विद्यार्थ्यांनो! तुम्हाला जिंकणारा समाज घडवायचा आहे का?
भाग 1
जर तुमचे उत्तर हो असेल,तर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.आपण सर्वजण या पृथ्वीवर समृद्ध होण्यासाठी जन्माला आलो आहोत. आपला प्रत्येकाचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. आजच्या एकविसाव्या शतकाचे सर्वात महत्त्वाचे रहस्य काय असा जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर याचे उत्तर आहे , आपले मानसिक स्थिति बदलून आपणास हवे ते फळ आपण प्राप्त करू शकतो. आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीत नेमका याचा अभ्यास फार कमी प्रमाणात शिकवला जातो. आज ज्या समाजात आपण आहोत तेथील जिंकणे व हरणे याच्या व्याख्या विपरीत आहेत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं शाळेत सुविचार आपण वाचला असेल.
आपल्याला जर जिंकणारा समाज घडवायचा असेल आणि त्या समाजाचे आपल्याला निर्माता व्हायचे असेल. मग तुमची आताची परिस्थिती काहीही असो? तुम्ही गरीब असो वा श्रीमंत? तुमचा वर्ण, लिंग, भाषा, प्रदेश, उंची, धर्म ,जात परंपरा काहीही असो ! जिंकणाऱ्या समाजाचा वरील गोष्टींशी काही संबंध नसतो. इथे फक्त मला जिंकायचय तेही निसर्गाच्या नियमांना अनुसरून. मित्रांनो निसर्गाचे नियम आपणा सर्वांसाठी सारखेच आहेत. अशा असे अनेक नियमांवर ती आपण या सीरिजमध्ये बोलणारच आहोत.
आपल्याला जिंकणारा समाज घडवायचा असेल तर आपले मनही जिंकणारे असावे. या विश्वात अनेक जणांनी असा समाज घडवण्याचा प्रयत्न केला काहींना यश आले तर काहींना अपयश आले. आज आपण जे काही आहोत यशस्वी किंवा अयशस्वी. अगदी काहीही. याला कारणीभूत कोण? याचे निश्चित उत्तर आपल्याकडे आहे का? आपण आज जे काही आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या मानसिक स्थितीमुळे आहोत. एकदा एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला अपयश म्हणजे काय ? निश्चितच फार छान प्रश्न होता. परंतु याचे उत्तर फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर सर्वांसाठीच असावे असे मला वाटते कारण हा प्रश्न आपणा सर्वांनाच लागू पडतो. आपण ज्यावेळी काही प्राप्त करण्याचा प्लॅन करतो तो फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी असतो, हरवण्यासाठी कोणीही प्लॅन बनवत नाही. मग तरीही आपल्याला अपयश का येते? माझ्या मते एखाद्या कार्यात अपयश येणे म्हणजे निसर्गाने आपल्याला पाठवलेला तो फीडबॅक असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर निसर्ग आपल्याला एक चपराक मारतो आणि सांगतो तुला जे साध्य करायचं हे करण्यासाठी तुमच्या मार्गांचा अवलंब केला हे मार्ग निश्चितच कुठे ना कुठे कमजोर होते .तुला आता एका नव्या मार्गाची गरज आहे. माझ्यासाठी आपल्या पलीकडे काहीच नाही.
जिंकणारा समाजात राहायचे असे स्वप्न बघणारा प्रत्येक जण मला याच विचाराचा हवाय. जर आपल्याला कुठेही अपयश येईल त्यावेळी खचून न जाता आपल्याला मिळालेला पराजयाचा स्वीकार करावा व पुन्हा एकदा नवीन मार्ग अवलंबून यश प्राप्त करण्यासाठी तयार व्हावे.
Thanks
Blog by prof. vinayak pawar
Director
The Winners Academy
www.thewinnersacademy.co.in