Nov 27, 2018

२७ नोव्हेंबर २०१८ चालू घडामोडी

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा:
  • निवडणूक आयुक्त सुनील अरोरा देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतीलविद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांचे स्थान ते घेतील. निवडणूक आयोगाने या नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या 2 डिसेंबरला अरोरा हे पदभार स्वीकारतील. रावत यांचा कार्यकाळ 1 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.Sunil Arora
  • अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) 1980च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. 31 ऑगस्ट 2017 रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • विधी मंत्रालयाने 26 नोव्हेंबर रोजी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर परवानगीसाठी तो राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्राने माहिती दिली.
  • राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना 62 वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
  • तसेच त्याबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते 1993 ते 1998 पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि 2005 ते 2008 पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.

नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग:
  • नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे.
  • सोमवार आणि मंगळवारच्या (दि. 26 आणि 27 नोव्हेंबर) दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
  • मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19800 किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.
  • सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी 1 बिलियन डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
  • नासाने म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर 10 ते 16 फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे 15 टक्के अधिक खोल असेल. 2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.
अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार:
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.Azim Premji
  • आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.
  • तसेच प्रेमजी यांच्यापूर्वी भारतातील बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि अभिनेता शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आयसीसी टी-20 संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौर:
  • ICC चा महिला विश्व टी-20 संघाच्या कर्णधारपदी भारताच्या हरमनप्रीत कौरची वर्णी लागली आहे. 25 नोव्हेंबर रोजी आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
  • महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला होता. विश्व महिला टी-20 संघात तीन भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव यांचा समावेश आहे.
  • सलामीवीर म्हणून स्मृती मंधनाची निवड झाली आहे. तर फिरकी गोलंदज म्हणून पूनम यादवचा समावेश करण्यात आला आहे.
  • वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारावर अंतिम 12 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या या संघात इंग्लंड आणि भारतीय संघाच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
  • तसेच पाकिस्तान, न्यूझीलंड, विडींज आणि बांगलादेशच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. बांगलादेशच्या खेळाडूला 12वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
भारताला दहशतवादविरोधी लढ्यात मिळाली अमेरिकेची साथ:
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.
  • दशतदवादाला आपण जिंकू देणार नाही असे त्यांनी ट्विटद्वारे जाहीररित्या सांगितले आहे. त्याचबरोबर, अमेरिकेकडून मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारांना पकडून देणाऱ्यांना 50 लाख डॉलर (35 कोटी) रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.26-11 attack
  • तर यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांसोबत 166 निर्दोष लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळ जाऊ देणार नाही.
  • तत्पूर्वी, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे.
  • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली होती.
  • तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करुन ती 50 लाख डॉलर्स अर्थात 35 कोटी रुपये इतकी करण्यात आल्याचे जाहीर केले होते.
दिनविशेष:
  • इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द.ब. पारसनीस यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1870 मध्ये झाला होता.
  • पॅनासोनिक चे संस्थापक ‘कोनसुके मात्सुशिता‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला होता.
  • विख्यात हिंदी साहित्यिक ‘हरीवंशराय बच्चन‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • अमेरिकन अभिनेता तसेच मार्शल आर्ट तज्ञ ‘ब्रूस ली‘ यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 मध्ये झाला होता.
  • 27 नोव्हेंबर 1978 हा दिवस भारतीय समाजसेविकाराष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक ‘लक्ष्मीबाई केळकर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
  • सन 1995 मध्ये पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.

२६ नोव्हेंबर २०१८ चालू घडामोडी

जिम्नॅस्टिक विश्वचषकात दीपा कर्माकरला कांस्यपदक:
  • भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. जर्मनीतील कोटबस येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दीपाने वॉल्ट स्पर्धेत 14.316 गुण मिळवत पदक आपल्या नावे केले.Dipa Karmarkar
  • ब्राझीलची रिबेका एंड्रेडने सुवर्ण आणि अमेरिकेच्या झेड कारे ने रौप्य पदकमिळवले. त्रिपुराच्या 25 वर्षीय दीपाने पात्रतेत 16 खेळाडूंमध्ये सहावे स्थान पटकावले होते.
  • दीपाने तुर्की येथे जुलैत झालेल्या कलात्मक जिम्नॅस्टिक विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेमध्ये वॉल्ट अंतिम सामन्यात खेळू शकली नव्हती.
  • बॅलन्स बीम वर्गात दीपाचे गुण 11.066 होता. ती 23व्या स्थानी राहिली होती. तर पुरुष वर्गात राकेश पात्रा पॅरलल बार पात्रता सामन्यात 13.033 गुणांबरोबर 29 जिम्नॅस्टच्या यादीत तो 16व्या स्थानावर राहिली.
  • पुरुष वॉल्ट पात्रता सामन्यात आशीष कुमारलाही चांगली कामगिरी करता आली नाही. तो 27 जणांच्या यादीत 23व्या स्थानावर राहिला. अरुणा रेड्डी पहिल्या दिवशी गुडघ्याच्या दुखापतीमुळे फ्लोअर स्पर्धेत सहभागी होऊ शकली नव्हती.

काळ्या पैशाची माहिती देण्यास पीएमओचा नकार:
  • परदेशातून किती काळा पैसा परत आणला याचा तपशील देण्यास पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशानंतरही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
  • चौकशी व गुन्हेगारांवरील खटल्यात अडथळे ठरू शकणारी माहिती देऊ नये अशी तरतूद माहिती अधिकार कायद्यात आहे, त्यानुसार काळ्या पैशाबाबत माहिती नाकारण्यात येत आहे, असे सांगून पंतप्रधान कार्यालयाने माहिती देण्याचे टाळले आहे.
  • 16 ऑक्टोबरला केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाबाबतचा तपशील पंधरा दिवसांत देण्याचा आदेश दिला होता त्यावर पंतप्रधान कार्यालयाने असे सांगितले, की विशेष चौकशी समिती याबाबत स्थापन करण्यात आली असून परदेशातील काळ्या पैशाची चौकशी सुरू आहे. अशी माहिती देण्याने कलम 8 (1) (एच) चे उल्लंघन होत असून त्यामुळे चौकशीच्या कामात अडथळे येऊ शकतात. सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागितली होती.
  • अशा चौकशीची कामे सरकारच्या वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा संस्था यांच्या अखत्यारीत येते, त्यामुळे ती माहिती देणे माहिती अधिकार कायद्यात बसत नाही, असे सांगण्यात आले. 1 जून 2014 पासून किती काळा पैसा परदेशातून भारतात आणला याचा तपशील देण्यात यावा, असा अर्ज चतुर्वेदी यांनी केला होता.
  • तसेच तो पंतप्रधान कार्यालयाने कलम 2 (एफ) अनुसार ही माहिती पारदर्शकता कायद्यातील माहितीच्या व्याख्येत बसत नाही असे सांगून फेटाळला होता, त्यावर चतुर्वेदी यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे दाद मागितली होती.
  • सन 2005-2014 या काळात 770 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका काळा पैसा भारतात आला आहे, असे ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या संस्थेच्या अभ्यासात म्हटले असून त्याच काळात 165 अब्ज डॉलर्स देशाबाहेर गेल्याचे सांगण्यात आले आहे.
शरयू नदीच्या किनारी श्रीरामाची भव्य मूर्ती उभी राहणार:
  • उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शरयू नदीच्या किनारी प्रभू श्रीरामाची 151 मीटर उंचीची मुर्ती उभारण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी याची घोषणा केली. विशेष म्हणजे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे ही मुर्ती साकारणार आहेत.Ram-Statue
  • श्रीरामाच्या या भव्य मूर्तीसाठी पाच मूर्तीकारांनी आपले मॉडेल सादर केले होते. यांपैकी मराठी असलेले प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या मॉडेलला मंजूरी देण्यात आली.
  • राम सुतार हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार आहेत. भारतीय संसदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांचा पुतळाही राम सुतार यांनी साकारला आहे.
  • रामाची ही प्रस्तावित मूर्ती त्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित अशा प्रकारे साकारण्यात येणार आहे. यामध्ये धनुर्धारी राजा, मर्यादा पुरुषोत्तम या रामाच्या प्रतिमेचा यातून आभास निर्माण होईल.
ऑस्ट्रेलियन महिलांचा टी-20 विश्वविजेतेपदाचा चौकार:
  • अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा 8 गड्यांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने महिला टी-20 वर्ल्डकपवर चौथ्यांदा नाव कोरले आहे.
  • गार्डनसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा 8 गड्याने पराभव केला. गार्डनसने प्रथम गोलंदाजी करताना तीन फलंदाजांना बाद केले तर फलंदाजी करताना 33 धावांचे योगदान दिले.
  • यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर इंग्लंडने बलाढ्य भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
  • अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे इंग्लंड महिला संघाचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांत सर्वबाद 105 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाने 15.1 षटकांत 106 धावा करत अजिंक्यपद आपल्या नावे केले.
ब्रेक्झिट कराराला युरोपीय महासंघाची मान्यता:
  • ब्रिटनने युरोपीय महासंघातून (युरोपियन युनियनबाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिटकराराला युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांच्या नेत्यांनी मान्यता दिली.
  • युरोपीय महासंघाच्या ब्रिटन सोडून उर्वरित 27 देशांच्या नेत्यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. त्यामुळे त्यावर मतदान झाले नाही. आता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या काराराला मान्यता मिळणे गरजेचे असून त्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे.Brixs
  • युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर ब्रिटनमध्ये जून 2016 मध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यात बहुसंख्य नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर ब्रिटनने लिस्बन कराराचे 50 वे कलम लागू करून ब्रेक्झिटच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली.
  • तर ही प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी आणि ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी सौहार्दपूर्ण संबंध राहावेत यासाठी करार केला जात आहे. त्या कराराला अतिम स्वरूप देण्यासाठी युरोपीयन काऊन्सिलची ब्रसेल्स येथे नुकतीच बैठक झाली. त्यात युरोपीय महासंघाच्या 27 देशांच्या नेत्यांनी सर्वानुमते ब्रेक्झिटच्या कराराला मान्यता दिली. युरोपीयन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी त्याची ट्विटरवरून अधिकृत घोषणा केली.
दिनविशेष:
  • 26 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन‘ तसेच ‘भारतीय संविधान दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला.
  • कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला.
  • 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारताची घटना मंजूर झाली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
  • सन 1997 मध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
  • सन 2008 मध्ये हा दिवस महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

२५ नोव्हेंबर २०१८ चालू घडामोडी

मेरी कोमची सहाव्यांदा विश्व अजिंक्यपदाला गवसणी :
  • सुपरस्टार एम. सी. मेरी कोम हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे.
  • 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं
  • विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेरीने युक्रेनच्या हॅना ओखोटाला 5-0 असे पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आणि इतिहास रचला.
  • मेरीने तब्बल 16 वर्षांपूर्वी या स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावले होते.
  • तसेच मेरी आता 35 वर्षांची आहे आणि तिचे हे सहावे जेतेपद ठरले आहे. मेरीने 2001, 2002, 2005, 2006, 2008, 2010 या वर्षांमध्ये यापूर्वी जेतेपद पटकावले होते.

मेट्रो कोचनिर्मिती आता भारतातच :
  • एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येणाऱ्या दहिसर ते डी. एन. नगर मार्गावरील मेट्रो 2 अ, डी. एन. नगर ते मंडाळे मार्गावरील मेट्रो 2 ब आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मार्गावरील मेट्रो 7 प्रकल्पांतील 378 कोचेस आता भारतातच बनणार आहेत.
  • एका कोचपाठी एमएमआरडीएला 7 कोटी 98 लाख रुपयांचा खर्च येतो. भारतीय कंपनीला हे कोच बनविण्याचे काम दिल्यामुळे आणि याचे काम भारतातच होणार असल्याने, एमएमआरडीएच्या तब्बल 1,100 कोटी रुपयांची बचत होणार
    आहे. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत उभयपक्षी सहकार्याच्या आधारावर अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
  • केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’च्या पार्श्वभूमीवर कोचनिर्मितीचे काम भारतातच करण्याचे ठरले आहे. हे काम भारत अर्थ मूव्हर्सला देण्यात आले आहे. या कंपनीला तांत्रिक साहाय्यही केले जाईल. सर्व कोच देशात उपलब्ध असणाया अत्याधुनिक निकषांनुसार तयार होणार असून, ते 3.2 मीटर रुंदीचे आणि 25 किलोवॅट क्षमतेच्या विद्युत प्रणालीवर कार्यरत होणारे आहेत.
  • दोन गाड्यांच्या फेयांमध्ये केवळ 90 सेकंदाचे अंतर राखणाया या गाड्या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
  • तसेच सर्व कोच अत्याधुनिक स्वरूपाचे, वजनाने हलके आणि वातानुकूलित असतील. संबंधित सर्व गाड्या या चालक-विरहित प्रणालीवर चालणाया असल्या, तरी प्रारंभी काही काळ त्या चालकांमार्फत चालविल्या जातील. या गाड्यांमध्ये
    विशेष व्यक्तींसाठी, तसेच महिला व वरिष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधांनी सज्ज डबे असतील.
भारत-चीन यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा :
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी दोन्ही देशांदरम्यान नैऋत्य सिचुआन प्रांतात बोलणीची 21 वी फेरी सुरू केली आहे.
  • तसेच सीमा तंटय़ाशिवाय दोन्ही अधिकाऱ्यांनी वुहान शिखर बैठकीनंतर भारत व चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेतला.
  • तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात एप्रिलमध्ये वुहान येथे चर्चा झाली होती.
  • दोन्ही देशात सीमा चर्चा होणार असल्याचे 21 नोव्हेंबरलाच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी जाहीर केले होते. दोन्ही देशांनी संवाद व सल्लामसलतीतून मतभेद कमी केले असून सीमावर्ती भागात आता स्थिरता आहे
दिनविशेष :
  • 25 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
  • 25 नोव्हेंबर 1948 मध्ये नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
  • सुरीनामला नेदरलँड्सकडून 25 नोव्हेंबर 1972 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • 25 नोव्हेंबर 1999 मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

२४ नोव्हेंबर २०१८ चालू घडामोडी

सातव्या वेतन आयोगाचा अहवाल चालू महिन्यातच मिळणार:
  • सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल या आठवडय़ात किंवा उशिरातउशिरा महिनाअखेपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामुळे जानेवारी 2019 पासून राज्य कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळेल, अशी माहिती वित्त विभागातील उच्चपदस्थ सूत्राने दिली.
  • मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगासंबंधीचा अहवालाकडे 17 लाख अधिकारी-कर्मचारी आणि साडे सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने आयोगाच्या शिफारशी कशा प्रकारे लागू कराव्यात, याचा अभ्यास करण्यासाठी गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.
  • वित्त विभागातून मिळालेल्या माहितीनुसार अहवालाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या आठवडय़ात किंवा उशिरातउशिरा महिनाअखेरपर्यंत अहवाल सादर होईल. त्यावर काम करायला एक महिना पुरेसा आहे. त्यानंतर 1 जानेवारीपासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतातील 60 दशलक्ष मोबाइल सिम कार्ड बंद होणार:
  • रिलायन्स जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी किमान किमतीचे प्लान बाजारात आणले आहेत. यामुळे आता अनेकांना दोन-दोन सिम कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत अधिकचे सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड कमी होण्याची शक्यता आहे. त्यातून सुमारे 60 दशलक्ष सिम कार्ड बंद होतील, असे दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.sim-card-stack
  • ऑगस्ट महिन्यातील मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात 1.2 अब्ज मोबाइलचे वापरकर्ते आहेत. यापैकी केवळ एक सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 730 ते 750 दशलक्ष इतकी आहे. उरलेल्या ग्राहकांकडे दोन-दोन सिम कार्ड आहेत.
  • सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआयमहासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, बंद होऊ शकणारे आणि नव्याने दिले जाऊ शकणारे सिम कार्ड यांचा एकत्रित विचार केल्यास आगामी सहा महिन्यांत दूरसंचार कंपन्यांची ग्राहकसंख्या 25 ते 30 दशलक्षांनी कमी होईल, असे मला वाटते.
  • डेलॉइट इंडियाचे भागीदार हेमंत एम. जोशी यांनी सांगितले की, विविध कंपन्यांच्या प्लानमध्ये असलेला फरक आणि कंपनीकडून दिल्या जाणार्‍या सेवेचा दर्जा यांचा लाभ घेता यावा यासाठी लोक दोन-दोन सिम कार्ड वापरत असतात.
  • आघाडीच्या तीन मोठ्या कंपन्यांचे दर आणि दर्जा आता समान झाल्यामुळे लोक एकच सिम कार्ड वापरण्यास प्राधान्य देतील, असा अंदाज आहे.
सोनिया चहल वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत:
  • World Boxing Championship या स्पर्धेत भारताची महिला बॉक्सर सोनिया चहल हिने स्पर्धेच्या अंतिम फेरीतधडक मारली आणि किमान रौप्यपदक निश्चित केले.
  • उपांत्य फेरीत सोनियाने उत्तर कोरियाच्या जो सोन व्हा हिचा 5-0 असा पराभव केला. 57 किलो वजनी गटात भारताच्या सोनियाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते.
  • तिने प्रतिस्पर्धी बॉक्सरला सामन्यात डोके वर काढण्याची संधींचंज दिली नाही. त्यामुळे तिला एकतर्फी विजय मिळवता आला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोनिया चहल हिने कोलंबियाच्या येनी कास्टनाडा हिच्यावर 4-1 असा विजय मिळवला होता आणि उपांत्य फेरीत धडक मारली होती.
  • तसेच अंतिम सामना अतिशय अटीतटीचा असेल, पण मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, अशा भावना तिने व्यक्त केल्या.
फ्रान्समध्ये होणार राफेल डीलची चौकशी:
  • राफेल करारावरुन नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी वाढलेल्या असताना आता भारता प्रमाणे फ्रान्समध्येही राफेल डीलचा मुद्दा तापत चालला आहे.
  • फ्रान्समधील भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात राफेल डील विरोधात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेने भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या 59 हजार कोटीच्या राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
  • शेरपा या एनजीओने ही तक्रार दाखल केली आहे. बेकायद आर्थिक स्त्रोत, भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी एकूणच आर्थिक गुन्ह्यांविरोधात आपण लढा देतो असा या संस्थेचा दावा आहे. फ्रान्सच्या मीडियापार्ट संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात ऑक्टोंबर अखेरीस ही तक्रार दाखल करण्यात आली.
  • भारत आणि फ्रान्समध्ये कुठल्या नियमांच्या आधारावर 36 राफेल विमानांच्या विक्रीचा करार झाला तसेच डासू कंपनीने ऑफसेट भागीदार म्हणून अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची निवड कशी केली? त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी शेरपाने केली आहे.
  • अनिल अंबानींच्या कंपनीकडे फायटर विमानांच्या निर्मितीचा कुठलाही अनुभव नाहीय तसेच हा करार होण्याच्या 12 दिवस आधी ही कंपनी स्थापन झाली आहे असे मीडिया पार्टने म्हटले आहे.
मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी:
  • 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावे चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. याची घोषणा 23 नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या तालीम हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली.
  • 99व्या नाट्य संमेलनाच्या स्थळासाठी परिषदेकडे 12 ठिकाणांहून प्रस्ताव आले. त्यापैकी नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा अंतिम टप्प्यात विचार करण्यात आला. वरील ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
  • नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल. संमेलन फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होईल, अशी माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली.
दिनविशेष:
  • 24 नोव्हेंबर हा दिवस ‘उत्क्रांती दिन‘ आहे.
  • सन 1434 मध्ये थेम्स नदी पूर्णपणे गोठली होती.
  • बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1961 मध्ये झाला.
  • कवी विंदा करंदीकर यांची सन 1992 मध्ये साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली होती.
  • समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना सन 1998 मध्ये प्रदान झाला.

२३ नोव्हेंबर २०१८ चालू घडामोडी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच करार:
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी 22 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी परस्पर सामरिक संबंध वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी पाच करारही केले.Bharat-Autreliya
  • कोविंद यांचे सिडनी येथे आगमन झाले. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मॅरिस पायने आणि कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या उच्चायुक्तांनी पाच करारांवर स्वाक्षऱ्या केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.
  • पहिला करार दिव्यांगांना सेवा देण्याबाबत तर दुसरा करार दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑस्ट्रेड यांच्यात करण्यात आला. तिसरा करार रांचीतील सेंट्रल माइन प्लानिंग अ‍ॅण्ड डिझाइन इन्स्टिटय़ूट आणि कॅनबेरातील कॉमनवेल्थ सायण्टिफिक अ‍ॅण्ट रीसर्च ऑर्गनायझेशन यांच्यात करण्यात आला.
  • कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठीचा चौथा करार गुंटूर येथील आचार्य एन.जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात करण्यात आला. तर पाचवा करार संयुक्त पीएच.डी.बाबत दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था आणि ब्रिस्बेनमधील क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात करण्यात आला.
आता मोफत ‘इनकमिंग कॉल’ बंद होणार:
  • भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ आल्यापासून बऱ्याच कंपन्या डबघाईला लागल्या, तर अनेक कंपन्या कशाबशा बाजारात तग धरुन आहेत. परिणामी अनेक दूरसंचार कंपन्या लवकरच मोबाइल धारकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
  • जिओने स्वस्त इंटरनेट पॅक उपलब्ध करून दिल्याने आपला ग्राहक वर्ग टिकवण्यासाठी इतर सर्वच कंपन्यांनीही स्वस्त दरात इंटरनेट पॅक उपलब्ध करुन दिले.
  • जिओने डेटा आणि दरयुद्ध छेडल्यानंतर इतर कंपन्यांनीही कॉल दर कमी केले. पण यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी आता या कंपन्यांनी ‘इनकमिंग कॉल’साठी शुल्क आकारण्याची तयारी सुरु केल्याचे समजते.
  • जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मोफत इनकमिंग कॉल सुविधा न देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत या कंपन्या आहेत.
  • सध्या तरी अनेक युजर्स असे आहेत की, फक्त इनकमिंग कॉलसाठी मोबाईल वापरतात. एके काळी मोबाईल कंपन्या आऊटगोइंगच नव्हे, तर इनकमिंगसाठी शुल्क आकारत होत्या. आता ग्राहकांना इनकमिंग कॉलसाठी महिन्याला (28 दिवस) 35 रुपयांचा रिचार्ज करावा लागण्याची शक्यता आहे. अन्यथा आउटगोइंगच नव्हे, तर इनकमिंग सेवाही बंद केली जाऊ शकते.
भारतात सर्वाधिक वेतन मिळते बंगळुरू शहरात:
  • लिंक्ड इन या संस्थेने केलेल्या वेतनमान सर्वेक्षणात सर्वाधिक वेतन देणारे शहर ठरण्याचा मान बंगळुरू शहराला मिळाला आहे.
  • सर्वाधिक वेतन देणा-या हार्डवेअर व नेटवर्किंग, सॉफ्टवेअर व आयटी सेवा आणि ग्राहक (कंझ्युमर) या क्षेत्रांनी बंगळुरूला हा मान मिळवून दिला आहे. बंगळुरूनंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागला.
  • अभ्यासातील निष्कर्षानुसार, बंगळुरूत सरासरी 12 लाख वार्षिक वेतन मिळते. मुंबई आणि दिल्ली-एनसीआरमध्ये प्रत्येकी 9 लाख रुपये सरासरी वार्षिक वेतन मिळते. हैदराबादेत 8.5 लाख, तर चेन्नईत 6.3 लाख सरासरी वार्षिक वेतन मिळते.
  • तंत्रज्ञान उद्योग हे सर्वाधिक वेतन देणारे क्षेत्र ठरले आहे. हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रात सरासरी 15 लाख वार्षिक वेतन दिले जाते. सॉफ्टवेअर क्षेत्रात 12 लाख, तर ग्राहक क्षेत्रात 9 लाख वार्षिक वेतन मिळते.
  • हार्डवेअर क्षेत्रातील चीप डिझाईन व नेटवर्किंग क्षेत्रातील जाणकारांना सर्वाधिक वेतन मिळते. चीप डिझायनिंग अभियंत्यांच्या वेतनात प्रचंड वाढ झाली आहे.
ब्रेग्झिटोत्तर संबंधांबाबत ब्रिटनकडून करार सादर:
  • ब्रेग्झिटनंतर अर्थात युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर उभयतांमधील संबंध नेमके कसे राखले जातील, याबाबतच्या कराराच्या मसुद्यावर दोघांचे एकमत झाले.
  • आता युरोपीय समुदायातील 27 देशांचे प्रतिनिधी होणाऱ्या बैठकीत या कराराबाबत निर्णय घेतील. या करारानुसार व्यापक, दृढ, महत्त्वाकांक्षी आणि लवचिकतेला वाव देणारे संबंध राखण्यास वाव मिळणार आहे, असे अधिकारी गोटातून सांगण्यात आले.Brixs
  • युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील युरोपीय देशांच्या नागरिकांना ब्रिटनबाहेर पडण्यासाठी तसेच ब्रिटनच्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी इ.स. 2020ची मुदत आहे. मात्र गरजेनुसार ती एक ते दोन वर्षांनी वाढविण्यावरही एकमत झाले.
  • आता ब्रेग्झिटोत्तर संबंधांबाबतच्या राजकीय कराराचा मसुदा युरोपीय समुदायातील अन्य 27 देशांना पाठविण्यात आला आहे, असे युरोपीय मंडळाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. येत्या 25 नोव्हेंबर रोजी ब्रुसेल्स येथे समुदायातील देशांच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे. त्यावेळी या करारांबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.
ग्रॅच्युईटीसाठी आता तीन वर्षे नोकरीची मुदत होणार:
  • ग्रॅच्युईटी व पेन्शन संदर्भात लोकसभेच्या निवडणुकांआधी सरकार काही मोठे निर्णय घेण्याच्या विचारात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (इपिएफओनवनियुक्त सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत नोकरदार वर्गाच्या प्रलंबित मागण्यांवर विचार होणार आहे.
  • ग्रॅच्युईटी हा कर्मचार्‍याच्या वेतनाचाच भाग आहे. नोकरी सोडल्यावर वा निवृत्तीनंतर ग्रॅच्युईटीचे लाभ कर्मचार्‍याला मिळावेत, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. हे लाभ मिळण्यासाठी कर्मचार्‍याला सध्या 5 वर्षांच्या नोकरीचा कालखंड आवश्यक असतो. तो 3 वर्षे करण्याचा तसेच विशिष्ट काळासाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांनाही तो लाभ देण्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा अपेक्षित आहे.
  • फिक्स्ड् टाइम कर्मचार्‍यांना त्यांच्या नोकरीच्या वर्षांच्या प्रमाणातच ग्रॅच्युईटी मिळण्याची शक्यता आहे. सध्या नोकरदार वर्ग एकाच नोकरीत 5 वर्षे राहात नाही. कंपन्यांही कामगार कपात करीत आहेत. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी आवश्यक असलेला कालावधी तीन वर्षे करावा, ही मागणी कामगार संघटना करीत आहेत.
दिनविशेष:
  • सन 1924 मध्ये एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले होते.
  • आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला होता.
  • सन 1992 मध्ये आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
  • नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल सन 1999 मध्ये अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान झाला.

२२ नोव्हेंबर २०१८ चालू घडामोडी



पॅनकार्ड आता वडिलांच्या नावाशिवायही मिळणार:
  • सरकारी कागदपत्रांसाठी आपली सर्व माहिती देणे आवश्यक असते. आपली ओळख पटविण्यासाठी आपल्या नावाबरोबरच अडनाव, आई आणि वडिलांचे नाव आवश्यक असते.PanCard
  • पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असून ते काढण्यासाठीही आपली सर्व माहिती द्यावी लागते. मात्र आता त्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आपली ओळख पटवण्यासाठी आता वडिलांच्या नावाचा संदर्भ देण्याची आवश्यकता नाही.
  • आयकर विभागाने या नव्या नियमाबाबत माहिती दिली असून या नव्या नियमामुळे येत्या काळात ही सर्व प्रक्रिया काही प्रमाणात सोपी होण्याची शक्यता आहे.
  • ज्यांचे आई-वडिल विभक्त झाले असतील त्यांना पॅनकार्ड काढण्यासाठी काही अडचणी येत असत. पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव बंधनकारक असल्याने या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागाने अशा लोकांना पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव देण्याचा नियम शिथिल केला आहे.
  • तर याअंतर्गत आयकर विभागाने आयकर काद्यातील 114व्या नियमात बदल करत पॅन कार्डसाठी वडिलांऐवजी आईचे नाव देण्यास मान्यता दिली आहे किंवा वडिलांच्या नावाचा संदर्भ देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनाथ मुले किंवा इतरही अनेकांचे प्रश्न यामुळे सुटणार आहेत. हा नवीन नियम येत्या 5 डिसेंबरपासून लागू होणारअसल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे सिंगल पॅरेंट असणाऱ्यांनाही अडचणी येणार नाहीत.

देशातील 50 टक्के एटीएम बंद पडणार:
  • देशातील 50 टक्के एटीएम मशीन्स पुढील चार महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च 2019 पर्यंत बंद पडणार आहेत. देशभरातील एटीएम मशीन्स ऑपेर्सची संस्था असणाऱ्या कॉन्फरडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) ही शक्यता व्यक्त केली आहे. असे झाल्यास शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
  • देशात सध्या अंदाजे 2 लाख 38 हजार एटीएम मशिन्स आहेत. त्यापैकी 1 लाख 13 हजार एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. यातील एक लाख एटीएम हे बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नसणारे म्हणजे ऑफ साईट एटीएम्स तसेच 15 हजार व्हाईट लेबल प्रकारातील एटीएम असल्याचे सीएटीएमआयच्या प्रवकत्यांनी सांगितले आहे.
  • तर याचा सर्वाधिक फटका प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचे पैसे एटीएममधून काढणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसेल. तर शहरीभागांमध्येही नोटबंदीनंतरचे एटीएमबाहेरील रांगा लागल्याचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता सीएटीएमआय प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.
  • देशभरातील एटीएम ऑपरेटर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. यामध्ये हॉर्डवेअर तसेच सॉफ्टवेअर अपडेट्सबरोबरच सर्व एटीएममधील रोख रक्कम कॅस्टेल स्वॅप प्रकाराने भरण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • यासंदर्भातील काम सीएटीएमआयने सुरु केले आहे. या नवीन एटीएममुळे मोठ्याप्रमाणात एटीएम क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
इंटरपोलच्या अध्यक्षपदी दक्षिण कोरियाचे किम यांग:
  • दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांना इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असून त्यांच्याविरोधातील रशियन अधिकाऱ्याचा या पदासाठीच्या लढतीत किम यांनी पराभव केल्याने पाश्चिमात्य देशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यांग हे आता मेंग होंगवेई यांची जागा घेणार असून 2020 पर्यंत अधिकारपदावर राहतील.Kim Yang
  • किम यांना अमेरिकेचा पाठिंबा असून ते सध्या इंटरपोलचे हंगामी अध्यक्ष आहेत. दुबई येथे इंटरपोलच्या सदस्य देशांची बैठक झाली त्यात आधीचे मूळ चीनचे असलेले अध्यक्ष मेंग होंगवेई सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदी यांग यांची निवड करण्यात आली.
  • चीनने म्हटले आहे की, मेंग हे बेपत्ता झाले होते हे खरे असले तरी त्यांनी लाचखोरीच्या प्रकरणात राजीनामा दिला आहे. पाश्चिमात्य देशांना इंटरपोलच्या अध्यक्षपदी रशियाचे उमेदवार अलेक्झांगर प्रॉकोपचुक यांची निवड होणे धोक्याचे वाटत होते.
  • प्रॉकोपचुक हे इंटरपोलचे उपाध्यक्ष असून त्याआधी रशियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी होते. तर अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी किम यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांचे पारडे जड होते, आता किम हे 2020 पर्यंत अधिकारपदावर राहतील.
मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्यासाठी जेझिरो विवराची निवड:
  • नासाने 2020 मध्ये मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्याचे ठरवले असून त्यासाठी 3.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या जुन्या विवराची जागा निश्चित करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर रोजी याबाबतची घोषण करण्यात आली असून जेथे ही रोव्हर गाडी उतरवली जाणार आहे, त्या विवराचे नाव जेझिरो असे आहे.
  • पाच वर्षे शोध घेतल्यानंतर मंगळावरील साठ ठिकाणांतून या विवराची निवड रोव्हर गाडी उतरवण्यासाठी करण्यात आली. जुलै 2020 मध्ये ही रोव्हर गाडी मंगळावर पाठवली जाणार असून त्यासाठी ठिकाण निवडण्यासाठी मंगळ मोहिमेतील चमूने चर्चा केली.
  • मंगळावर पूर्वी असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व शोधण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
  • नासा व युरोपीयन स्पेस एजन्सी यांनी मंगळावरील मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचे निश्चित केले असून त्यासाठी ठिकाण निश्चित केले आहे.
  • नासाचे मोहीम संचालक थॉमस झुरबुशेन यांनी सांगितले, की जेझिरो विवर हे भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून ते 3.6 अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याने त्याच्या संशोधनातून ग्रहांची निर्मिती व खगोलजीवशास्त्रातील काही बाबींवर प्रकाश पडणार आहे.
  • एका विशिष्ट ठिकाणचे नमुने गोळा करण्याने मंगळाबाबत विचारात क्रांतिकारक बदल होणार आहे. जेझिरो विवर हे मंगळाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे इसिडीस प्लॅनिशिया या पठाराच्या पश्चिम कडेला आहे. इसिडिस भाग हा जुना व मंगळाबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकणारा आहे

२१ नोव्हेंबर २०१८ चालू घडामोडी

केरळ काँग्रेसचे अध्यक्ष एम. आय. शनवास यांचे निधन
  • केरळ काँग्रेसचे विद्यमान कार्यवाहक अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील खासदार एम. आय. शनवास यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते.
  • तसेच 1983 पासून शनवास हे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
  • तर 2009 पासून अद्यापपर्यंत ते वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आले होते.
  • केरळमधील विद्यार्थी संघटनेतून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी यापूर्वी युथ काँग्रेस आणि सेवा दलात काम केले आहे.
भारत, रशियामध्ये 500 दशलक्ष डॉलरचा युद्धनौकाबांधणी करार :
  • भारत आणि रशिया यांच्यात दोन युद्धनौकाबांधणीसाठी 500 दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. तर या नौकांची बांधणी गोवा येथील नौदल गोदीत करण्यात येणार आहे.
  • तसेच रशिया त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि रशियाची रोझोबोरॉनएक्स्पोर्ट यांच्यात हा 500 दशलक्ष डॉलरचा करार झाला. त्यानुसार रशिया भारताला दोन युद्धनौकाबांधणीसाठी तंत्रज्ञान आणि सामग्री पुरवणार आहे.
  • तर या नौकांच्या बांधणीला 2020 मध्ये सुरुवात होईल. त्यातील पहिली युद्धनौका 2026 साली आणि दुसरी नौका 2027 साली तयार होईल.
  • तसेच या तलवारवर्गातील स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे बसवण्यात येतील.
मेरी कोमचे पदक निश्चित :
  • World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
  • तसेच मेरी कोमच्या या विजयामुळे तिचे जागतिक स्पर्धेमध्ये आणखी एक पदक निश्चित झाले आहे.
  • या स्पर्धेत एमसी मेरी कोमने रविवारी 48 किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कझाकस्तानच्या एयगेरिम केसेनायेव्हाचा 5-0 असा पराभव केला होता.
  • तर त्या विजयाने तिने सहाव्या जागतिक सुवर्णपदकाकडे वाटचाल करण्यास आणखी एक पाऊल टाकले होते.
महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार :
  • केंद्र सरकारच्या 2018 सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. नाशिकचा जलतरणपटू स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • राज्यातील 6 व्यक्ती आणि 3 संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते 3 डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
  • मूळच्या अमरावतीच्या व जन्मांध असलेल्या कांचनमाला पांडे हिने मेक्सिकोच्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-2017 स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते.
दिनविशेष :
  • 21 नोव्हेंबर – जागतिक टेलीव्हिजन दिन
  • 21 नोव्हेंबर 1877 मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
  • 21 नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
  • दक्षिण कोरियाने 21 नोव्हेंबर 1972 मध्ये नवीन संविधान अंगीकारले

Nov 23, 2018

द विनर्स अकॅडमी

                                                                   मार्गदर्शक  शिक्षक




१. प्रो. विनायक पवार सर  :- अंकगणित , समाजशात्र
२. प्रो . गणेश सर  :- भूगोल
३. प्रो . स्वाती नवले मॅडम  :- मराठी व्याकरण , विज्ञान
४.  मैदानी प्रशिक्षक.महेश राहिंज  सर





                                                                            गेस्ट तासिका 

१. समुपदेश :- डॉ .स्मिता खळे
२. प्रो .इंद्रीस पठाण  (चालू घडामोडी )
३.अण्णा पाटील :- भूगोल, राज्यघटना, अंकगणित, बुद्धिमत्ता
४. ज्ञानेश्वर पाटील :-   विज्ञान, इतिहास , अर्थशात्र




                                                                       एम  पी एस सी   बॅच

सकाळी :- ११ ते ०१ 

                                                                       पोलीस भरती  बॅच

मैदानी :- सकाळी ६ ते ८ 
 लेखी  :- सकाळी ९ ते ११ 


                                                                    संयुक्त बॅच 
संध्याकाळी :- ६ ते ८ (अंकगणित , बुद्धिमत्ता )

पोलीस भरतीचे प्रमुख टप्पे




  • शारीरिक पात्रता - प्रथम प्रमाणपत्र पडताळणी व उंची/छाती/वजन  मोजण्यात येते यामध्ये पात्र ठरल्यास 
  • मैदानी परीक्षा - एकूण १०० गुणांपैकी ५० गन मिळविणे आवश्यक असते .यामध्ये पात्र ठरल्यास जाहीर झालेल्या एकूण रिक्त जागांच्या १५ पट उमेदवारांना लेखी परीक्षेला पात्र ठरवले जाते .
  • शारीरिक चाचणी - 
  1. पुरुष :-  १६०० मी.धावणे -२० गुण 
                        १०० मी. धावणे- २० गुण 
          
                        गोळा फेक - २० गुण 

                        लांब उडी - २० गुण 
             
                        पुल अप्स (१०) - २० गुण 

        2. महिला :- ८०० मी.धावणे -२० गुण 
                          
                           १०० मी. धावणे- २५ गुण 
          
                           गोळा फेक - २५ गुण 

                           लांब उडी - २५ गुण 
  • परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम :- 
                            माध्यम :- मराठी 
                             
                            अभ्यासक्रम :- अंकगणित २५ गुण 
                                                   
                                                   स.ज्ञान २५ गुण 

                                                   बुद्धिमापन २५ गुण 

                                                    मराठी व्याकरण २५ गुण 
  • लेखी परीक्षा :- १०० गुणांची लेखी परीक्षा असते .वरील दिनही परीक्षेत (लेखी व मैदानी )
                                 मिळवलेल्या गुणांची बेरीज करून अंतिम यादी निवड मंडळामार्फत जाहीर केली जाते.
  • लेखी परीक्षेचे स्वरूप :- १) परीक्षा पद्धत - offline लेखी 
                                             २) प्रश्नप्रकार - वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी/mcq

                                             ३) एकूण प्रश्न -१००

                                             ४) एकूण गुण -१००

                                             ५) वेळ - ९० मिनिटे 
  • आवश्यक कागदपत्रे :-शाळा सोडल्याचा दाखला(प्रमाणपत्र ) / जन्माचा दाखला /१२  गुणपत्रक /डोमेसाइल प्रमाणपत्र /मागासवर्गीय असल्याचे जातीचे प्रमाणपत्र /नॉन क्रिमिलियर (sc/st वगळून )/समांतर आरक्षण असल्यास प्रमाणपत्र /आधार कार्ड/पॅन  कार्ड /फोटो .
  • आरक्षण :- खेळाडू - ५ %
                           महिला -३० %

                           होमगार्ड - ५ %
                             
                            पोलीस पाल्य - २%
                         
                           खेळाडू उमेदवार जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर खेळल्याचे प्रमाणपत्र आवश्यक 

                            होमगार्ड पदावर ३ वर्षे सेवा केलेली असावी.


 थे
द विनर्स अकॅडमी चे २०१८ पोलीस भरती यशस्वी विद्यार्थी राकेश कळमकर यांचे अभिनंदन करताना संस्थापक प्रो.विनायक पवार