Jul 24, 2019

ALL ABOUT THE WINNERS ACADEMY

 संस्थेचे -:  नाव द विनर्स अकॅडमी
 ब्रीद वाक्य:-  प्रत्येक घरात अधिकारी तोही सरकारी…!


 संस्थेविषयी:-  जिंकणारा समाज घडविणे हे एकमात्र ध्येय असलेल्या प्रोफेसर विनायक पवार यांनी 21  नोव्हेंबर 2017 रोजी नालासोपारा येथे द विनर्स अकॅडमी ची स्थापना केली. यामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या विविध पदांच्या सरकारी नोकरीची तयारी करून घेतली जाते. महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून आपण कशाप्रकारे आदर्श समाज घडवू शकतो यासाठी उत्तम, सक्षम, व जबाबदार सरकारी नोकर व  नागरिक निर्माण करण्याची द विनर्स ॲकॅडमी जणू कार्यशाळाच आहे!
 सतत आठ वर्षे प्रोफेसर विनायक पवार शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना झाला आहे आज अनेक विद्यार्थी सरांनी शिकवलेला सेवाभावाचा मूलमंत्र घेऊन शासनामध्ये जनतेची  मनोभावे सेवा करत आहे. सरकारी नोकरी मिळवणे हे ज्यांचे ध्येय आहे अशा तरुण-तरुणींसाठी द विनर्स ॲकॅडमी विविध प्रकारचे कोर्सेस अमलात आणते. पालघर ठाणे व मुंबई हे कार्यक्षेत्र असलेल्या द विनर्स ॲकॅडमी मध्ये आज  शेकडो विद्यार्थी भविष्यात सरकारी नोकरी मिळवावी याचं कठोर परिश्रम घेत आहेत.भविष्यात संस्थेचे कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र व देशभर पसरविण्याचा मानस आहे.


  द  विनर्स अकॅडमीच्या शाखा:-  पालघर, नालासोपारा, बोरीवली, दादर, ठाणे व डोंबिवली.


 भविष्यातील शाखा:-  पुणे, कोकण, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई, पनवेल इत्यादी


 खालील पदांची आम्ही उत्तम तयारी करून घेतो.
  • एमपीएससी  अ गट ब गट व क गट
  •  यूपीएससी सर्व पदांची तयारी
  •  सी डी एस  व एन डी ए
  •  आयबीपीएस, बँक, एसबीआय, आरबीआय, आर आर बी/ क्लार्क/po
  • रेल्वे ऑल ग्रुप
  • एसएससी ऑल ग्रुप
  •  सर्व प्रकारच्या cet
  •  पोलीस भरती
  •  मेगा भरती
  •  महापरिक्षा
  •  तलाठी भरती
  •  महाराष्ट्र शासन सर्व प्रकारच्या परीक्षांची तयारी


 आमचा अभिनव उपक्रम:-  एक कोर्स करा व 40 पेक्षा अधिक भारत सरकारच्या परीक्षांची एकत्र तयारी करा.
                                       माध्यम-: हिंदी व इंग्लिश


                                  एक कोर्स करा व महाराष्ट्र शासनाच्या 50 पेक्षा अधिक विविध पदांची एकत्रित तयारी करा.


 आमचे ट्रेनर्स:-  द विनर्स अकॅडमी सुरुवातीपासूनच विविध कोर्सेस साठी त्याच्या कोर्सच्या अनुभवी व तज्ञ व्यक्तींची ट्रेनर म्हणून नेमणूक केली आहे. ज्यांनी स्वतःहून सरकारी परीक्षा पास केली आहे, अनेक वर्षाचा विशेष विषयाचा विशेष अनुभव आहे. अशा  तज्ज्ञांसोबत तसेच प्रत्येक महिन्याला एक ते दोन याप्रमाणे गेस्ट लेक्चरर ही आयोजित केले जातात. याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चितच होतो कारण गेस्ट लेक्चर्स पूर्णपणे मोफत राबविले जातात. तसेच येणारी व्यक्ती ही त्याच्या विषयात तज्ञ असते त्यामुळे एक दिवशीय सेमिनारचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
 वाचनालय:-  शहरातील वातावरणाचा एकूण अभ्यास करता अभ्यासात एकाग्रता ही कमतरता आम्हाला जाणवली त्यामुळे  विनोद अकॅडमीने स्वतःचे अभ्यासिका सुरू केली आहे. ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा होत पर्यंत मोफत प्रवेश दिला जातो व त्यानंतर अगदी माफक शुल्कात अभ्यासिका उपलब्ध करून दिली जातील वाचनालयात 200 पेक्षा अधिक पुस्तकांचा समावेश आहे ज्यात सरकारी नोकरीचे पुस्तक अधिक प्रमाणात आहेत.


 हेल्पलाइन:-9172964901


 व्हाट्सअप ग्रुप:-  ठाणे मुंबई व पालघर येथील विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांची डेली अपडेट मिळावेत म्हणून आम्ही व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे त्याची लिंक आपल्याला खाली मिळेल जेणेकरून आपण सरकारी माहिती व नोकरी यांची माहिती नित्यनियमाने मिळवू शकता.


 द विनर्स अकॅडमीच्या महत्त्वाच्या लिंक्स:- www.thewinnersacademy.co.in

Jul 20, 2019

#_विद्यार्थ्यांनो! तुम्हाला जिंकणारा समाज घडवायचा आहे का? भाग 2

हॅलो गुड मॉर्निंग, 

        मी प्रोफेसर विनायक पवार  प्रत्येक रविवारी आपल्यासाठी जिंकणाऱ्या समाजात कसं राहायचं? जिंकणारा समाज कसा घडवायचा? याबद्दल मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थ्यांनो! मागील तीन रविवार मला ब्लॉग लिहिता आला नाही परंतु आज मी तीन ब्लॉग  सादर करणार आहे आणि येणारे प्रत्येक रविवार मी आपल्यासाठी नित्यनियमाने ब्लॉग सादर करणार आहे .आपल्याला वाट पाहायला लावली यासाठी माफी मागतो.

        आपल्याला जिंकणारा समाज घडवायचा असेल तर या समाजाचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पाहिले पाहिजे.मला विद्यार्थी विचारतात जिंकणारा समाज म्हणजे नक्की काय? त्यावेळी मी त्यांना सांगतो या समाजात ज्याला यायचं आहे त्याचे एक वैश्विक स्वप्न  असावे आणि या स्वप्नपूर्तीसाठी त्याने शब्द ,विचार ,भावना, कृती आणि समज अशा प्रत्येक बाबतीत एकरूप व्हायला हवे. आपल्याला स्वप्नपूर्ती करायची आहे त्यानंतर ते स्वप्न टिकवून ठेवायचा आहे तसेच आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना होऊ द्यायचा आहे. कारण  जिंकणाऱ्या समाजातील सदस्यांची वाढ होत राहील. स्वप्न पूर्ण करताना जर त्यात अपयश आले तर हे निश्चित आपण कोणत्या ना कोणत्या बाबतीत तरी बेजबाबदार होतात. शांत विचार करा आणि सर्वप्रथम तुम्हाला जे अपयश मिळाला आहे त्याचा स्वीकार करा. ही पहिली पायरी ओलांडल्यावर दुसरी पायरी येते ती म्हणजे पुन्हा एकदा जोमाने यशाच्या रस्त्याची पुनर्बांधणी करा शक्यता ,संभाव्यत्यांचा विचार करा. हे करताना कोण कोणते अडथळे येतील? त्यांना कसं सामोरं जायचं?याचा विचार करा. संभाव्य अडथळे  टाळता येतील याचा प्रयत्न करा .टाळता येणारे नसतील तर त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा .आता तिसरी पायरी म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करा. एडिसन यांचे सुंदर वाक्य याक्षणी मला आठवत आहे ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी विजेबाबत त्यांचा शोध पूर्ण झाला. त्यावेळी त्यांनी सांगितले की मी असे 10000 फॉर्मुले सांगू शकतो की ज्याच्या नाही कदापि वीज तयार करता येणार नाही.
              एडिसन यांच्या आयुष्यातील अजून एक घटना या क्षणी मला आपल्याला सांगावी वाटते. त्यांच्या फॅक्टरीला आग लागली होती . त्यावेळी त्यांची पत्नी हे पाहून दुःखी झाली त्यावेळी जिंकणाऱ्या समाजाचे नेतृत्व करणारे एडिसन तिला म्हणाले, त्या आगीमध्ये माझ्या चुका जळत आहेत .मी पुन्हा एकदा नव्याने चुका करायला तयार आहे .मित्रांनो ! इतिहास त्यांनी घडवलेला आहे जे ध्येयवेडे असतात . आपल्या मार्गामध्ये अनेकदा अपयश आलं तरीही ते डगमगत नाही. आपला रस्ता कोणत्याही बाबतीत सोडत नाही. एकदा निश्चय केला मला ते प्राप्त करायचे .मग मागे येणारे सगळे रस्ते ते बंद करून टाकतात कोणत्याही परिस्थितीत त्यांना माघार घ्यायची नसते. इथे एक लक्षात घ्यायला हवे आपले मार्ग हे या जगातील मानवाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी विकासासाठी असावेत.

 कोणतेही स्वप्न  चुटकीसरशी पूर्ण होत नाही .त्यासाठी आपल्याला वरील गोष्टी पाळाव्या लागतात. एक गोष्ट निश्चित सांगू इच्छितो. तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात .स्वतःवरती कधीही अविश्वास दाखवू नका. स्वतःवरती बळकट विश्वास असला पाहिजे. आपल्या स्वप्नांवर विश्वास असला पाहिजे. आपल्या विचारांवर, आपल्या कृतींवर ,आपल्या कल्पनांवर ,आपण उचललेल्या प्रत्येक पावलावर आपला विश्वास असला पाहिजे .आपण जे स्वप्न बघत आहोत त्याचा अंतिम परिणाम काय आहे. हे तुमच्याकडे स्पष्टपणे असलं पाहिजे .अंतिम परिणाम काय असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता मागे मी सांगितलं  जर तुम्हाला परिणाम बदलायचा असेल तर तुम्हाला कारणे बदलावे लागतील म्हणून जे काय आपल्याला साध्य करायचे आहे त्याबाबतीत आपली समज म्हणजेच मनाचे प्रोग्रामिंग, विचार, भावना व कृती यांचा एकसूत्रीपणा असावा तर आणि तरच तुम्हाला यश प्राप्त होईल.

 आपल्या स्वप्नाविषयी असलेल्या मान्यता खोडून टाका . आपल्या स्वप्नातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपल्या मान्यता हो! ज्यावेळी आपण कोणतेही काम करत असून सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा मी जे काही उत्तर देत आहे ते सामान्य ज्ञान आहे की विशेष  ज्ञान. सामान्य ज्ञान हे आपल्या पाच इंद्रियांद्वारे आपण प्राप्त केलेले असते परंतु विशेष ज्ञान हे आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचे विश्लेषण असते. म्हणून आपल्याकडे असलेल्या सर्व मान्यता मोडून टाकणे जिंकणाऱ्या समाजात राहणाऱ्या सदस्याला जमले पाहिजे. यासाठी एक सूत्र सांगतो यावेळी आपली सद्सद्विवेकबुद्धी  चा वापर करा.
विद्यार्थ्यांनो! आपल्या मनात जर कोणता प्रश्न उद्भवला तर नक्कीच कमेंट द्वारे मला विचारू शकता येणाऱ्या  भागामधून तुमच्या समस्यांचं नक्कीच निराकरण केले जाईल.
 धन्यवाद!
 प्रोफेसर विनायक पवार
 द विनर्स ॲकॅडमी
 नालासोपारा





Jun 29, 2019

#_विद्यार्थ्यांनो! तुम्हाला जिंकणारा समाज घडवायचा आहे का? भाग 1

 विद्यार्थ्यांनो! तुम्हाला जिंकणारा समाज घडवायचा आहे का?
 भाग 1

  जर तुमचे उत्तर हो असेल,तर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.आपण सर्वजण या पृथ्वीवर समृद्ध होण्यासाठी जन्माला आलो आहोत. आपला प्रत्येकाचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. आजच्या एकविसाव्या शतकाचे सर्वात महत्त्वाचे रहस्य काय असा जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला  तर याचे उत्तर आहे , आपले मानसिक स्थिति बदलून आपणास हवे ते फळ आपण प्राप्त करू शकतो. आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीत नेमका याचा अभ्यास फार कमी प्रमाणात शिकवला जातो. आज ज्या समाजात आपण आहोत तेथील जिंकणे व हरणे याच्या व्याख्या विपरीत आहेत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं शाळेत सुविचार आपण वाचला असेल.
आपल्याला जर जिंकणारा समाज घडवायचा असेल आणि त्या समाजाचे आपल्याला निर्माता व्हायचे असेल. मग तुमची आताची परिस्थिती काहीही असो? तुम्ही गरीब असो वा श्रीमंत? तुमचा वर्ण, लिंग, भाषा, प्रदेश, उंची, धर्म ,जात परंपरा  काहीही असो ! जिंकणाऱ्या समाजाचा वरील गोष्टींशी काही संबंध नसतो. इथे फक्त मला जिंकायचय तेही निसर्गाच्या नियमांना अनुसरून. मित्रांनो निसर्गाचे नियम आपणा सर्वांसाठी सारखेच आहेत. अशा असे अनेक नियमांवर ती आपण या सीरिजमध्ये बोलणारच आहोत.
  आपल्याला जिंकणारा समाज घडवायचा असेल तर आपले  मनही जिंकणारे असावे. या विश्वात अनेक जणांनी असा समाज घडवण्याचा प्रयत्न केला काहींना यश आले तर काहींना  अपयश आले. आज आपण जे काही आहोत यशस्वी किंवा अयशस्वी. अगदी काहीही. याला कारणीभूत कोण? याचे निश्चित उत्तर आपल्याकडे आहे का? आपण आज जे काही आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या मानसिक स्थितीमुळे आहोत. एकदा एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला अपयश म्हणजे काय ? निश्चितच फार छान प्रश्न होता. परंतु याचे उत्तर फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर सर्वांसाठीच असावे असे मला वाटते कारण हा प्रश्न आपणा सर्वांनाच लागू  पडतो. आपण ज्यावेळी काही प्राप्त करण्याचा प्लॅन करतो तो फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी असतो, हरवण्यासाठी कोणीही प्लॅन बनवत नाही. मग तरीही आपल्याला अपयश का येते? माझ्या मते एखाद्या कार्यात अपयश येणे म्हणजे निसर्गाने आपल्याला पाठवलेला तो फीडबॅक असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर निसर्ग आपल्याला एक चपराक मारतो आणि सांगतो तुला जे साध्य करायचं हे करण्यासाठी तुमच्या मार्गांचा अवलंब केला हे मार्ग निश्चितच कुठे ना कुठे कमजोर होते .तुला आता एका नव्या मार्गाची गरज आहे. माझ्यासाठी आपल्या पलीकडे काहीच नाही.
 जिंकणारा समाजात राहायचे  असे स्वप्न बघणारा प्रत्येक जण मला याच विचाराचा हवाय. जर आपल्याला कुठेही अपयश येईल त्यावेळी खचून न जाता आपल्याला मिळालेला पराजयाचा स्वीकार करावा व पुन्हा एकदा नवीन मार्ग अवलंबून यश प्राप्त करण्यासाठी तयार  व्हावे.
Thanks
Blog by prof. vinayak pawar
Director
The Winners Academy
www.thewinnersacademy.co.in

Jun 28, 2019

28 June 2019 Current Affairs In Marathi

सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये हजर रहा, अन्यथा कारवाईला तयार व्हा :
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व अधिकाऱ्यांना सकाळी 9 वाजता आपल्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यासोबत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तात्काळपणे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितलं असून, नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
  • तसेच गेल्या काही दिवसांपासून विरोधक राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन योगी आदित्यनाथ सरकारला टार्गेट करत आहेत. याच पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
  • तर यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक आदेश जारी केला आहे. यानुसार, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिक्षकांना सकाळी 9 वाजता आपल्या कार्यालयात पोहोचण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयाची तात्काळपणे अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
झुंडबळी रोखण्यासाठी ‘हे’ राज्य करणार कायदा :
  • गोरक्षणाच्या नावाखाली झुंडीकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असून यामध्ये 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाठी शिक्षेची तरतूद असणार आहे.
  • तर या कायद्यामुळे स्वतःला गोरक्षक म्हणवून घेत हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कमलनाथ सरकारला राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मंजुर करून घ्यावे लागणार आहे.
  • हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात घडणाऱ्या झुंडबळींच्या घटनांसाठी स्वतंत्र कायदा तयार होणार आहे.
  • तसेच मध्य प्रदेशात सध्याच्या कायद्यानुसार, जनावरांच्या कत्तलींना, गोमांस बाळगण्यास आणि त्याची वाहतूक करण्यात पूर्णपणे बंदी आहे. मात्र, यामध्ये गोहत्येच्या नावाखाली होत असलेला हिंसाचार आणि मारहाणीच्या घटनांविरोधात शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे या कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. सुधारित कायद्यानुसार, जर कोणत्याही व्यक्तीने कत्तलखान्यांची तोडफोड केली, गोमांस आणि गुरांच्या वाहतुकीदरम्यान हिंसाचार केला तर अशा व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
मराठा आरक्षणावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब :
  • मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला.
  • मात्र, 16 टक्के कोटा रद्द केला. हा कोटा गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण क्षेत्रात 13 व सरकारी नोकऱ्यांत 12 टक्के इतका असण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • तसेच ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग कायदा 2018’ हा कायदा मंजूर करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे.
  • तर राज्यघटनेच्या 102 व्या दुरुस्तीचा परिणाम सरकारच्या अधिकारांवर होत नाही, असे न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करताना स्पष्ट केले.
विराट कोहलीने मोडला अझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम :
  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शतक झळकावेल, असे वाटत होते. पण कोहलीला यावेळी 72 धावांवर समाधान मानावे लागले. पण या अर्धशतकासह कोहलीने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद
    अझरुद्दीनचा 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
  • तर कोहलीचे या विश्वचषकातील हे सलग चौथे अर्धशतक ठरले. या खेळीसह कोहली भारताचा सलग चार अर्धशतके लगावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अझरच्या नावावर होता. अझरने 1992 साली झालेल्या
    विश्वचषकात सलग तीन अर्धशतके लगावली होती. आता हा विक्रम कोहलीच्या नावावर असेल.
  • तसेच विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावत कोहलीने भारताच्या सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी बरोबरी केली आहे. सिद्धूने 1987 साली झालेल्या विश्वचषकात सलग चार अर्धशतके लगावली होती. सचिनने तर दोन विश्वचषकांमध्ये सलग चार अर्धशतके लगावली होती. सचिनने 1992 आणि 2003 साली झालेल्या विश्वचषकात सलग चार शतके लगावली आहेत.
  • तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.
  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या
    अर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे.
  • तसेच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर आणि राहुल द्रविडयांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
दिनविशेष :
  • भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 मध्ये झाला.
  • 28 जून 1937 मध्ये साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक ‘डॉ. गंगाधर पानतावणे’ यांचा जन्म झाला.
  • अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने सन 1978 मध्ये महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
  • संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 28 जून 1998 मध्ये पन्‍नास वर्षे पूर्ण झाली होती.

27 June 2019 Current Affairs In Marathi

एशिया पॅसिफिक’चा भारताला पाठिंबा :
  • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात दोन वर्षे मुदतीच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीस चीन व पाकिस्तानयांचा समावेश असलेल्या एशिया-पॅसिफिक गटाने पाठिंबा दिला आहे.
  • तसेच पंधरा सदस्यीय सुरक्षा मंडळातील पाच अस्थायी सदस्यपदांसाठी पुढील वर्षी जूनमध्ये निवडणूक होत असून यात निवड झालेल्या अस्थायी सदस्यांना 2021 व 2022 अशी दोन वर्षे काम करता येईल.
  • तर एशिया-पॅसिफिक गटातील देशांनी भारताच्या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा दिला आहे. सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्यत्व 2021 व 2022 अशा दोन वर्षांसाठी आहे.
  • सर्व 55 सदस्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी भारताच्या वतीने आपण आभार मानतो, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले.
  • सध्याचे दहा अस्थायी सदस्य बेल्जियम, कोटव्हॉयर, डॉमनिक प्रजासत्ताक, विषुवृत्तीय गिनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवेत, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका आहेत.
बालाकोट स्ट्राइकचे रणनितीकार ‘RAW’ चे नवीन चीफ :
  • पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या एअर स्ट्राइकच्या प्लानिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे रॉ चे अधिकारी सामंत गोयल यांची आता रॉ च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • एअर स्ट्राइकच्या ऑपरेशननंतर तीन महिन्यात गोयल यांची एजन्सीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल हे 1984 च्या पंजाब केडरचे अधिकारी आहेत. 90 च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद शिखरावर होता. त्यावेळी हा दहशतवाद संपवण्यात सामंत गोयल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दुबई आणि लंडनमध्ये सुद्धा त्यांनी सेवा बजावली आहे.
  • तसेच सामंत गोयल अनिल कुमार धसमाना यांची जागा घेतली. अडीचवर्षाच्या शानदार सेवेनंतर धसमाना निवृत्त होत आहेत. सामंत गोयल सध्या रॉ च्या ऑपरेशन्स विभागाची जबाबदारी संभाळत आहेत. बालाकोट एअर स्ट्राइक आणि
    उरी हल्ल्यानंतर 2016 साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीमध्ये सामंत गोयल यांची भूमिका महत्वाची होती. सामंत गोयल यांना रॉ मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते.
  • तर अरविंद कुमार यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी गृहमंत्रालयाने फाईलवर स्वाक्षरी केली असून पंतप्रधान कार्यालयाला ही फाईल पाठवण्यात आली आहे.
  • पीएमओमधी वरिष्ठ अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला ही माहिती दिली. 30 जूनला दोन्ही अधिकारी पदभार संभाळतील. गोयल आणि कुमार दोघेही 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जातपडताळणीविना प्रवेश :
  • मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही. या विद्यार्थ्यांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास ते सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली.
  • तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याकडे लक्ष वेधले. जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाची पावती ग्राह्य धरावी, अशी मागणी त्यांनी केली.
  • तसेच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी जातवैधता प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना जाहीर करण्यात आली होती.
  • त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीत जात प्रमाणपत्राची सक्ती न करण्याचा निर्णय झाला.
    तर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा तूर्त उपलब्ध नाही. त्यामुळे व्यवसायिक अभ्यासक्रमांना ज्या विद्यार्थ्यांनी समितीकडे जातपडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यांस प्रवेशावेळी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती आता केली जाणार नाही.
दिनविशेष :
  • काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म 27 जून 1864 मध्ये झाला.
  • दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म 27 जून 1875 मध्ये झाला.
  • अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र 27 जून 1954 रोजी मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.
  • अर्थतज्ज्ञ द.रा. पेंडसे यांना सन 1996 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान प्राप्त झाला.

26 June 2019 Current Affairs In Marathi

केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य :
  • एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत.
  • निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
  • तसेच आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही 2015-16 पायाभूत वर्ष व 2017-18 संदर्भ वर्ष मानून तयार केली आहे.
  • अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
  • ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.
    तर आरोग्य निर्देशांकात 23 आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.
आता बारावीपर्यंतचेही शिक्षण मोफत मिळणार :
  • शिक्षणहक्क कायद्याचा विस्तार करून 3 ते 18 वर्षे वयोगटांतील सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली. त्यामुळे पूर्व प्राथमिकबरोबरच इयत्ता नववी ते बारावीचे
    शिक्षणही आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी मोफत मिळू शकेल़ मात्र, त्याच्या अंमलबजावणीची कालमर्यादा 2030 पर्यंत असल्याने प्रस्तावित धोरण तूर्त बिरबलाच्या खिचडीसारखे आहे.
  • तर सद्य:स्थितीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत आहे़ज्यामध्ये सदर कायद्यांतर्गत खासगी शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित संस्थांना दिले जाते. तसेच अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा एयेणार असून, महिला बालकल्याणकडे असणारी अंगणवाडी शिक्षण विभागाला जोडण्याची शिफारसही या धोरणात करण्यात आली आहे.
  • शोधक वृत्ती वाढावी यासाठी अभ्यासक्रम बदलावा पहिल्या टप्प्यात 2025 पर्यंत 3 ते 6 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत सुरक्षित उच्च गुणात्मक शिक्षण देण्याचा विचार मांडला आहे़. साधारणत: मेंदूचा 85 टक्के विकास वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत होतो. त्यामुळे बाल्यावस्थेतील शिक्षणाचे महत्त्व धोरणात अधोरेखित केले आहे़
गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी स्वतंत्र निवडणूक :
  • निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना आधीच जारी केलेली आहे त्यामुळे त्यात हस्तक्षेप करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
  • भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लोकसभेवर निवड झाल्याने त्यांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होत आहे.
  • तर ही निवडणूक वेगवेगळी घेतल्यास दोन्ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता जास्त आहे. एकाचवेळी घेतल्यास एक जागा काँग्रेसला मिळू शकली असती.
दिनविशेष :
  • 26 जून 1819 मध्ये सायकलचे पेटंट देण्यात आले आहे.
  • सोमालिया देशाला 26 जून 1960 मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 26 जून 1960 मध्ये मादागास्कर देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • शिवाजी राजांची मुद्रा असलेले रुपयांचे नाणे 26 जून 1999 मध्ये चलनात आले.
  • 26 जून 1874 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला.

25 June 2019 Current Affairs In Marathi

अमेरिकेबरोबर 10 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराची योजना :
  • व्यापार विषयावरुन अमेरिकेबरोबर वाद सुरु असला तरी पुढच्या दोन ते तीन वर्षात अमेरिकेबरोबर 10 अब्ज डॉलरचे संरक्षण खरेदी करार करण्याची भारताची योजना आहे.
  • भारताने रशियाबरोबर केलेल्या एस-400 मिसाइल सिस्टिम खरेदीच्या करारावरुनही अमेरिका नाराज आहे. अमेरिकेने निर्बंध लादण्याचेही अप्रत्यक्ष इशारे दिले आहेत.
  • तर अमेरिकेबरोबर काही मुद्यांवर मतभेद असले तरी त्यांच्यासोबत मोठे संरक्षण करार करण्याचा भारताचा इरादा आहे.
  • भारताने अमेरिकेकडून पोसीडॉन – 8 आय ही दीर्घ पल्ल्याची दहा गस्ती विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तीन अब्ज डॉलरचा व्यवहार आहे. धी सुद्धा अमेरिकेकडून पोसीडॉन – 8 आय विमाने विकत घेतली आहेत.
  • तसेच आधीपासून ताफ्यात असलेल्या 8विमानांपेक्षा नवीन दहा पोसीडॉन – 8 आय अधिक अत्याधुनिक असतील.
    बोईंगने पोसीडॉन – 8 आय विमानांची निर्मिती केली असून नौदलाने आपल्या ताफ्यात अशा आठ विमानांचा समावेश केला आहे.
  • सेन्सर्स, हार्पून ब्लॉक 2 मिसाइल, एमके-54 टॉरपीडोसने ही विमाने सुसज्ज आहेत. शत्रुची पाणबुडी शोधून नष्ट करण्याची या विमानांमध्ये क्षमता आहे.
  • तर जानेवारी 2009 मध्ये अमेरिकेबरोबर हा करार केला होता. 2016 मध्ये पुन्हा करार करण्यात आला त्यानुसार 2021-22 पर्यंत आणखी अशी चार विमाने भारतीय नौदलाला मिळणार आहेत.
  • त्याशिवाय भारतीय सैन्यदलांसाठी अमेरिकेकडून प्रीडेटर-बी ड्रोन खरेदीची योजना आहे. एमएच-60 रोमिओ, अपाची हेलिकॉप्टर, दिल्लीच्या सुरक्षेसाठी क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीची योजना आहे. यात काही करार झाले आहेत.
मराठा आरक्षणावर उच्च न्यायालय देणार निकाल :
  • संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मराठा आरक्षणावर उच्च न्यायालय येत्या गुरुवारी म्हणजेच 27 जून रोजी निकाल देणार आहे.
  • मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात, तर काही समर्थनार्थ अशा 20 हून अधिक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर गुरुवारी निकाल देण्यात येईल.
  • तर 6 फेब्रुवारीपासून ते 26 मार्च या दीड महिन्यात मराठा आरक्षणाविरोधी आणि समर्थनार्थ सर्व याचिकांवर न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे अंतिम युक्तिवाद सुरू होता. न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
शकिब ठरला क्रिकेट विश्वातील दुसरा खेळाडू :
  • अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शकिब अल हसनची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात शकिबने अर्धशतक तर झळकावलेच, पण त्याचबरोबर अफगाणिस्तानचा अर्धा संघही गारद केला. पण क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
  • बांगलादेशने अफगाणिस्तानवर 62 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 262 धावा केल्या.
  • यावेळी शकिबने 51 धावांची खेळी साकारली, तर मुशफिकर रहिमने 83 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. या
    सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो शकिब अल हसन.
  • तर आतापर्यंत क्रिकेट विश्वचषकात अर्धशतक आणि पाच बळी मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
  • तसेच असा पराक्रम करणारा पहिला खेळाडू आहे भारताचा युवराज सिंग. युवराजने 2011 साली झालेल्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी मिळवण्याची किमया साधली होती.
जयशंकर यांना राज्यसभेची उमेदवारी :
  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भाजपमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केल्यानंतर त्यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
  • तर राज्यातील दुसऱ्या जागेसाठी जुगलजी माथुरजी ठाकोर हे उमेदवार असतील.
  • तसेच राजनैतिक अधिकारी म्हणून कारकीर्द घालवलेले आणि माजी परराष्ट्र सचिव असलेले जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून समावेश केला होता.
  • 30 मे रोजी इतर मंत्र्यांसोबत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.
दिनविशेष :
  • 25 जून हा दिवस ‘जागतिक कोड त्वचारोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा 25 जून 1918 मध्ये जारी केला.
  • 25 जून 1947 रोजी द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
  • पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 मध्ये देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती.
  • सन 1983 मध्ये भारताने प्रथम क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

24 June 2019 Current Affairs In Marathi

RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा :
  • भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • तर विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे.
  • तसेच विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. 23 जानेवारी 2017 ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच त्यांनी पद सोडले आहे.
  • याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर महिन्यात काही खासगी कारणांमुळे राजीनामा दिला होता. विरल आचार्य यांचा समावेश आरबीआयच्या त्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये होतो जे उर्जित पटेल यांच्या टीमचे सदस्य होते.
  • आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद सोडल्यानंतर विरल आचार्य आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या सेटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत.
भारताचा इस्त्रायल बरोबरचा 50 कोटी डॉलर्सचा क्षेपणास्त्र करार रद्द :
  • डीआरडीओच्या आश्वासनानंतर भारताने इस्त्रायली कंपनी राफेल अडव्हान्स डिफेन्स सिस्टिमबरोबर केलेला 50 कोटी डॉलर्सचा स्पाइक क्षेपणास्त्र खरेदीचा करार रद्द केला आहे. स्पाइक हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.
  • तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने स्पाइकला पर्याय ठरणारे क्षेपणास्त्र दोन वर्षांच्या आत विकसित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तसेच व्हीईएम टेक्नोलॉजीस लिमिटेडसोबत मिळून डीआरडीओ कमी किंमतीत स्पाइक सारखेच क्षेपणास्त्र विकसित करत आहे. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अहमदनगर रेंजवर एमपीएटीजीएमची यशस्वी चाचणी केल्याचा दावा
    डीआरडीओने केला आहे.
सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्था अमेरिकेच्या काळ्या यादीत :
  • सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्थांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे.
  • लष्कराशी संबंधित उपकरणांवर काम करणाऱ्या या संस्थांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून काळ्या यादीत टाकण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
  • अमेरिका सरकारच्या वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवड्यात चर्चा होत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. या चर्चेवर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
  • तर काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या संस्थांत सुपर कॉम्प्युटर निर्माती संस्था सुगॉनचा समावेश आहे. सुगॉन ही कंपनी मोठ्या प्रमाणात अमेरिकी पुरवठ्यावर अवलंबून आहे. सुगॉनच्या पुरवठादारांत इंटेल, एनव्हिडिया आणि अ‍ॅडव्हॉन्सड मायक्रो डिव्हायसेस यांचा समावेश आहे. याशिवाय वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सुगॉनच्या तीन उपकंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
  • अमेरिकी वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, सुगॉन आणि वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट या संस्था चीनच्या लष्करी संशोधन संस्थेच्या मालकीच्या आहेत. चिनी लष्करासाठी पुढील पिढीतील उच्चक्षमता असलेली संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम या संस्था करीत आहेत.
दिनविशेष :
  • 24 जून 1441 मध्ये इटन कॉलेजची स्थापना.
  • फ्रान्समधील पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब 24 जून 1793 मध्ये केला गेला.
  • 24 जून 1939 मध्ये सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
  • कर्नाटकातील सर्व शाळांत 24 जून 1982 मध्ये कन्नड शिकविण्याची सक्ती.

23 June 2019 Current Affairs In Marathi

तिहेरी तलाकबंदी विधेयक पुन्हा लोकसभेत :
  • तिहेरी तलाक बंदी विधेयक केंद्र सरकारने पुन्हा लोकसभेत मांडले. मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी हे विधेयक महत्त्वपूर्ण असल्याचा युक्तिवाद केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.
  • सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे.
  • तसेच गेल्या लोकसभेत हे विधेयक संमत करण्यात आले होते. मात्र राज्यसभेत बहुमताअभावी सत्ताधाऱ्यांना ते मंजूर करून घेता आले नाही.
  • तर 16वी लोकसभा विसर्जित झाल्यामुळे केंद्र सरकारला वटहुकूम काढावा लागला होता. पुढील आठवडय़ात या विधेयकावर लोकसभेत चर्चा केली जाईल.
‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीतूननाव वगळण्यात पाकिस्तान यशस्वी :
  • फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) काळ्या यादीत नाव समाविष्ट होऊ नये यासाठी तुर्की, चीन आणि मलेशियाचा पाठिंबा मिळविण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला असल्याचे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे.
  • तर पॅरिसमध्ये 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत एफएटीएफची परिषद होणार असून त्या वेळी पाकिस्तानला काळ्या यादीत समाविष्ट न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.
  • तसेच जून 2018 मध्ये पॅरिसस्थित एफएटीएफने पाकिस्तानला ‘ग्रे‘ यादीत टाकले होते आणि त्यांना 27 कलमी कृतीयोजना दिली होती. त्या योजनेचा ऑक्टोबर 2018 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये आढावा घेण्यात आला. भारताने
    पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांबाबतची माहिती दिल्यानंतर फेब्रुवारीत आढावा घेण्यात आला होता.
  • भारतासह अमेरिका आणि ब्रिटनने पाठिंबा दिलेल्या प्रस्तावाला तुर्कीनेच विरोध केला होता, तर पाकिस्तानचा सार्वकालीन मित्र देश असलेला चीन या वेळी गैरहजर होता. पाकिस्तान सध्या आर्थिक गर्तेत असून आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची याचना करीत आहे.
NSG गटात भारताच्या समावेशाला चीनचा विरोध कायम :
  • आण्विक पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशास पुन्हा एकदा चीनने विरोध केला आहे. बिगर एनपीटी सदस्य देशांसाठी जो पर्यंत कुठली योजना तयार होत नाही तो पर्यंत एनएसजी गटामध्ये भारताच्या समावेशाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही असे चीनने स्पष्ट केले आहे. सदस्य देशांमध्ये कधीपर्यंत यावर तोडगा निघेल त्याबद्दलही चीनने कोणतीही मुदत देण्यास नकार दिला.
  • तर भारताने मे 2016 मध्ये एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. तेव्हापासून चीन अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या देशांनाच सदस्यत्व देण्यासाठी आग्रही आहे.
  • एनएसजी 48 देशांचा समूह असून हा गट आण्विक जागतिक व्यापाराचे नियंत्रण करतो.
  • भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. पाकिस्ताननेही एनएसजी गटाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी 2016 मध्ये अर्ज केला आहे.
  • तर 20 आणि 21 जूनला कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये एनएसजी गटाच्या सदस्य देशांची बैठक होणार आहे.
दिनविशेष :
  • 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे.
  • क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी 23 जून 1868 मध्ये पेटंट मिळाले.
  • 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
  • भारतीय क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला.
  • भारतीय नभोवाणी मुंबई येथे 23 जून 1927 रोजी सुरु.

18 June 2019 Current Affairs In Marathi

ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार :
  • भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी एनडीएचे उमेदवार राहणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
  • तसेच लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह. रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते.
  • मात्र आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला हे उमेदवारी दाखल करणार आहेत. ज्यानंतर बुधवारी संसदेत यासाठी मतदान होईल. लोकसभेत एनडीए आघाडीचे बहुमत असल्याने ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे
जगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट :
  • जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.
  • तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या
    2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे.
  • अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्नन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी
    त्यांचे स्वरूप बदलत आहे.
  • अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर 2010 मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी
    ठेवण्याचे बंधन आहे.
जे पी नड्डा भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष :
  • भाजपातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • तर झालेल्या भाजपाच्या संसदीय बैठकीत जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा होती.
  • मात्र, त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली. तसेच जे पी नड्डा रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत.
  • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशामध्ये भाजपानं मिळवलेल्या अभूतपुर्व यशामध्ये नड्डा यांचा मोलाचा वाटा होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं 80 पैकी तब्बल 62 जागा जिंकल्या आहेत.
दिनविशेष :
  • स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म 18 जून 1899 मध्ये झाला.
  • पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी झाला.
  • सन 1908 मध्ये 18 जून रोजी फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
  • डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून 18 जून 1946 रोजी गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
  • जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस 18 जून 1981 मध्ये विकसित केली गेली.

17 June 2019 Current Affairs In Marathi

ATM मध्ये कॅश नसेल तर आता बॅंकेला होणार दंड :
  • बहुतांश वेळेस ‘एटीएम’मध्ये कॅश नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता जर 3 तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड ठोठाविण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आहे.
  • छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस पैसेच उपलब्ध नसतात. विनाकारण नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तरीही अनेकदा बँका याकडे दुर्लक्ष करतात. पण आता याविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आरबीआय आहे. यानुसार कोणतंही एटीएम तीन तासांपेक्षा अधिक काळ कॅशलेस नसावं, जर कॅश संपली असेल तर तीन तासांच्या आत संबंधित बँकेनी त्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अन्यथा बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
  • एखाद्या एटीएममध्ये कॅश आहे किंवा नाही याची माहिती बँकांना मिळत असते. किती रक्कम शिल्लक आहे आणि किती वेळात पैसे संपतील म्हणजेच कधीपर्यंत पैशांचा भरणा करावा याबाबत माहिती देखील संबंधित बँकांना मिळत असते. एटीएममध्ये लावलेल्या सेंसरद्वारे बँकेला रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते.
जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री :
  • आर्टिफिशिअल इंटेलिजंसमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटर डीजीएक्स-2 भारतात आला आहे. या कॉम्प्युटरला जोधपूर आयआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कॉम्प्युटरमुळे देशातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देण्यास गती मिळणार आहे.
  • आयआयटी जोधपूरचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात वेगवान आर्टिफिशिअल इंटेलिजंस अॅप्लिकेशन्स कॉम्प्युटर असून भारतात पहिल्यांदाच आला आहे. हा कॉम्प्युटर विशेष प्रयोगशाळेमध्ये बसविण्यात आला आहे.
  • तसेच या कॉम्प्युटरची किंमतही खूप आहे. या कॉम्प्युटरसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. यामध्ये 16 खास जीपीयू लावण्यात आले आहेत. या प्रत्येक कार्डची क्षमता 32 जीबी एवढी आहे. तर रॅम 512 जीबीची देण्यात
    आली आहे. साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते. मात्र, या सुपरकॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे.
  • प्रत्येक कॉम्प्युटर प्रोग्रॅम डेटा विश्लेषण आधारावर असते. आणि हे विश्लेषण सुपरकॉम्प्युटर वेगात करणार आहे.
  • यामध्ये लावलेल्या 32 जीबीची 16 जीपीयू कार्ड या कॉम्प्युटरला खास बनवितात. यामुळे कामाचा वेग वाढला आहे.
  • देशात सध्या आयआयएससी बंगळुरुसह काही संस्थांमध्ये डीजीएक्स-1 सुपरकॉम्प्युटर आहेत. मात्र, डीजीएक्स-2 सुपरकॉम्प्युटर पहिल्यांदाच देशात आला आहे. डीजीएक्स-1 पेक्षा हा कॉम्प्युटर दुप्पट क्षमतेने जास्त आहे.
  • डीजीएक्स-1 ला एखादे काम करण्यासाठी 15 दिवस लागत असतील तर डीजीएक्स-2 ला दीड दिवस लागतात. या कॉम्प्युटरचे वजन तब्बल 150 किलो आहे तर साठवण क्षमता 30 टीबी आहे.
  • डीजीएक्स-2 हा सुपर कॉम्प्युटर अमेरिकेच्या एनव्हिडीया या कंपनीने बनविला आहे. आयआयटी जोधपूर आणि या कंपनीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजंस क्षेत्रासाठी दोन वर्षांचा करार झाला आहे. या करारानुसारच कॉम्प्युटर भारतात
    आणण्यात आला आहे.
ब्रिटनमधील ‘तंत्रव्हिसा’त भारत, अमेरिकेची आघाडी :
  • इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.
  • ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो.
  • डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत 2018-19 मध्ये 45 टक्के वाढ झाली आहे.
  • तसेच याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी 450 अर्ज आले होते. ही संख्या आता 650 वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे ‘टेक नेशन’ने निदर्शनास आणले आहे.
  • तर याविषयी याच आठवडय़ात ‘टेक नेशन’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तंत्रज्ञानविषयक व्हिसासाठी येणारे सर्वाधिक अर्ज हे यंदाही भारत आणि अमेरिकेतून आले आहेत.
  • यात सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील उद्योक विकासक, एआय-मशीन लर्निग, फिनटेक-एन्टरप्राईज, क्लाऊड सेक्टर यांचा समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
  • तंत्रज्ञान व्हिसासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करणाऱ्यांत नायजेरिया, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे.
मेट्रोसाठी आता देशभरात ‘वन मेट्रो वन कार्ड’ :
  • मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे.
  • तर दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड केवळ काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे.
  • तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन कार्ड’ योजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच यासाठी बँकांची मदत घेता येणार आहे. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल.
  • तर पुढील सहा महिन्यांमध्ये हे कार्ड लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात फिरण्यासाठी किंवा कमी कालावधीसाठी वास्तव्यास येणाऱ्या लोकांना या कार्डाचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती दिली.
  • तसेच ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे कार्डही देण्यात येणार नाही. अशा लोकांसाठी पर्यायी कार्डाचा विचार सुरू असून त्यासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
एलिफंटाच्या सुरक्षिततेसाठी उभारणार संरक्षण भिंत :
  • जेएनपीटीच्या भरावामुळे जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाच्या किनाऱ्याची झालेली प्रचंड धूप थांबविण्यासाठी जेएनपीटीने एलिफंटा बेटाच्या सभोवार सुमारे चार कि.मी. लांबीची संरक्षक भिंत उभारणीची योजना आखली आहे.
  • 28.5 कोटी खर्चाच्या योजनेच्या निविदा जेएनपीटीने नुकत्याच प्रसिद्ध करून त्वरेने काम करण्याचे संकेत दिले आहेत.
  • जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी सुरुवातीपासूनच समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव केला जात आहे.
  • समुद्रात भराव टाकण्याचे काम जेएनपीटीचे पाचवे बंदर उभारणीपर्यंत कायम सुरू राहणार आहे. मात्र. समुद्रात होणार्या भरावामुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनार्यावरील समुद्राची पातळी वाढत आहे.
दिनविशेष :
  • 1885 मध्ये न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
  • आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
  • अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.
  • 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
  • 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
  • 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.
  • राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झाले.