Oct 31, 2018

अर्थव्यवस्था आणि तिच्या व्याख्या


  1. लोकांच्या विविथ गरजा भागवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उत्पादक उपक्रमांचे एकत्रीकरण.
  2. लोकांना रोजगार व उत्पन्नाची साधने पुरवणारी व्यवस्था.
  3. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करणारे संघटन.

व्याख्या

  1. विशिष्ट भुप्रदेशातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण आणि पुरवठा यांच्याशी संबधित उपक्रम म्हणजे ‘अर्थव्यवस्था’ होय.
  2. ऑक्सफर्डच्या मते अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट देश/प्रदेशातील उत्पादन, व्यापार, वित्तपुरवठा यातील आंतरसंबंध.

अर्थव्यवस्थेचे प्रकार

उत्पादन साधनांचे स्वामित्व व व्यवस्थापन यांच्या आथारे अर्थव्यवस्येचे प्रमुख प्रकार खालील प्रमाणे.
  1. भांडवलशाही अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साथनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचा मुख्य हेतू असतो. उदा. अमेरिकन संघराज्ये
  2. समाजवादी अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्येत उत्पादनाचे घटक एकत्रित रित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडून केले जाते समाजाचे हित साथावे हा मुख्य हेतू असतो उदा. चीन.
  3. मिश्र अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्थेत सार्वजानिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे सह- आस्तित्व असते. उदा भारत.

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्टये

  1. भौगोलिक क्षेत्र – प्रत्येक अर्थव्यवरयेचे सुनिश्चित क्षेत्र व सीमा असतात भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ ३२, ८७, २६३ चौ. किमी आहे प्रथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापेकी २.८ टक्के भूक्षेत्र भारताच्या ताब्यात आहे.
  2. भारतात २९ राज्ये व ७ केंद्रशसित प्रदेश आहेत

नैसार्गिक साधन सामग्री

  1. निसर्गाकडून विनामूल्य उपलब्ध झालेल्या भूमी, पाणी, जंगले, खनिज साठे यांचा समावेश नैसर्गिक साधन सामग्रीत करण्यात येतो.
  2. अर्थव्यवस्थेची उत्पादन पातळी साधन सामग्रीची उपलब्धता आणि वापर यावर अवलंबून असेत.

लोकसंख्या

  1. देशातील लोकसंखेच्या आकारमानावर श्रमपुरवठा अवलंबून असतो.
  2. लोकसंख्येची गुणवत्ता शिक्षण प्रशिक्षण आणि आरोग्यसेवा यांच्याव्दारा सुधारता येते.
  3. पर्याप्त लोकसंख्या आदर्श आकारमान दर्शवते
  4. पर्याप्तपेक्षा अधिक लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या होय त्यामुळे साधन संपत्तीवरील ताण वाढतो.
  5. पर्याप्त लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या म्हणजे न्यून लोकसंख्या होय. यामुळे उपलब्ध साधन संपलीचा पर्याप्त वापर होत नाही.

सार्वभौमत्व

  1. सार्वभौमत्व म्हणजे राज्यातील सर्वोच्च सत्ता किंवा अधिकार होय.
  2. सरकारने कायदे करणे व त्यांची कार्यवाही करणे यासाठी सार्वभौम अधिकार आवश्यक असतात.
  3. स्वंतत्र आणि सार्वभौम राष्ट्रच देशाच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासंबंधीचे निर्णय घेऊ शकते.

क्षेत्रीय विभाजन

उत्पादक उपक्रमांचे तीन क्षेत्रात वर्गीकरण केले आहे
  1. प्राथमिक क्षेत्र:- याला कृर्षा क्षेत्र असेही म्हणतात नैरार्गिक साधन सामग्रीवर आधारीत व्यवसायांचा यात समावेश होतो.उदा. शेती आणि पशूपालन कुक्कुट पालन, मत्स्यव्यवसाय, जंगल व्यवसाय व खाणकाम भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत निम्यापेक्षा अधिक लोकसंख्या प्राथमिक क्षेत्राशी संलग्न आहे.
  2. द्वितीय क्षेत्र:- याला औदयोगिक क्षेत्र असेही म्हणतात – यात कारखात दारी, बांधकाम, वीज, नै वायू पाणी पुरवठा इ व्यवसायांचा समावेश होतो.
  3. तृतीय क्षेत्र:- याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात यात वाहतूक, दळणवळण, बँका, विमाव्यवसाय, व्यापार, वित्त आरोग्य, शिक्षण, उपहार गृह, मनोरंजन यासारख्या सेवांचा समावेश होतो.
भारतात सध्या राष्ट्रीय उत्पादनातील व्दितीय व तृ तीय क्षेत्राचे योगदान वाढत आहे. भारताच्या आर्थिक विकासात वाढ होत आहे

साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे

टोपणनावलेखक
अनंत फंदीशाहीर अनंत घोलप
अनंततनयदत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसूनारायण गजानन आठवले
अनिलआत्माराम रावजी देशपांडे
अमरशेखमेहबूब पठाण
अज्ञातवासीदिनकर गंगाधर केळकर
आनंदवि.ल.बर्वे
आरती प्रभुचिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारीधोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारीहरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुदस.अ.शुक्ल
कुसुमाग्रजवि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमारसेतू माधव पगडी
केशवकुमारप्र.के. अत्रे
करिश्मान.रा.फाटक
केशवसुतकृष्णाजी केशव दामले
गदिमाग.दि.माडगुळकर
गिरीशशंकर केशव कानेटकर
ग्रेसमाणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबडविष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंदगोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रजराम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखरशिवराम महादेव गो-हे
चारुता सागरदिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्वसौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्वनारायणराव राजहंस
जीवनसंजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणेजयवंत दळवी
तुकडोजी महाराजमाणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकारामतुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणेज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी)दत्तत्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी)दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक)दगडू मारुती पवार
दक्षकर्णअशोक रानडे
दादुमियादा.वि.नेने
दासोपंतदासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकरशंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्णदिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारीरा.वि.टिकेकर
धुंडिराजमो.ग.रांगणेकर
नागेशनागेश गणेश नवरे
नाथमाधवव्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंधरा.श्री.जोग
नृसिंहाग्रजल.गो.जोशी
पद्मापद्मा विष्णू गोळे
पराशंरलक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळारामनिवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंतप्र.न.जोशी
प्रफुल्लदत्तदत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर)प्रभाकर जनार्दन दातार
फडकरीपुरूषोत्तम धाक्रस
फरिश्तान. रा. फाटक
बाकीबाबाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदमवीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकरचंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथवि.शा.काळे
बालकवीत्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी)राम गणेश गडकरी
बीनारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथभगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधवबंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्याप्रमोद नवलकर
भाऊ पाध्येप्रभाकर नारायण पाध्ये
भानुदासकृष्णाजी विनायक पोटे
भानुदास रोहेकरलीला भागवत
भालचंद्र नेमाडेभागवत वना नेमाडे
मकरंदबा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्तीमो.ग.रांगणेकर
मनमोहनगोपाळ नरहर नातू
लोककवी श्री मनमोहनमीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियनमाधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुजडॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकरभार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवालाम.पा.भावे
मिलिंद माधवकॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत)मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंतमोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्रद.पा.खंबिरे
यशवंतयशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्तयशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडितरघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व)बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधरगंगाधर कुलकर्णी
राजा ठकारनारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकरवसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमणकृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्रीवि.ग कानिटकर
रूपप्रल्हाद वडेर
रे. टिळकनारायण वामन टिळक
लता जिंतूरकरलक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदनदेवदत्त टिळक
लोकहितवादीगोपाळ हरि देशमुख
वनमाळीवा.गो.मायदेव
वसंत बापटविश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीसरघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडितवामन नरहर शेखे
विजय मराठेना.वि.काकतकर
विंदा करंदीकरगोविंद विनायक करंदीकर
विनायकविनायक जनार्दन करंदीकर
विनोबाविनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकरमालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदासनरहर सदाशिव जोशी
वशावसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारीविष्णु भिकाजी गोखले
शशिकांत पूनर्वसूमो.शं.भडभडे
शांतारामके.ज.पुरोहित
शेषन कार्तिकआत्माराम शेटये
श्रीधरब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकर
संजीवनीसंजीवनी रामचंद्र मराठे
संजीवकृष्ण गंगाधर दीक्षित
संप्रस्तभा.रा.भागवत
सहकरी कृष्णकृष्णाजी अनंत एकबोटे
सानियासुनंदा बलरामन कुलकर्णी
सार्वजनिक काकागणेश वासुदेव जोशी
सुधांशुहणमंत नरहर जोशी
सुमंतआप्पाराव धुंडिराज मुरतुले
सौमित्रकिशोर कदम
हरफन मौलाअरुण गोडबोले
सुगंधा गोरेसुखराम हिवलादे
होनाजी बाळाहोनाजी शेलार खाने+ बाळा कारंजकर
ज्ञानदेव (संत)ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णी
प्रा. अभिता निकम 

१८५७ चा उठाव भाग १

१८५७ राष्ट्रीय उठाव व कारणे

सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे. १८५७ साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते.
इसवी सन १८५७ मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला. पण हा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला. ब्रिटिशांनी भारत जिंकली व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले. या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले. शेती भाती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते. १७६०-७० च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी संघर्ष होत आलेला आहे. देशाच्या कोठल्या ना कोठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नाही. शेकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवली तरी १७६३ ते १८६ च्या दरम्यान किमान ४० मोठे लष्करी संघर्ष झाले होते. त्यात जनतेचा सहभाग मोठा असला तरी त्यांचे स्वरूप व परिणाम स्थानिकच होते आणि हे उठाव एकमेकांपासून अगदी अलग होते.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला.
१८५७ राष्ट्रीय उठाव व कारणे

१८५७ पूर्वीचे लढे :

  1. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापना झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढे दिले.
  2. शेतकरी, कारागीर, आदिवासी, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे लढे दिले.
  3. सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. असे लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले.
  4. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, उडीसातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले.
  5. महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले.
  6. इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनीदेखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिले. त्यापैकी १८०६ सालच्या वेल्लोर तसेच १८२४ सालचा बराकपूर येथील दोन्ही लढे विशेष उग्र स्वरूपाचे होते.
  7. इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्वं लढे स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले. परंतु त्यामुळे लोकांमधील असंतोष फक्त दडपला गेला. तो नाहीसा झाला नाही, मात्र जनतेतील असंतोषाचा वणवा १८५७ मध्ये भडकला.

१८५७ च्या उठावाची कारणे :

राजकीय कारणे :-

  1. इ.स. १६०० मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
  2. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने राजकीय परिस्थितीचे निरीक्षण केले. छोटी राज्ये त्याच्यातील वैर, राज्यातील गैर कारभार , मागासलेले शस्त्रास्त्रे त्याच्यातील राष्ट्रीयत्वाचा अभाव इ. गोष्टीमुळे राज्य निर्माण करणे सहज शक्य आहे.
  3. इ. स. १७५७ च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
  4. लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी प्रचंड सत्त्ताविस्तार करून सर्वं देश भर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
  5. इ.स. १७९८ मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
  6. तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला
  7. वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
  8. मुत्सद्देगिरी, भेदनीती, साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखता आला नाही.
  9. लॉर्ड डलहौसी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्या.
  10. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला.
  11. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब यांना मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली.

आर्थिक कारणे :

  1. ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
  2. 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
  3. सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली.
  4. येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता.
  5. शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.
  6. दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसाऱ्यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.

धार्मिक कारणे :

  1. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आर्थिक साम्राज्यावादा बरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला.
  2. इ.स. 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
  3. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
  4. कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.
  5. यामुळे धर्मगुरु व मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली.
  6. यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.

लष्करी कारणे :

  1. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला. तरी जोपर्यंत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते.
  2. शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.
  3. ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले. इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.
  4. भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती.
  5. र्लॉड कॅनिंगने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते.

प्रशासकीय विभाग - कोकण भाग ४

स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.
विस्तार : उत्तरेस – दमानगंगा नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी ‘रिया‘ प्रकारची आहे.
लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमीरुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .
उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.
कोकणातील प्राकृतिक रचना :
  • कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
  • किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.
  • कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
  • उतार पूर्व-पश्चिम दिशेस ‘मंद’ स्वरूपाचा आहे.
  • या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली ‘भुरुपे’ आढळतात.
  • उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.
  • कोकणचे उपविभाग :
  • 1.उत्तर कोकण – ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.
  • हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.
  • ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
  • लोकसंख्येची घनता अधिक.
  • नागरी लोकसंख्या जास्त.
  • दक्षिण कोकण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
  • ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
  • लोकसंख्येची घनता कमी.
  • पारंपरिक व्यवसाय.
  • खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.
समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.
1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे ‘खलाटी’ होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.
या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.
2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश
म्हणजेच ‘वलाटी’ होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.
कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे
1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.
     ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
मुंबई उपनगर : मालाड, माहीम
मुंबई : माहीम
रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग
सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल
2. पुळनी : समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.
मुंबई उपनगर : जिहू बीच
मुंबई शहर
दादर, गिरगाव
रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर
सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा
रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन
3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.
खरदांडा(रायगड)
4. बेटे : मुंबई : मुंबई बेट
रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)
अलिबाग : खांदेरी, उंदेरी
सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)
मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव
5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.
मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),
रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,
सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी
6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,
म्यंगेणीज = सिंधदुर्ग,
क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व
जिप्सम = रत्नागिरी
7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,
मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री
दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.
जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, ‘डोंगरांच्या रांगा’
8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व  सागरी किल्ले
ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा
रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा
रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग
सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग
भारतगड, पधगड सजैकोत

Oct 30, 2018

HOME ASSIGNMENT NO.13

                                                                  मराठी व्याकरण

                                                                      संधी सोडवा.


प्र.१.ला. मिष्टान्न 
प्र.२ रा .विदयामृत 
प्र.३ रा .रजनीश 
प्र.४ था. भानूदय 
प्र.५ वा.प्रश्नोत्तर 
प्र.६ वा .सप्तर्षी 
प्र.७ वा . जनैक 
प्र.८ वा .वृक्ष + औदार्य 
प्र.९ वा .अति + अल्प 
प्र.१०वा .किती +एक 
प्र.११वा .ने+अन 
प्र.१२वा.गो+ईश्वर 
प्र.१३वा .षड+शास्र 
प्र.१४वा .क्षुध+पिपासा 
प्र.१५वा .वाग+ताडन 

HOME ASSIGNMENT NO.12

                                                                      सामान्य विज्ञान




प्र.१.ला . विकरे व संप्रेरके स्रवणारी ग्रंथी कोणती?
प्र.२ रा .ट्रिप्सीन ,लायपेज , अमायलेज हि विकरे कोठे असतात?
प्र.३ रा .रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास कोणते संप्रेरक उत्तेजित                    करते?
प्र.४ था.शरीरातील अंतस्थ व सर्वात मोठी ग्रंथी? 
प्र.५ वा.पित्तरस कोठे स्त्रवतो ?
प्र.६ वा .जीवनसत्वे A,D,K,B12 कोठे तयार होतात ?
प्र.७ वा .पाणी आणि  क्षाराचे  शोषण कोठे जाते?
प्र.८ वा .हिरव्या वनस्पतीमधील 'प्रकाश संश्लेषण ' या जैवरासायनिक  निर्मिती करते?
प्र.९ वा .'लॅक्टोज ' हि द्विवारीक शर्करा कोठे आढळते?
प्र.१०वा .स्टार्च रेणूंचे विघटन होऊन काय तयार होते?
प्र.११वा .पिष्टमय पदार्थांचे अस्थित्व ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
प्र.१२वा.अमिनो आम्लापासून कशाची निर्मिती होते?
प्र.१३वा . चयापचय व शारीरिक विकास नियंत्रित करणारी प्रथिने म्हणजे...........
प्र.१४वा .रोगजंतूंशी मुकाबला करणारे प्रथिन.........

प्र.१५वा .ग्लुकोज चे रेणुसूत्र .............