हॅलो गुड मॉर्निंग,
मी प्रोफेसर विनायक पवार प्रत्येक रविवारी आपल्यासाठी जिंकणाऱ्या समाजात कसं राहायचं? जिंकणारा समाज कसा घडवायचा? याबद्दल मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थ्यांनो! मागील तीन रविवार मला ब्लॉग लिहिता आला नाही परंतु आज मी तीन ब्लॉग सादर करणार आहे आणि येणारे प्रत्येक रविवार मी आपल्यासाठी नित्यनियमाने ब्लॉग सादर करणार आहे .आपल्याला वाट पाहायला लावली यासाठी माफी मागतो.
आपल्याला जिंकणारा समाज घडवायचा असेल तर या समाजाचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पाहिले पाहिजे.मला विद्यार्थी विचारतात जिंकणारा समाज म्हणजे नक्की काय? त्यावेळी मी त्यांना सांगतो या समाजात ज्याला यायचं आहे त्याचे एक वैश्विक स्वप्न असावे आणि या स्वप्नपूर्तीसाठी त्याने शब्द ,विचार ,भावना, कृती आणि समज अशा प्रत्येक बाबतीत एकरूप व्हायला हवे. आपल्याला स्वप्नपूर्ती करायची आहे त्यानंतर ते स्वप्न टिकवून ठेवायचा आहे तसेच आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना होऊ द्यायचा आहे. कारण जिंकणाऱ्या समाजातील सदस्यांची वाढ होत राहील. स्वप्न पूर्ण करताना जर त्यात अपयश आले तर हे निश्चित आपण कोणत्या ना कोणत्या बाबतीत तरी बेजबाबदार होतात. शांत विचार करा आणि सर्वप्रथम तुम्हाला जे अपयश मिळाला आहे त्याचा स्वीकार करा. ही पहिली पायरी ओलांडल्यावर दुसरी पायरी येते ती म्हणजे पुन्हा एकदा जोमाने यशाच्या रस्त्याची पुनर्बांधणी करा शक्यता ,संभाव्यत्यांचा विचार करा. हे करताना कोण कोणते अडथळे येतील? त्यांना कसं सामोरं जायचं?याचा विचार करा. संभाव्य अडथळे टाळता येतील याचा प्रयत्न करा .टाळता येणारे नसतील तर त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा .आता तिसरी पायरी म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करा. एडिसन यांचे सुंदर वाक्य याक्षणी मला आठवत आहे ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी विजेबाबत त्यांचा शोध पूर्ण झाला. त्यावेळी त्यांनी सांगितले की मी असे 10000 फॉर्मुले सांगू शकतो की ज्याच्या नाही कदापि वीज तयार करता येणार नाही.
एडिसन यांच्या आयुष्यातील अजून एक घटना या क्षणी मला आपल्याला सांगावी वाटते. त्यांच्या फॅक्टरीला आग लागली होती . त्यावेळी त्यांची पत्नी हे पाहून दुःखी झाली त्यावेळी जिंकणाऱ्या समाजाचे नेतृत्व करणारे एडिसन तिला म्हणाले, त्या आगीमध्ये माझ्या चुका जळत आहेत .मी पुन्हा एकदा नव्याने चुका करायला तयार आहे .मित्रांनो ! इतिहास त्यांनी घडवलेला आहे जे ध्येयवेडे असतात . आपल्या मार्गामध्ये अनेकदा अपयश आलं तरीही ते डगमगत नाही. आपला रस्ता कोणत्याही बाबतीत सोडत नाही. एकदा निश्चय केला मला ते प्राप्त करायचे .मग मागे येणारे सगळे रस्ते ते बंद करून टाकतात कोणत्याही परिस्थितीत त्यांना माघार घ्यायची नसते. इथे एक लक्षात घ्यायला हवे आपले मार्ग हे या जगातील मानवाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी विकासासाठी असावेत.
कोणतेही स्वप्न चुटकीसरशी पूर्ण होत नाही .त्यासाठी आपल्याला वरील गोष्टी पाळाव्या लागतात. एक गोष्ट निश्चित सांगू इच्छितो. तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात .स्वतःवरती कधीही अविश्वास दाखवू नका. स्वतःवरती बळकट विश्वास असला पाहिजे. आपल्या स्वप्नांवर विश्वास असला पाहिजे. आपल्या विचारांवर, आपल्या कृतींवर ,आपल्या कल्पनांवर ,आपण उचललेल्या प्रत्येक पावलावर आपला विश्वास असला पाहिजे .आपण जे स्वप्न बघत आहोत त्याचा अंतिम परिणाम काय आहे. हे तुमच्याकडे स्पष्टपणे असलं पाहिजे .अंतिम परिणाम काय असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता मागे मी सांगितलं जर तुम्हाला परिणाम बदलायचा असेल तर तुम्हाला कारणे बदलावे लागतील म्हणून जे काय आपल्याला साध्य करायचे आहे त्याबाबतीत आपली समज म्हणजेच मनाचे प्रोग्रामिंग, विचार, भावना व कृती यांचा एकसूत्रीपणा असावा तर आणि तरच तुम्हाला यश प्राप्त होईल.
आपल्या स्वप्नाविषयी असलेल्या मान्यता खोडून टाका . आपल्या स्वप्नातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपल्या मान्यता हो! ज्यावेळी आपण कोणतेही काम करत असून सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा मी जे काही उत्तर देत आहे ते सामान्य ज्ञान आहे की विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान हे आपल्या पाच इंद्रियांद्वारे आपण प्राप्त केलेले असते परंतु विशेष ज्ञान हे आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचे विश्लेषण असते. म्हणून आपल्याकडे असलेल्या सर्व मान्यता मोडून टाकणे जिंकणाऱ्या समाजात राहणाऱ्या सदस्याला जमले पाहिजे. यासाठी एक सूत्र सांगतो यावेळी आपली सद्सद्विवेकबुद्धी चा वापर करा.
विद्यार्थ्यांनो! आपल्या मनात जर कोणता प्रश्न उद्भवला तर नक्कीच कमेंट द्वारे मला विचारू शकता येणाऱ्या भागामधून तुमच्या समस्यांचं नक्कीच निराकरण केले जाईल.
धन्यवाद!
प्रोफेसर विनायक पवार
द विनर्स ॲकॅडमी
नालासोपारा
Very nice sir
ReplyDelete