्ह याच्यावर 12-7 अशी सरशी साधली. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बजरंग शेवटच्या 60 सेकंदांचा खेळ शिल्लक असताना 2-7 असा पिछाडीवर पडला होता.
  • मात्र तीन वेळा कल्पक डाव आखत बजरंगने प्रतिस्पध्र्याला नामोहरम करत आठ गुणांची कमाई केली. अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत दोन गुण पटकावून त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • कझाकस्तानचा ओकासोव्ह पूर्णपणे दमला असल्याचा फायदा बजरंगने उठवला. बजरंगने मात्र तणावाच्या स्थितीतही संयम ढळू न देता अतिशय चाणाक्ष पद्धतीने प्रतिस्पध्र्याला अस्मान दाखवले. बजरंगची ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. बजरंगचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक तर पाचवे पदक ठरले. याआधी त्याने 2017 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोताचा शोध:
  • उन्हाळ्यात भकास झालेल्या वडाळी वनपरिक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधून काढण्यात विभागाला मधमाशांच्या अस्तित्वामुळे यश आले. यामुळे वन्यप्राण्यांना तहान भागवण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
  • वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्यासह वनरक्षक सुरेंद्र डहाके व निलेश करवाळे हे जंगल परिसरात गस्ती घालत होते. तेव्हा या वन कर्मचाऱ्यांनी मधमाश्यांच्या वास्तव्यातून पाण्याचा नैसर्गिक स्रोत शोधून काढला आहे. हे कर्मचारी आपआपल्या वनक्षेत्रात गस्त घालत असताना, त्यांना एके ठिकाणी दगडांवर मधमाश्यांना असल्याचे आढळले. त्यांनी जवळ जाऊन निरीक्षण केले असता, तेथे त्यांना ओलावा आढळला. त्यामुळे त्यांनी तेथील जागा खोदून मोठा खड्डा केल्यानंतर तेथे स्वच्छ पाणी आढळले. त्यांनी याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्याच ठिकाणी नैसर्गिक पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली. आता वडाळी वनपरिक्षेत्रात पूर्वीचा एक नैसर्गिक पाणवठा आहे, त्यात आणखी दोन नैसर्गिक पानवठ्यांची भर पडली आहे.
दिनविशेष:
  • 24 एप्रिल हा दिवस ‘भारतीय पंचायती राज दिन’ आहे.
  • सन 1800 मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरुवात झाली.
  • जगप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू ‘सचिन तेंडुलकर’ यांचा जन्म 24 एप्रिल 1970 रोजी झाला.
  • रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म 24 एप्रिल 1896 मध्ये झाला होता.
  • सन 1990 मध्ये अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.

Apr 23, 2019

7 January 2019 Current Affairs

भारतीयांच्या ई-वॉलेट वापरात वाढ:
  • जगातील दुसरा मोठा ऑनलाइन बाजार असणाऱ्या भारतात आता ई वॉलेटचा वापर 8 टक्क्यांनी वाढला आहे. एक व्यक्ती सरासरी तीन हजार रुपये डिजिटल पद्धतीद्वारे महिन्याला खर्च करत असल्याचे पाहणीतून आढळले आहे.
  • सध्या तंत्रज्ञानाने युग आहे. या डिजिटल युगात विविध कामांसाठी महाजालाचा वापर केला जातो. यामुळे वेबपोर्टल, अ‍ॅपचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक वेळी रोखीचा वापर करण्यापेक्षा लोक ई वॉलेटचा किंवा डिजिटल पद्धतीचा वापर करू लागले असून महाजालाचा वापर करून पैसे भरण्याच्या वापरात 8.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. e wallet india
  • नोटाबंदीनंतर ई पद्धतीचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आणि लोकांनी ई वॉलेटचा पर्याय मोठय़ा प्रमाणात स्वीकारला. सध्या दीडशेहून अधिक अ‍ॅप भ्रमणध्वनीच्या आयओएस आणि अँड्रॉईड प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
  • अनेक बँकांचेही अ‍ॅप बाजारात आलेले आहेत. खरेदी किंवा खाद्यपदार्थ मागविताना बऱ्याचदा ई पद्धतीचा वापर केल्यास देय रकमेवर सवलत दिली जाते. त्यामुळे या पर्यायाचा वापर सहज केला जातो, असे डिजिटल माध्यम व्यवस्थापक आदित्य पाटील यांनी सांगितले, तर ग्राहक कमीत कमी दोन हजार ते साडेचार हजार रुपये दर महिन्याला डिजिटल पद्धतीद्वारे खर्च करतात, असे डिजिटल वॉलेट यंत्रणेचे प्रमुख साहिल कुमार यांनी सांगितले.
फुटबॉल स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय:
  • आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रारंभीच केलेल्या दोन गोलसह पायाभरणी करीत थायलंडवर 4-1 असा विजय मिळवला.
  • भारताने 1964 सालानंतर आशियाई स्पर्धेत मिळवलेला हा पहिला ऐतिहासिक विजय आहे. तसेच इतक्या मोठय़ा फरकासह मिळवलेलेही हे पहिलेच यश आहे.
  • कारकीर्दीतील दुसऱ्या आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या छेत्रीने सामन्याच्या २७व्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टीवर पहिला गोल लगावला. त्यानंतर सहाच मिनिटांनी थायलंडचा कर्णधार टेरासिल दांगडाने 33व्या मिनिटाला थायलंडचा पहिला गोल रचून 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा भारताने त्यांच्या आक्रमणांची धार वाढवली. 46व्या मिनिटाला उदांता सिंगने दिलेल्या अप्रतिम पासवर छेत्रीने पुन्हा एकदा अफलातून गोल करीत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली.
  • ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत भारत 97व्या स्थानावर आहे, तर थायलंड 118व्या स्थानावर असल्याने भारताला या सामन्यात वरचढ मानले जात होते. मात्र पूर्वार्धातच भारत विजयी आघाडी घेईल, अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती.
ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करावे लागणार:
  • केंद्र सरकार बनावट परवान्यांना लगाम घालण्यासाठी लवकरच वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्सआधारशी जोडणे (लिंकअनिवार्य करणार आहे. 
  • सरकार लवकरच वाहनचालक परवान्याला आधार कार्ड संलग्न करणे अनिवार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
  • आम्ही लवकरच एक कायदा आणणार असून, त्यायोगे वाहनचालक परवान्याला (ड्रायव्हिंग लायसन्स) आधार संलग्न करणे अनिवार्य करण्यात येईल, असे विधि, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री असलेले प्रसाद यांनी येथे सुरू असलेल्या 106व्या विज्ञान काँग्रेसमध्ये केलेल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
  • सध्या असे होते की, अपघात करून पळून जाणारी दोषी व्यक्ती दुय्यम (डुप्लिकेट) परवाना मिळवतो. यामुळे त्याला सहीसलामत सुटून जाणे शक्य होते. मात्र, परवान्याला आधार कार्ड संलग्न केल्यास, तुम्ही तुमचे नाव बदलू शकता, परंतु डोळ्यांची बुबुळे किंवा बोटांचे ठसे असे बायोमॅट्रिक्स बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही डुप्लिेकट लायसन्स घेण्यासाठी गेलात, की या व्यक्तीजवळ आधीच चालक परवाना असून त्याला नवा परवाना दिला जाऊ नये असे यंत्रणा सांगेल, अशा शब्दांत प्रसाद यांनी आधार संलग्न करण्याची कारणमीमांसा स्पष्ट केली.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा:
  • शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी संपणार आहे.
  • पक्षावर नाराज नाही, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा असल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे.
  • पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी 4 जुनला राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला. यानंतर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
  • मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला. विलास पोतनीस हे शिवसेनेचे बोरिवलीचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी पदवीधर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.
  • आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
हेमंत भंडारी ठरला कनिष्ठ ‘मुंबई-श्री’:
  • बॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारीने कनिष्ठ ‘मुंबई-श्री’चा किताब पटकावला. 60 किलो वजनी गटातील हेमंतने आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या सर्व खेळाडूंना मागे टाकले. Hemant Bhandari
  • दिव्यांग गटाच्या ‘मुंबई-श्री’मध्ये माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले अव्वल ठरला, तर मास्टर्स गटात संतोष ठोंबरे, मोहम्मद शेख आणि मुकुंद लांडगे आपापल्या गटात अव्वल ठरले.
  • कनिष्ठ ‘मुंबई-श्री’चा निकाल-
  • 55 किलो वजनी गट: 1. प्रशांत सडेकर, 2. वृषभ राणे, 3. नंदन नरे; 60 किलो: 1. हेमंत भंडारी, 2. अमेय नेवगे, 3. अमित यादव.
  • दिव्यांग ‘मुंबई-श्री’: प्रथमेश भोसलेमोहम्मद रियाझ आणि मेहबूब शेख.
  • नवोदित मुंबई फिटनेस फिजिक: कौस्तुभ पाटीलयज्ञेश भुरे आणि भाग्येश पाटील.
  • मास्टर्स मुंबई श्री: संतोष ठोंबरेसुनील सावंत आणि दत्ताराम कदम (जय भवानी).
दिनविशेष:
  • युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइमचे निर्माते सँडफोर्ड फ्लेमिंग यांचा जन्म 7 जानेवारी 1827 मध्ये झाला होता.
  • स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म 7 जानेवारी 1893 मध्ये झाला होता.
  • लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 मध्ये झाला होता.
  • सन 1927 मध्ये न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
  • कोलकाता येथे 7 जानेवारी 1935 रोजी इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.
  • सन 1972 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

8 January 2019 Current Affairs

PM नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक:
  • बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहेमाजी पंतप्रधान मनमोहन सिंगशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे.
  • या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी‘ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे. pm-narendra-modi-biopic
  • गेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. विवेक हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचे कुतूहल अनेकांना होते. त्यातूनच विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची खिल्लीही उडवण्यात आली होती.
  • मात्र नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असे म्हणत अनेकांनी कौतुक केले आह
भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर:
  • देशाचा GDP (सकल राष्ट्रीय उत्पादन) 7.2 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षीचा म्हणजेच 2017-18 चा जीडीपी हा 6.7 टक्के होता. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची म्हटली पाहिजे.
  • नोटाबंदीचा निर्णय आणि घाईत राबवण्यात आलेला जीएसटी यामुळे मागील वर्षात जीडीपी घसरला होता. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला तरी जीडीपी वधारलेला पाहायला मिळतो आहे.
  • जीएसटी आणि नोटाबंदीचा परिणाम जीडीपीवर होणार नाही असे सरकारने जाहीर केले होते. मात्र त्या घोषणाच ठरल्या प्रत्यक्षात या दोन्हीचा परिणाण जीडीपीवर झालेला पाहायला मिळाला.
  • आता वर्षाच्या सुरुवातीला तरी जीडीपी वाढला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि मोदी सरकारच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे असेच म्हटले पाहिजे.
‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक गोल्डन ग्लोब पुरस्कार:
  • प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारात अनेक धक्कादायक निकाल लागले असून, ‘ग्रीन बुक‘ या कालनाटय़ाधारितचित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात उत्तम चित्रपट, संगीत व विनोद या तीन प्रवर्गात या चित्रपटाने बाजी मारली आहे. Green Book
  • राणी अ‍ॅनीच्या जीवनचरित्रावरील ‘बोहेमियन ऱ्हापसोडी‘ चित्रपटाने उत्तम नाटय़प्रकारात ‘अ स्टार इज बॉर्न‘ला मात दिली आहे. चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. अँडी सॅमबर्ग व सँड्रा ओह यांनी या हॉलिवूड पुरस्कार कार्यक्रमाचे संचालन केले.
  • ग्रीन बुकला उत्तम नाटय़, उत्तम सहायक अभिनेता (महेरशाला अली), उत्तम पटकथा (लेखक पीटर, फॅरेली, ब्रायन क्युरी व निकल व्हॅलेलोंगा) हे तीन पुरस्कार मिळाले.
  • बोहेमियन ऱ्हापसोडीने उत्तम नाटय़ गटात (संगीत चरित्रपट), अ स्टार इज बॉर्न, ब्लॅक पँथर, इफ बिएल स्ट्रीट कुड टॉक, ब्लॅक्सान्समन यांना मागे टाकले. निर्माते ग्रॅहॅम किंग यांनी सांगितले, की पुरस्काराची अपेक्षा नव्हती, पण अभिनेता रामी मलेक याचा पुरस्कार अपेक्षित होता.
बांगलादेशच्या पंतप्रधानपदी पुन्हा ‘शेख हसिना’ यांचा शपथविधी:
  • बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसिना यांनी चौथ्यांदा शपथ घेतली. भीषण हिंसाचार आणि मतघोटाळ्याच्या आरोपांचे ग्रहण लागलेल्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या अवामी लीग या पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले होते.
  • बंगभवन येथे झालेल्या समारंभात अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांनी 71 वर्षांच्या हसिना यांना पदाची शपथ दिली. हसिना या चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या असून, सलग तीन वेळा या पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
  • सर्वप्रथम 1996 साली आणि त्यानंतर 2008, 2009 व 2014 साली त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. अध्यक्षांनी यावेळी नव्या मंत्र्यांनाही शपथ दिली. हसिना यांच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट मंत्री, 19 राज्यमंत्री आणि तीन उपमंत्री यांचा समावेश आहे.
  • तसेच त्यांच्या मंत्रिमंडळात प्रामुख्याने नवे चेहरे आहेत. नव्या कॅबिनेटपैकी 31 मंत्री पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. संरक्षणासारखी महत्त्वाची खाती हसिना यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.
मेंदूरोगांवर उपचारासाठी यंत्र विकसित:
  • मेंदूतील पेशींना विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून उद्दीपन देऊन रुग्णांना फेफरे व पार्किन्सन (कंपवात) यात उपचार करण्यासाठी बिनतारी यंत्र विकसित करण्यात आले असून ते ब्रेन पेसमेकर वॉण्ड या नावाने ओळखले जाईल. हे यंत्र म्हणजे मेंदूउद्दीपक असून त्याचे काम मेंदूतील विद्युत घडामोडी तपासून काही वावगे आढळल्यास विद्युत उद्दीपन देणे हे आहे. Brain-Scans
  • अमेरिकेत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यामुळे मेंदूरोगातील उपचारात बदल होणार आहेत. कंपवात व फेफरे यात हे उपकरण उपयोगी असून मेंदूच्या इतर रोगातही ते साहाय्यक ठरणार आहे, असे नेचर बायोमेडिकल इंजिनीयरिंग या नियतकालिकात म्हटले आहे.
  • मेंदूला धक्का किंवा इजा होण्यापूर्वीचे विद्युत संदेश त्यांची कंप्रता यात तपासली जाणार आहे. त्यानंतर किती विद्युत उद्दीपन गरजेचे आहे हे ठरवले जाईल. या उपकरणाचा पुरेपूर वापर करण्यासाठी अजून काही वर्षे जावी लागणार आहेत.
  • वायरलेस आर्टिफॅक्ट फ्री न्यूरोमॉडय़ुलेशन डिव्हाइस म्हणजे वॉण्ड असे त्याचे नाव असून त्यात बिनतारी यंत्रणा वापरली आहे. यात विद्युत उद्दीपन देतानाच विद्युत संदेशांची नोंदणीही होणार असून त्याचा दुहेरी उपयोग आहे.
दिनविशेष:
  • सन 1828 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ डेमोक्रॅटिक पार्टी सुरु झाली.
  • ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म 8 जानेवारी 1909 मध्ये झाला होता.
  • राजस्थान विद्यापीठाची स्थापना सन 1947 मध्ये झाली.
  • सन 2000 मध्ये लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या एन.टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • भारत व व्हिएतनाम दरम्यान सन 2001 मध्ये सांस्कृतिकपर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.